भाग 29 - समारोप
साबरमती आश्रमातून बाहेर पडलो, बसेस पकडून आम्ही निघालो होतो. बसेस मधून यात्रींची शेवटची यात्रा समारोप स्थळ EDII Entrepreneurship Development Institute of India. तिथे आम्ही निघालो. विनयजींना दुसरीकडे जायचे असल्याने ते बसमध्ये नव्हते आणि त्या बसचा कॉर्डिनेटर म्हणून त्यांनी मला जायला सांगितले. बसमध्ये डोकावले तर तिथे चक्क दोन फॅसिलिटेटर अगोदरच आपापल्या ग्रुप बरोबर होते. ERC चा मेंबर नाही एवढेच. खरं म्हणजे माझी तशी तिथे गरज नव्हती. पण सवय जडली आहे विविध शिबिरांमुळे की, दिली आहे ना आणि घेतली ना जबाबदारी मग पार पाडा. बस ड्रायव्हरला गुगल मॅप प्रमाणे चल असं मी सांगितले तर तो अहमदाबादच्या ट्रॅफिक मध्ये आणि शॉर्टकटच्या नादात चक्क चुकला, वेगळ्याच वळणावर वळला. मग जरा मी वैतागले "मै मॅपसे बता रही हू वैसे चलो ,विनयजीने मुझे मॅप लगानेको बोला है " .. तो फारसा ऐकत नाही असं बघून सागरने सांगितले "मॅडम बोल रही है वैसा चलो" मग गाडी रुळावर आली अर्थात बस नीट सुरू झाली . सागर तपाडिया या आमच्या facilitator बद्दल ओळख करून देण्यासारखं व्यक्तिमत्व आहे. आवाजापासून देहबोली पर्यंत...