पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भाग २५ - राजस्थान .. तिलोनीयाकडे

इमेज
दिल्लीत मध्यरात्र उलटून गेल्यावर रेल्वे सुरू झाली, उद्या राजस्थानातलं तिलोनिया हे ठिकाण बघायचं.. पहाटे दिवस लवकर सुरू झाला, तारीख होती ६ जानेवारी २०२३. 'दर्पणकार' (मराठीतले पहिले वृत्तपत्र ,दर्पण) बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवस. महाराष्ट्रात हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो.. सध्या मी लौकिकार्थाने पत्रकारितेत नसले तरी माझ्यातल्या पत्रकार वृत्तीला मी जागं ठेवलंय आजही, आणि आकाशवाणीमुळे काही दिनविशेष डोक्यात फिट्ट बसलेत.. "आजच्या दिवशी" तिलोनिया बघायचं म्हंटल्यावर खरंतर मला एक "घुंघटामागची गोष्ट" अशी काही storyline लिहावी आणि त्यादृष्टीने बेअरफूट कॉलेज बघावं, किंवा आकाशवाणीसाठी मस्त कुणाची तरी छान मुलाखत किंवा बाईट घेऊन तो कार्यक्रमात गुंफावा असं काहीसं वाटायला लागलं होतं... या भावना आत्ता लिहितानाही इतक्या ताज्या वाटतायत की वाटतंय मुद्दाम यासाठी तरी परत जावं तिलोनियाला.... पर राजस्थान की मिट्टी पर उतरनेको टाईम था अभी....books and movies चं दुसरं सेशन होणार होतं तिकडे मी निघाले होते.. त्याआधी राहून गेलेल्या काही गोष्टी सांगते. मी facilitator अस...

भाग २४ - दिल्ली - पुढे सुरू ..

इमेज
 कालच्या भागात मी म्हटलं तसं ,अंशू गुप्ता ना ऐकून हळूहळू यात्री बाहेर पडत होते,  गूंज बघून सगळे यात्री दिल्लीच्या कमानी ऑडिटोरियममधे जमायला लागले..  तिथे  Opportunities and Challenges of women entrepreneurs हे पॅनल डिस्कशन होते. जागृती यात्रेचा CEO आशुतोष कुमारने महिला उद्योजिकांना बोलतं केलं. Ms Ritika Mehbubani,(रितिका मेहबुबानी) Senior Manager, Customer Engagement and Marketing, ZOHO One,  Ms Niharika Rajeev(निहारिका राजीव), Partner, Incube Angel Network  Sushmita Kaneri (सुष्मीता कानेरी), Creator of Crowd Funding Platform Gullak. यापैकी सुष्मीता आमच्या बरोबर ट्रेनमधेच होती, आमच्या सारखी यात्री म्हणूनच प्रवास करत होती.  महिलांनी स्वतंत्रपणे उद्योग उभा करणे खरंच खूप संघर्षाचं काम असतं हे तिघींना मान्य होतं, पण त्या बरोबरच बायका, आपलं म्हणणं मांडायला आणि फंड रेसिंगसाठी कंपनी पीच करताना थोडक्यात पैसे मागताना जरा उगाचच घाबरतात, मागे राहतात असा मुद्दा पुढे आला. महिला उद्योजिका वास्तविक स्वतःच्या संकल्पनांबाबत खूप खऱ्या आणि स्पष्ट असतात. पण पुरूष सहकारी अ...

भाग २३ - गूंज - अर्थात प्रतिध्वनि (Echo)

इमेज
 तारीख होती ५ जानेवारी २०२३. पहाटे नेहमीप्रमाणे लवकर उठले ..थंडी खूप होती. रेल्वेच्या खालच्या बर्थवर झोपलं की काय वाट्टेल ते केलं तरी खिडकीतून गार वारं काही थांबत नाही..भले तुम्ही industrial tape लावा किंवा तिथे एखादा पलंगपोस बांधा, आणि  स्वतःला स्लिपिंग बॅगमधे कोंबा.. ते वारं  येतच राहतं, तुम्हाला रोजच्या नवीन हवेचा गंध, स्पर्श, करतच राहतं.. आणि तुम्ही अधिकाधिक थंडाळलेपणाचा  अनुभव घेत बर्थवर झोपण्याचा प्रयत्न करत राहता, आणि शेवटी माझ्यासारखे असाल तर थंडी पेक्षा उठलेलं बरं वाटून भल्या पहाटे उठून डबा सोडून AC chair car गाठता...अंघोळ वगैरे असल्या गोष्टी मी नालंदा नंतर सोडूनच दिल्या होत्या. त्यामुळे  पटकन आवरून AC chair car मधे गेले.. रोजचे साथी जमले होतेच.. थोडं ओरिगामी केलं, चहा, गप्पा... आज आम्ही दिल्लीत उतरणार होतो. पण एकुण रेल्वेला होत असलेला उशीर आणि प्लॅटफॉर्म मिळणे वगैरे गोष्टी असतातच..या अशा मधल्या अवधींमधे books and movies वरती informal session व्हायची. ERC केशव ती घ्यायचा. त्याबद्दल उद्याच्या भागात सांगते. दिल्ली ते अहमदाबाद असा यात्रेतील शेवटचा टप्...

भाग २२ - बरगत का पेड आणि Baniyan Revolution

इमेज
या आधीच्या  ब्लॉगमध्ये लिहिलंय तसं पहाटे लवकर उठायचं ठरवूनच मी रात्री आडवी झाले... बरपारच्या थंड रात्रीची तुलना बर्फाळ अशीच करता येईल... मजा आली. हो, त्रास झाला तरीही थंडीची पण एक मजा असते, नशा असते... माझ्या सारख्या कधीही, कुठेही थंडी वाजणाऱ्यांना शाल, टोपी, मफलर, स्वेटर, आणि जे जे थंडीपासून संरक्षण करतील असे गरम कपडे जीवाभावाचे सोबती वाटतात. एकवेळ माणसं सोडून जातील, माणसांची उब कमी होईल, पण स्वेटर वगैरे मंडळी आपल्या बरोबर असतात तेवढे दिवस तेवढीच उब देत राहतात.. त्या बर्फाळ थंडीत पहाटे ४ वाजता मी त्या मोठ्या घरातल्या एका मोठ्या खोलीतून बाहेर आले.. कसली भारी थंडी होती... दात वगैरे घासण्याची आपल्याला फारच सवय असते नाही.. आज त्या गार पाण्यात हात घालावा का? हे ठरवण्यासाठी मी सहज गुगल केलं .. तापमान ४° दाखवत होतं.. सहाजिकच जास्तच थंडी वाजायला लागली..पण मग बेसिनचा नळ सोडला आणि भराभर तोंडावर पाणी मारलं.. अंगात एकावर एक चढवलेले स्वेटर, मफलर, टोपी सगळं काढून टाकलं.. म्हंटलं काय होतंय ते तरी बघुया.. काही झालं नाही..मजेत आवरून झालं. सहज खोलीत येऊन कुणी उठतंय का किंवा कुणाला उठायचंय का याचा अ...

भाग २१- BGT competition - एक अनोखे गटकार्य

इमेज
कालचा दिवस संपला नव्हता उलट दुपारनंतर सुरू झाला होता, आमच्या group ची दोन भागात विभागणी झाली होती.. त्यामुळे आता आमचे दोन गट manufacturing वरच BGT competition मधे उतरणे स्वाभाविक होते.. माझ्या cohort मधल्या वैश्णवी आणि हृषिका ज्या गटात होत्या त्या  गटामधे नेमकी तयारी काय चालू आहे याचा अंदाज येत नव्हता, self declared leader तिथे होता, आणि आम्ही काही लक्ष घालावे अशी तिथे अपेक्षा नव्हती... अर्थात तशी अपेक्षा दुसऱ्या गटात पण नव्हती पण Facci थांबले तर ना नव्हती. या  उरलेल्या गटात  प्रतीक्षा, राजवी, प्रकल्या आणि इतर मुलं होती.  राजवी, चिन्मय यांनी गटावर चांगला होल्ड मिळवलेला पाहून मी बाहेर पडले, अर्थात आशीष सर मुलांबरोबर होतेच. सकाळीच एक मंदिर बघितलं होतं शेतात तिकडे निघाले. शेतातल्या पाऊलवाटेने जायला मस्त वाटत होतं... एक थंडी सोडली तर सगळं कसं ओकेच होतं.  मंदिर बंद आहे लक्षात आल्यावर परत थोडं गावाच्या दिशेने गेले. तिथे दोन घरांवर नक्षीकाम केलेले दरवाजे पाहिले आणि थांबले, म्हंटलं इथे नक्कीच कुणीतरी शिकलेलं राहत असणार.. एक तिशीचा माणूस बाहेर आला, नीट शहरी कपडे केल...

भाग २० - बरपार, देवरिया उत्तर प्रदेश

इमेज
आज तारीख होती ३ जानेवारी २०२३.. आज रात्री आम्ही उत्तर प्रदेशातील देवरियामधल्या बरपार गावात राहणार होतो.. जवळपास १०दिवसांनंतर आम्ही जमिनीवर झोपणार होतो.. चक्क रात्री तिथे मुक्काम करणार होतो.. प्रचंड थंडी असणार आहे हे सांगायला गुगल भाऊच पुरेसे होते.. लोकांना काय वाटतं वगैरेची गरजच नव्हती.. तापमानाचा पारा बिहारपासूनच जो खाली गेला होता तो वर येण्याची चिन्हं नव्हतीच. त्यातून खेडेगावात बाजूला भरपूर शेती असणार म्हणजे आणखीन थंडी.. ढीगभर अंगावर आणि बॅगेत अशी थंडीसाठी व्यवस्था घेतली.. आता माझ्या आजूबाजूला खूप मुली आजारी होत्या.. एकुणात रेल्वेतच ताप भरला होता.. खोकला, सर्दी,थंडी काय विचारूच नका.. ती cold wave की काय आत्ताच कशाला मरायला आली होती कोण जाणे.. हो, तरी ५०० जणांत हे चालायचंच ओ.. रोज एकाने तापाचा/सर्दीचा 'खो' दुसऱ्याला द्यायचा की मग कसं सगळी रेल्वे बरोबर balance होते.. शिवाय डॉक्टरांवर ताण पण येत नाही.. आणि भारताचंच प्रतिनिधित्व रेल्वेत असल्याने  इथेही self appointed Doctor  ची कमी नव्हतीच.. शिवाय प्रत्येकाचे on call डॉक्टरही होतेच..  प्रत्येक जीव स्वतःची काळजी घेत होता, इत...