भाग १२ - Sri city - चेन्नई
It's again new day for new place,new learning. आज चेन्नई जवळील sricity.... त्या आधी बोगी नंबर 12 मधे जाऊन महेंद्र ला भेटून आले.. माझे अनुभव, निरीक्षणं सांगितली आणि अविष्मा, महेंद्र यांच्या कडून बेंगळुरू मधे काय काय परिस्थिती आहे.. सिंगल मदर असतील तर स्वमग्न किंवा गतीमंद मुलांना वाढवताना कसे प्रश्न येतात.. त्या आई हे सगळं कसं करतात, या मुलांना पुढे स्वतः च्या पायावर उभं करण्यासाठी आता खूप काही करता येईल, मिळतंय, या मुलांना अक्षर ओळख, वाचन येत नसेल तरी टॅबवर बोलून ती लिहू शकतायत. एकच एक काम उत्तम पद्धतीने करतायत..फक्त गरज आहे ती त्या मुलांची इतरांशी तुलना टाळण्याची, आईवडील, नातेवाईक यांनी सहानुभूती नव्हे तर गरज पडेल तिथे सहकार्य करण्याची.. बेंगळुरू मधे असे प्रयोग चालू आहेत, नवीन खूप काही समजले का? तर त्याहीपेक्षा बऱ्याच आशादायक गोष्टी समजल्या. संपूर्ण यात्रेत या पाऊण तासाएवढं हलकं,सुखद कधीच वाटलं नाही. प्रेरणा देणारे, बिझनेस बद्दल स्किम्सची माहिती नवीन माहिती देणारे,चटका लावणारे, सद्गदित व्हायला लावणारे अनेक क्षण आले पण इतकं आश्वासक, आणि पेशन्स ठेऊन फक्त करत रहा, लढत रहा असं म...