भाग २१- BGT competition - एक अनोखे गटकार्य
कालचा दिवस संपला नव्हता उलट दुपारनंतर सुरू झाला होता, आमच्या group ची दोन भागात विभागणी झाली होती.. त्यामुळे आता आमचे दोन गट manufacturing वरच BGT competition मधे उतरणे स्वाभाविक होते.. माझ्या cohort मधल्या वैश्णवी आणि हृषिका ज्या गटात होत्या त्या गटामधे नेमकी तयारी काय चालू आहे याचा अंदाज येत नव्हता, self declared leader तिथे होता, आणि आम्ही काही लक्ष घालावे अशी तिथे अपेक्षा नव्हती... अर्थात तशी अपेक्षा दुसऱ्या गटात पण नव्हती पण Facci थांबले तर ना नव्हती. या उरलेल्या गटात प्रतीक्षा, राजवी, प्रकल्या आणि इतर मुलं होती. राजवी, चिन्मय यांनी गटावर चांगला होल्ड मिळवलेला पाहून मी बाहेर पडले, अर्थात आशीष सर मुलांबरोबर होतेच. सकाळीच एक मंदिर बघितलं होतं शेतात तिकडे निघाले. शेतातल्या पाऊलवाटेने जायला मस्त वाटत होतं... एक थंडी सोडली तर सगळं कसं ओकेच होतं.
मंदिर बंद आहे लक्षात आल्यावर परत थोडं गावाच्या दिशेने गेले. तिथे दोन घरांवर नक्षीकाम केलेले दरवाजे पाहिले आणि थांबले, म्हंटलं इथे नक्कीच कुणीतरी शिकलेलं राहत असणार.. एक तिशीचा माणूस बाहेर आला, नीट शहरी कपडे केलेला.. पाठोपाठ त्याची आई. घर खूपच जुनं वाटत होतं, परत परत सावरून ठीक केलेलं जाणवत होतं.. घरासमोर एक मोठं सिमेंट कॉंक्रिटच्या घराचं बांधकाम सुरू होतं.. बाहेर आलेल्या माणसाचं नाव ज्ञानेश्वर होतं.. आज सगळा कार्यक्रम ज्या शाळेत चालू होता ती जागा त्याचीच होती. शाळेसाठी शिक्षक मिळवणे किती कठीण आहे, कोविड काळात शाळा online चालवली, शाळेत प्रत्येक वर्गात टिव्ही, इंटरनेट कनेक्शन आहे, माध्यमिक शाळा आहे वगैरे त्याने माहिती दिली. हा ज्ञानेश्वर स्वतः इंजिनिअर, या गावचाच. बराच काळ दिल्ली, गुडगाव इथं नोकरी केलेला, पण गावात परतावं म्हणून परतलेला, मग लोकांनी कशी नावं ठेवली, आईला कसे बोलले, बरोबरचे मित्र सध्या जास्त कमावतात, तुमचा मुलगा वाया गेलाय, लग्नाची मुलगी टिकेल का याच्या बरोबर इथं गावात... वगैरे वगैरे
पण या माणसाच्या बोलण्यात पकड होती.. गावांसाठी हळूहळू करत राहण्याची जिद्द होती. भले त्यासाठी राजकारणात घुसायला देखील त्याची तयारी होती.. शशांक मणी त्रिपाठी उभे राहिले तर नक्की निवडून येतील इथे, काय काय बदल घडतात या जागृती सेवा संस्थानच्या कामामुळे, फरक पडतोय, गावांमध्ये रोजगार संधी उपलब्ध होतील, उद्यमीता वाढेल असा विश्वास वाटतोय वगैरे.. पण इथल्या बायकांची स्थिती अजून खूप सुधारायला हवी.. जातीवर आधारित अजूनही वस्त्या आहेत इथे. पटकन म्हणाला की, "वो उधर मुसलमान बस्ती, इधर पेडके बाद जो दिखता है वो other class and here some of our houses." गावात काही सांगायला गेलं तर खूप विरोध होतो, वैताग पण येतो..वाटतं जावं सोडून करावी परत नोकरी..पण आता दिल्लीतल्या गर्दीत नाही जायचंय.. इथं छान आहे, होईल सुधारणा पण वेळ लागेल... मग त्याची kitchen garden बघितली. म्हणजे काय तर लांबच लांब पसरलेल्या गहू, बटाटा वगैरे शेतातील नवीन घरामागचा एक तुकडा इतर घरगुती भाजीपाल्यासाठी राखीव ठेवला होता...हा इसम एकुणात धडपडत होता गावात.. रात्री शाळेत भेटते म्हणून मी निरोप घेतला. बघितलं तर घड्याळात ५.१५ वाजलेले .. अंधारून आलेलं... सांजवात लावायची आपली वेळ संध्याकाळी साधारण ७/७.३० असते.. याच्या आईने एक पणती मूळ घरात ठेवली आणि रस्ता ओलांडून ती बांधकाम चालू असलेल्या घराच्या पायरीपाशी आली आणि पणती ठेवत नमस्कार करून जायला लागली...
