भाग ९ - रोल मॉडेल २ अरविन्द आय केअर

कालचा ZoHo hangover अनेकांच्या मनावर होताच, पण आज दिवसभरात खूप काही बघायचंय या उत्साहात सकाळ झाली..

रात्री तशी फार थंडी किंवा वाऱ्याचा त्रास झाला नाही. अपूरी पण  मस्त झोप झाली. चालत्या रेल्वेत आणि अत्यंत गढूळ पाण्यात (चहा पेक्षा थोडं फिकट पाणी, साधारण पावसाळ्यात सांगलीत नळाला येतं तसंच पाणी) अंघोळ उरकली.

तर ...आज होती २७ डिसेंबर ही तारीख. PA system वर सुबलक्ष्मींच्या स्वराने सगळं वातावरण प्रसन्न झाले. मीनाक्षी मंदिर, खरेदी आणि बाहेर खाणं अशी बरीच आमीषं अनेक यात्रींना खुणावत होती, 

आणि as per schedule we are going to visit our next that is, second role model - Arvind Eye Care Hospital .

मंदिर, मूर्ती शास्त्र हा माझ्या स्वतःच्या फार आवडीचा विषय..पण गडबडीत जाऊन मीनाक्षी मंदिर बघण्यात मला अजिबात रस नव्हता, पूर्वी बघितलेलं होतं मंदिर पण, तेव्हा वय होतं ११वर्षे..

म्हणजे थोडक्यात मी ज्याला मंदिर समजून घेणे म्हणतात अशा वयात प्रथमच मदुराईत येत होते, लगेचच परत इथे येण्याची शक्यता नव्हतीच.. रेल्वेतून उतरण्यापूर्वीच अरविंद आय केअर पेक्षा जास्त चर्चा मदुराई फिरण्याबाबत होती. ( हे अर्थात सगळ्यांना माहीत असलं तरी Off Record होतं.)

मला जवळपास किमान ४० वेगवेगळ्या यात्रींनी, Facci नी विचारले "आम्ही जाऊ का? किंवा आपण जायचे का (मदुराई पहायला)?"

आता, त्यांनी जाऊ नये असं मला खरंतर वाटत नव्हते पण ज्या साठी आपण आलोय ते रोल मॉडेल बघायला, समजून घ्यायला अधिक वेळ द्यावा असं वाटत होतं. म्हणून मग मी एक वाक्य तयार केलं, "जाना तो चाहिए पर जाएंगे नही| "

मी वरच्या वाक्यातून माझ्या पुरता निर्णय घेतला होता, सगळेच मोठे होते, चूक काहीच नव्हते. प्रत्येकाने स्वतःचा call घ्यायचा होता.

मदुराई जवळील कुडलनगर स्टेशनवर उतरलो. 

हलका पाऊस होता, रेल्वे रूळ ओलांडून पलीकडे बसेस थांबल्या होत्या, आणि अरविंद आय केअर हॉस्पिटलमधील भल्या मोठ्या सभागृहात जाऊन बसलो.

अरविंद आय केअर मध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या दोघा तिघांनी माहिती सांगितली, पॅनल डिस्कशन, प्रश्नोत्तरे पण झाली. एका हॉस्पिटलमध्ये ५००+ माणसं बसूनही सभागृह मागे, बाजूला रिकामे होते यावरून साधारण किती मोठे सभागृह असेल आणि मग एकुणात सगळंच किती मोठ्या प्रमाणात आहे याची कल्पना यायला लागली.

आज जी संस्था/आय केअर सेंटर बद्दल आम्ही ऐकत होतो त्याचे संस्थापक पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहेत असं माहित होतं.

तर..

डॉ गोविंदाप्पा व्यंकटस्वामी ज्यांना सगळेच Dr V म्हणून ओळखतात त्यांनी  आयुष्यभर नेत्रतज्ज्ञ म्हणून सरकारी, निमसरकारी इस्पितळात काम केले , जवळपास १,००,००० सर्जरी त्यांनी स्वतः केल्या आहेत. 1976 साली डॉ. व्ही नी वयाच्या साठीत असताना आपली पत्नी, बहीण, बहीणीचे यजमान, एक इंजिनिअर, आणि एक व्यवस्थापनकौशल्य असलेला आणि एक जण अशा सात जणांनी मिळून सुरुवातीला ११ खाटांचा दवाखाना सुरू केला.

Dr.V यांची आई अडाणी पण मुलांना संस्कृत येईल याकडे लक्ष दिले. आईला गोविंदाप्पा व्यंकटस्वामी यांनी विवाह न करता पॉंडेचरीच्या अरविंदाश्रमात सेवाभावी वृत्तीने काम करावं असं वाटत होतं, तसे ते गेले पण..पण फार काळ रमले नाहीत. पण योगी अरविंद आणि त्या शिकवणीने प्रेरीत मात्र झाले.

एका गरोदर बाईला वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.. ही घटना मनावर कोरली गेली आणि त्यातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. सुरुवातीला घरच्या आणि मित्रांसह सुरू केलेला दवाखाना पैसे येतील तसतसे वरचे मजले बांधत हॉस्पिटलमध्ये रुपांतर केले. 

Campassion and Empathy are core values of Arvind Eye Care. अनेक वर्षांपासून सर्जरी करताना त्यांना लक्षात आलं होतं की भारतात डोळ्यांच्या तक्रारींकडे माणसं दुर्लक्ष करतात, घरगुती उपाय करतात आणि अंधत्व पदरी घेतात. त्यामुळे रोजगार बंद पडतो आणि कुटुंबाची वाताहत होते.

