पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भाग १९ - नालंदा

इमेज
राजगिर रेल्वे स्टेशन वरून नालंदाला पोचलो,  एकुणात "बिहार की ठंड" थंडी होतीच.. मला आधीच जास्त थंडी वाजते नेहमीच, त्यात ताप, अशक्तपणा त्यामुळे प्रचंड थंडी वाजत होती.. बरोबर होते तेवढे सगळे गरम कपडे अंगावर चढवूनच मी बसमधे बसले होते, बरोबरच्या कल्याणीची हालतही फार वेगळी नव्हती..ती पुण्यात MIT ला शिकणारी मुलगी..  बसमधून उतरलो खऱ्या पण नकोच वाटायला लागलं.. एकदा डॉक्टर येऊन मला सांगून गेले की, "की चलो, आप रुक गयी तो आपके साथवाली बच्ची भी रुक जायेगी|"  झालं, माझा ताईमोड ऑन... लिनाने बसवून आम्हाला टपरीवर चहा पाजला, आणि शेवटी रिक्षा करून आम्ही नालंदा खंडहर पाशी पोचलो.. जेमतेम एक किलोमीटर अंतर पण चालत नको वाटलं तेव्हा. आत गेलो, वाटलं जमेल आपल्याला.. विस्तीर्ण परिसर.. प्रत्यक्षात जे उत्खननात सापडलेले अवशेष किंवा इमारती आहेत त्या बऱ्याच आत आहेत. पुरातत्त्व विभागाच्या तिकीट ऑफीसपासून देखील बरंच चालायला लागणार आहे हे लक्षात आलं आणि बाकी सगळ्यांना तुम्ही जा, आमचं आम्ही दोघी बघतो असं म्हणून मोकळं केलं..  चालायला सुरुवात केली अन् लक्षात आलं खूप चालावं लागणार.. Dr.Kurush Dalal, Direct...

भाग १८ - रेल्वे प्रवास आणि आजारपण

इमेज
१ जानेवारीचा दिवस खरंतर नेहमीसारखाच उगवला.. आज दिवसभर रेल्वेत असणार होतो आम्ही. त्यामुळे मग पहाटे लवकर जाग आली तरी मी बोग्यांमधली उड्डाणे करत स्नानगृहाचा डबा गाठला नाही, गारठाही होताच पण तरी सुसह्य होतं डब्यातलं  वातावरण... आदल्या रात्री आम्ही मोठ्या शिताफीने सर्व खिडक्या शक्य तितक्या घट्ट लावून घेतल्या होत्या आणि फटींवरून सेलोटेप चिकटलेल्या होत्या.. होता होईतो थंडी आणि अती गार, बोचरं वारं थोपवण्याचा भाबडा प्रयत्न... पण पुष्कळ यशस्वी वाटत होता, निदान त्या पहाटे तरी. नेहमीप्रमाणे AC chair car गाठली, सूर्योदय व्हायचा होता, छान वाटतं होतं तिथं.. गप्पा, ओरिगामी, झुंबा चालू होतंच.. आज काही रोज न येणारे यात्री पण आले होते.. काही तिथेच एक chair Car मधेच रात्रभर झोपलेले आहेत असंही समजलं, दिसलंच. चहाबाज एकत्र जमले होते... आम्ही काही फॅसिलिटेटर आपल्याला नेमकी BGT साठी किती आणि काय मदत करायचीय हे समजून घेत होतो.  डब्यात परत जायची अजिबात इच्छा नव्हती कारण पाऊणहून अधिक डबा कालच्या जागरणामुळे, आणि आजच्या जरा निवांत वेळापत्रकामुळे जागा व्हायचा  होता... तरीही बघता बघता ७.३० वाजले म्हणून ...

भाग १७ - बेहरामपूर (पुढे सुरू)

इमेज
ग्रामविकास संस्थेचचं काम बघून आम्ही  kanakia शाळेत पोचलो, दुतर्फा विविध पारंपरिक आणि स्काऊटच्या  पोशाखातील शालेय मुलामुलींनी जागृती यात्रेतील सगळ्यांचं स्वागत केलं.. आत भलं मोठं पटांगण.. आणि त्या कडेला एक रंगमंच. नुकतीच टेकडी चढून त्यानंतर सायकल चालवून लगेचच तिथे आल्याने मला कुठेतरी छान बसून कार्यक्रम बघावासा वाटत होता, तशीच बाजूच्या इमारतीला असलेल्या सगळ्यात वरच्या पायरीवर मी जागा पकडून बसले.. बरोबरचे बरेच जणं तिकडे आले, काही खाली रेंगाळले, काहींनी त्या चमचमत्या, चुलबुल्या छोट्या मुलांबरोबर फोटो काढले, काहींनी ती शाळा बघितली, काहींनी मोबाईल चार्जिंग पॉईंट शोधले ,तर बरेच जणं रंगमंचासमोरील जागेत बसले..  ओरिसातील नृत्य प्रकार रंगमंचावर सादर होत होते. यामध्ये कार्तिकेय आणि तारकासूर युद्धाची गोष्ट पारंपरिक वेशभूषेत लोकनृत्य पद्धतीने सादर झाली. संबलपुरी नृत्य तसेच ओरिया भाषेतील आपल्या कोळी नृत्याला जवळ जाणारी बरीच लोकप्रिय गाणी, नृत्य सादर झाली.. ओरिया पद्धतीच्या रंगबिरंगी साड्या घातलेल्या छोट्या मुली फारच गोड दिसत होत्या... तो कार्यक्रम संपल्यावर.. चहापानानंतर  रंगमंचावर...

भाग १६ - बेहरामपूर - ग्रामविकास

इमेज
विशाखापट्टणम स्टेशनवरून रेल्वे सुटायला बराच वेळ लागला... दिवसभरात खूप काही ऐकलं, बघितलं होतं, झोपेची गरज होतीच.. उठून पुन्हा नवीन ठिकाणी नवीन उत्साहाने जायचं होतं.  नेहमीप्रमाणे माझी सकाळ पहाटेच झाली. ओरिसा, आंध्रप्रदेश सीमावर्ती भाग.. नदीवरचे पूल..बाहेरच्या भौगोलिक बदलांना AC chair Car मधून न्याहाळताना मजा येत होती पण ती बदलती हवा, तो वारा, तो बदलता वास या बंद डब्यातून मनाला उमगत होता, पण स्पर्शाला जाणवत नव्हता.  पण गरम चहाने गरजेचा ताजेपणा घशाला स्पर्शवला.. चला, काही तासांतच बेहरामपूरला उतरण्यासाठी आम्ही सज्ज झालो. आज तारीख होती ३१डिसेंबर २०२२. इंग्रजी किंवा आपल्या रोजच्या वापरातील कॅलेंडर नुसार वर्षांचा शेवटचा दिवस... आमच्या बोगीत जरा Blue - Red Colour Code करू अशी चर्चा होती.. रोजची मी असते तर हे असलं मी काही केलं नसतं, पण , "माहोल का सुनो मॅडम, बुढे मत बनो"...असं मला सांगण्यात आलं, अन् मग मी पण जरा अखडूपणा सोडायचा ठरवलं. मी बसमधे बसले, तोच कुठून तरी डॉक्टर सुरेंद्र आणि Facci संदीप, Facci श्रुती आले.. आणि धमाल सुरू झाली.. भरपूर गप्पा.  जागृती यात्रेच्या डॉक्टरांबद्दल ...

भाग १५ - विशाखापट्टणम .. पुढे सुरू

इमेज
 विशाखापट्टणमचं अक्षयपात्र बघून आम्ही GITAM University Campus मधे आलो.  भलं मोठ्ठं आवार आणि विविध विद्याशाखांच्या इमारतींचा समुच्चय. संध्याकाळची चहा, पकोड्याची वेळ काही आमचे केटरिंगचे ताऊजी चुकून देत नाहीत, आम्ही पोचेतो यांनी Tea, snacks मांडलेलेच होते.. आणि इथेच रात्रीचे जेवण आहे हे देखील समजले कारण एका कोपऱ्यात स्वयंपाक चालू झालेला. आधी मला Geetam University नाव आहे असं वाटत होतं.. म्हणजे याच युनिव्हर्सिटीमधे start up and लाईफ कोच म्हणून काम करणाऱ्या वासुदेवन् ला भेटेतोवर ( हा यात्रेमधील एक Faccilitator होता. अत्यंत साधी राहणी, प्लास्टिक वापर जवळपास नाही, सुतीच कपडे वापरतो, जेवण पण बसूनच करतो, उभ्याने जेवत वा पाणी पित नाही हा... गरज पडलीच तर हा गटाला घेऊन खाली प्लॅटफॉर्मवर बसत असे पण उभं राहून कधीच जेवताना दिसला नाही.. अतिशय नम्र पण तितकाच त्याने ठरवलेल्या जीवनमूल्यांवर, मतांवर आग्रही असायचा. एकदम हटके माणूस होता, वेगळाच होता.. आमच्या व्हायच्या गप्पा येता जाता, कधी ठरवूनही. life time line activity याने फार छान घेतली त्याच्या ग्रुपमधे.. ) मला वाटतं होतं की संगीताशी संबंधित का...

भाग १४ - विशाखापट्टणम - अक्षयपात्र

इमेज
 कालचा भाग तुम्ही वाचला असेलच , आमच्या ग्रुपचे sricityचे रोल मॉडेल प्रेझेंटेशन झाले तरी रेल्वे अजून  विशाखापट्टणम उर्फ vaizag (आता हे नाव तसे फारसे वापरात नाही.) ला पोचली नव्हती.. रेल्वे लेट झाली असं याला म्हणायचं नाही, तर रेल्वे अजून आपल्या इच्छित स्थळी पोचली नाही, खूप अधिक रेल्वे रहदारी आहे, रेल्वे थांबायला प्लॅटफॉर्म मिळत नाहीये, काल खूप उशीर झाला वगैरे वाक्यं आम्हाला एव्हाना पाठ झाली होती.. जी बहुतांश खरीच असत. तर आम्ही विशाखापट्टणम् ला उतरेपर्यंत जेवणाची वेळ झाली आणि आम्ही रेल्वेत न जेवता प्लॅटफॉर्मवर जेवण केले..  विशाखापट्टणम हे आंध्रप्रदेशातले आणि एकुणच बंगालच्या उपसागरातील भारताच्या पूर्व किनाऱ्यावरचे मोठे बंदर आहे. इथले नेव्ही बेस कॅम्प, म्युझियम बघण्याची माझी खूप इच्छा होती.."जाना तो चाहिए पर, जाएगे नही" या माझ्या सूत्रानुसार ही इच्छा मी कुणाला बोलून दाखवली नाही.. आम्हाला ठरल्याप्रमाणे "अक्षयपात्र" ला यायचे होते.. अर्थात नंतर बोगी ९  वाल्यांना museum ला नेऊन आणल्याचं समजलं.. पण त्याचं कारण वेगळं होतं.. आणि मला म्युझियम गडबडीत बघायला नाही आवडत.. खरंतर ,...