पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भाग ३१ - यात्रा सफल संपूर्ण

इमेज
 पहाटे गजर वाजला आणि जाग आली.. बघितलं तर लक्षात आलं मी चक्क स्लिपिंग बॅगमधे नाही तर  AC डब्यात ते पण वरच्या बर्थवर आहे. अरे हो,  यात्रा संपली नाही का,.. आता काहीच वेळात सांगली येईल, गडबडीने खाली उतरले. सामान गोळा करून दाराजवळ येऊन थांबले. रेल्वेने नांद्रे स्टेशन सोडलं होतं... म्हणजे अजून वेळ आहे तर पण तरीही तशीच उभी राहिले सामान घेऊन.. एक भली मोठ्ठी बॅग, एक निळी हॅडबॅग, सॅक आणि बॅगेत न बसल्याने बाहेर गुंडाळी करून आणलेली स्लिपिंग बॅग... किती ते सामान.. जाताना आटोपशीर वाटत होतं आज पसरलेलं वाटलं.  यात्रेची सुरुवात फॅसिलिटेटर मिटिंग, पहिला दिवस, चेतना गाला सिन्हांनी साधलेला संवाद, रेल्वेतली पहिली रात्र, मग सकाळ,मग १५ दिवसात विविध रोल मॉडेल, त्या चर्चा, ती रेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर केलेली जेवणं, ते start up, उद्यमीता, ऐकलेले सेशन्स, सांस्कृतिक कार्यक्रम, सगळं साठवून मी आता सांगलीत खूप 'मोठ्या'  सामानासह उतरतीय अशी जाणीव झाली आणि भल्या थंडीच्या पहाटे शहारा आला अंगावर. अमर, माझा नवरा अर्थातच आणायला स्टेशनवर आला होता, घरी मुली पण खूप वाट बघत होत्या, आई परत आल्याचा ...

भाग ३० - परत मुंबई

इमेज
खिडकीतल्या हलक्या गार वाऱ्याच्या झुळूकीने जाग आली. घड्याळात पहाटेचे ५ वाजले होते... पण आज उठून काय करायचं ?  १० वीची परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लवकर उठून काय करायचं असतं; पण जाग तर हमखास येते तसं काहीसं झालं होतं माझं.. आज उठून काही गडबड नव्हती. आमची ट्रेन दुपारी १२ शिवाय काही मुंबईत पोहोचत नाही याचा अंदाज होताच. 'सामान आवरणे' अशातले मला काही करायचं नव्हतं, सगळं आवरून तयार होतं, sleeping bag ची गुंडाळी केली की झालं. हं आता माझी छोटी चौकोनी उशी बॅगेत मावत नव्हती इतकंच काय ते सामान आवरणे, बसवणे बाकी होतं. झोप येईना, उठले... पार १५,१६,१७ डबे फिरून आले. आज ना बाथरूमचा डबा उघडला होता ना PA system चालू होती, रात्रीच स्पिकर वगैरे काढून नेले होते.. आवरले आणि AC chair car गाठली.  रात्री खूप जागरण, नाच वगैरे झाल्यामुळे आज पहाटे कुणीच फारसं चेअर कारमध्ये नव्हते. सवयीने मधल्या टेबलावर जाऊन बसले.... चहा प्यायला, लिखाण केले, खिडकीतून सूर्योदय बघितला. महाराष्ट्रात आहोत याचा अंदाज आला.. रेल्वे पुढे पुढे जात होती आणि मी पण पुढे जायचे ठरवले. असो.. थोड्यावेळाने महाराष्ट्रातले कोण कोण यात्र...