सहज विचारलं, "अभी तो मकान बना नहीं ,अभीसे दिया क्यौ?" तर ती आई म्हणाली, "मकान अच्छा बने, सुख मिले इसमे ,इसलिए अभीसे दिया"...
दिवे उजळणे ही पद्धत भारतीय असल्याची परत एकदा खूणगाठ पटली..
"अंधेरा होगा, जाओ आप" म्हणत तिने जवळपास पिटाळलंन्. जिथं जिथं अंधार तिथं कुणी ना कुणी तरी दिवा लावायची धडपड करतोय... वेगळं नोंदवायची गरजच नव्हती वहीत..
शाळेत पोचले तो आमचा गट तय्यार होता.. वेगळ्याच hangover मधून स्पर्धा माहोलमध्ये रुळायला जरा वेळच लागला मला.
वेगळ्या वेगळ्या दोन स्टेजवर स्पर्धा होणार होती... एकीकडे स्पर्धा स्पिरीट, तयारी वाढत होती दुसरीकडे थंडी... ५/६ डिग्री तापमान होतं, आणि सगळे मोकळ्या जागी डोकी तापवत होते, डोकी चालवत होते.. फिर चाय तो बनता है ना...
आमच्या गटाची "उद्यम ऑन व्हिल्स" ही एक manufacturing company होती. Producing high functionable, affordable Kiosks, small structure with one or more open sides that is used to vend merchandise (such as newspapers) or services (such as film developing): a small stand-alone device providing information and services..हातगाडी सारखं, ढकलगाडी push carts for roadside micro enterprises.. रस्त्यावर पान टपरी, भजी, केशकर्तनालय, मोबाईल पैसे भरणे, किरकोळ गरजेच्या वस्तू विकणारे अशांसाठी सुसज्ज आणि made to order हातगाडी, छोटं फायबर दुकान manufacturing करणे असं स्वरूप होतं. यासाठी मुद्रा लोन घेता येईल, किती एकुण खर्च, ते का उपयुक्त आहे गावात, कसं मग त्याबद्दल financial statistics, manufacturing unit like काय वाटेल ते करून देऊ (KVKT). मग ते उभं करायचा खर्च, या सगळ्यांची गरज गावांमध्ये कशी आहे हे पटवणे... Lead statement होतं की we sell end to end solution to aspiring micro entrepreneur or already tradesman who is looking to upgrade his business and want some infrastructure which can be moveable.आता CEO, CFO, marketing head वगैरे ठरले..
प्रत्यक्षात स्टेजवर उत्तम सादरीकरण झाले. परीक्षक खास बोलावले गेले होते...ते प्रत्यक्षात उद्योजक होते, तर कुणी academics वाले.. CA, marketing area expert तरी कुणी yatriprenure म्हणजे यात्रेतून प्रेरणा घेऊन उद्योग उभारत असलेले.. विविध ठिकाणी छान परीक्षण चालू होते. BGT चा उद्योग, खटाटोप एवढ्यासाठीच की अनेक मधून प्रत्यक्षात येऊ शकेल अशी कल्पना खरंच गावांमध्ये राबवता येईल, त्यासाठी यात्रा, त्यासाठी आर्थिक मदत, त्यासाठी प्रशिक्षण इथेच देता येईल..