अत्यल्प  पैशात डोळ्यांची ऑपरेशन करणे, कॅम्पमध्ये फुकट सुविधा देणे अशा अनेक सुविधा अनेक डॉक्टर देत असतात पण अरविंद आय केअरचं वैशिष्ट्य हे की डॉ. व्ही नी पहिल्या पासून डॉक्टरांचा गट बांधला. मोफत शस्त्रक्रिया आणि पैसे घेऊनच्या शस्त्रक्रिया यांच्यातील आर्थिक गुणोत्तर, ती घडी नीट बसवत आणली. सुरुवातीला घरचेच डॉ. आणि मग हळूहळू हा सामाजिक उद्योग विस्तारत नेला. गावांमधल्या १२वी झालेल्या मुलामुलींना ट्रेनिंग सुरु केलं.आता ती टीम गावात कॅंपसाठी मदत करते, त्यांना पारंपरिक पोषाखाचं बंधन घातलं, गावातील लोकांना आपलंसं करून घेण्यासाठी बोलणं, हावभाव यावर कार्यशाळा घेतल्या जातात. स्थानिक लोकांना खूप सहभागी करून घेतलं. आता on call system आहे. 

पैसे घेऊन उद्योग विस्तारत न्यायचा असेल तर एकट्याने लढण्याचे काम नाही.. like minded people / समविचारी लोक  जमा करत जाणे फार गरजेचे हे ऐकताना जाणवत होतेच. मग भले हा वैद्यकीय सेवा देणारा आणि समाजभान बाळगून उभा राहिलेला उद्योग असो. About  team building thing, imperfect is joy not shared by all.

जे द्याल ते उपकार म्हणून देऊ नका. Whatever you give free, keep it with love.

Intelligence and Capacity is not all ,there should be happiness to do something.

आमच्याशी बोलायला त्यांच्या बहीण  Dr. G. Natchair (डॉ नाचर)  आल्या होत्या.  वय ८३वर्षे.. तर डॉ व्ही आता रोजच्या कामातून आता निवृत्त आहेत. खरंतर , डॉ व्ही हे द्रष्टा संघटक आहेत असं वाटतं.. Dr V is not only doer but he is planner . डॉ खूप असतात पण ज्या सेवा सामान्य लोकांपर्यंत पोचवायला आहेत त्या आणि त्या पोचवताना कोणती मूल्यं जपलीच पाहिजेत यांचे दंडक त्यांनी घालून दिलेत.. आणि आता Dr. R. D. Ravindran, सध्याचे  chairman आणि डॉक्टर चमू वारसा पुढे चालवतात. They say, Give quality, and give it to everyone.

आज वर्षाला ४.५ लाखाच्या वर  eye surgery होतात.  त्यापैकी ५०% पेक्षा जास्त सर्जरी मोफत वा भरीव अनुदानावर केल्या जातात. The most important learning that Yatris wanted to take was how do they manage to serve society on such a large scale and still be profitable without taking a single penny as a donation from the beginning of its establishment. It was social entrepreneurship in its purest format where the main intention is to serve society and still be self-sustainable.

पटकन बोलताना इथले डॉक्टर म्हणतात की, अरविंद आय केअर मध्ये वेगळं काही नाही. आहे फक्त वेगळ्या पद्धतीने वागणं. कधीतरी डॉ.व्ही म्हणतात मॅकडोनाल्ड सारख्या अरविंद आय केअर च्या भारतात किंवा सारख्या जगाभरात शाखा असायला हव्यात. 

अरविंद आय केअर मध्ये काही ठळक गोष्टी मला वाटल्या त्या तशाच मांडते.

१) The hospitals that deal with the patients and provide them with quality treatment.

२) The second component, which was honestly surprising for everyone is LAICO - which is the training institute through which Aravind provides training to other people to replicate the Aravind model. They are seriously building their competition because they feel that the magnitude of the problem they are solving is huge and we need more Aravinds to solve it at a rapid pace. 

३)The third component is the Aurolab which focuses on manufacturing lenses at a very economical cost so that it is affordable for people in rural. 

४)The last component is the medical research foundation which continuously finds new ways to make the Aravind model more effective.

खरंतर याचं भाषांतर शक्य आहे पण.. नकोच.जसंच्या तसं ला काही महत्त्वं आहेच ना.

खरंतर हे सगळं ऐकून भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील आव्हाने, संधी,धोके असं बरंच समोर उभं ठाकलेलं...

प्रत्यक्षात पेशंट, हाॅस्पिटल, Research Centre, Aaro Lab वगैरे बघायला जायचं होतं पण आधी पोटपूजा.....

जेवून झाल्यावर जेव्हा एखादा डॉक्टर यात्री तुमच्या जवळ येतो आणि खूप उत्साहाने,अस्वस्थतेने तुमच्याशी बोलतो...  किंवा "दीदी खाली गुमसूम बैठकर सोचो मत , थोडा मिठा भी खा लो|" असं मलाच एखादी यात्री म्हणते .. किंवा "मॅडम ,आप बस यहाँ बैठी रहो.. थोडा सोना है सो जाऊ?, जादा ही दिमाग भर गया, ओह अब नहीं "

अशा अनेक प्रसंगांनी मी खरंच खांबाला टेकून बसून राहिले...


प्राची परांजपे

२३ जानेवारी २०२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग १ - इच्छा जागृतीची

भाग ३१ - यात्रा सफल संपूर्ण

भाग २५ - राजस्थान .. तिलोनीयाकडे