थोडं Yatra booklet मधलं पण जसंच्या तसं वाचायचंय का?
The Deoria port-of-call is designed very strategically to sway the Yatra towards a more action-oriented path. Instead of looking at role models who have already created an institution or enterprise, we will visit an area that is just starting on this journey. To compound the situation, Deoria is located in an underserved region of the country and therefore some of the cultural and socio-economic issues that prevent enterprise- led development to flourish exist here. Our purpose, therefore, is to visit a typical village and have discussions with nascent social and economic enterprises, with a view to see how you could scale them up. The visit will focus on a workshop environment in a typical eastern UP village so that you get a real sense of the challenges and joys of starting enterprises in rural India. It will be followed by a public welcome to Jagriti Yatra by its mother institution.
Biz Gyan Tree Exercise
Yatris group into verticals of energy, education, agriculture, manufacturing, tourism, health among others and develop a business plan. After being judged by a special jury, some selected ones are invited following the Yatra to implement a pilot of the chosen ones.
BGT is designed to give an experiential learning to the Yatris. Apart from knowledge sessions and mentorship, the Yatris will get a near real-life perspective of setting up an enterprise in Middle India, including the challenges you will face in working within a diverse team.
We encourage Yatris to use this opportunity to collaborate, challenge and allow them to be challenged in a constructive environment. It is important that you allow everyone in the team to participate in the exercise. It is a competition and there are winners in the end, but the real value is in learning through the process.
तर या स्पर्धेचा निकाल दिल्लीत गेल्यावर समजणार होता, त्यामुळे सगळेच मस्त निवांत झाले... खूप ताण, तयारी, सादरीकरण अशा गटकार्यानंतरचे निवांतपण काय असतं हे अनुभवायलाच लागतं. भूक आणि थंडी यांची एकत्रित जाणीव... मंडळी जेवणाच्या रांगेला लागली.. थंडीसाठी उभ्या खांबांवर गॅसबत्ती पेटवली होती ठिकठिकाणी आणि आम्ही यात्री उबेसाठी त्या खांबांखाली उभे होतो...
जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम छान झाला.. नाच, गाणं, नकला, विनोद आणि यारो चलो.....
Creation चा टप्पा संपवून आता खऱ्याअर्थाने सगळे integration, recollection च्या फेजमधे जायला लागले...
महिलांची निवास सोय शाळेपासून अर्धा किलोमीटर लांब होती...थंड हवेत चालत जाणं, अनेकांना तब्येतीसाठी धीर देणं, हो जाये गा, कल बनियान ट्री को जाएंगे सुबह ..आना है ..असं म्हणत प्रत्येक जण निवासस्थानी पोचलो..तर तिथे काही जणी आधीच येऊन झोपलेल्या... व्यवस्था लावून मी पण स्लिपिंग बॅगवर रजई घेऊन झोपले... पडून राहिले..खरंतर रात्रभर झोपच लागली नाही... सतत कुणीतरी उठत होतं, खोकत, शिंकत होतं किंवा मंद उजेडात औषधे शोधत होतं... या गावांचा विकास होईल पण आमच्या तब्येतीचा विकास होण्याची गरज जास्त वाटली त्या रात्री... भल्या पहाटे उठून अनोळखी गावात, शहरात, किल्ल्यावर फिरायला जाण्याचं आकर्षण मला आजही आहे, त्यामुळे बरपारमधली दुसऱ्या दिवशीची पहाट मला हातची घालवायची नव्हती... कोण कोण माझ्याबरोबर ५.३० ला येणार असं विचारलं पण बहुतेक प्रतिसाद थंडच आला."आप भी मत जाओ रे आरामसे जाएंगे।". वगैरे...... इतरांचं माहिती नाही पण माझ्या शरीराबरोबर माझं मन मात्र गोठलं नव्हतं... आणि काही झालं तरी पहाटे ४ ला उठायचं असं ठरवून पडून राहिले मी...
प्राची परांजपे
८/०३/२०२३





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा