भाग १२ - Sri city - चेन्नई
It's again new day for new place,new learning.
आज चेन्नई जवळील sricity....
त्या आधी बोगी नंबर 12 मधे जाऊन महेंद्र ला भेटून आले..
माझे अनुभव, निरीक्षणं सांगितली आणि अविष्मा, महेंद्र यांच्या कडून बेंगळुरू मधे काय काय परिस्थिती आहे.. सिंगल मदर असतील तर स्वमग्न किंवा गतीमंद मुलांना वाढवताना कसे प्रश्न येतात.. त्या आई हे सगळं कसं करतात, या मुलांना पुढे स्वतः च्या पायावर उभं करण्यासाठी आता खूप काही करता येईल, मिळतंय, या मुलांना अक्षर ओळख, वाचन येत नसेल तरी टॅबवर बोलून ती लिहू शकतायत. एकच एक काम उत्तम पद्धतीने करतायत..फक्त गरज आहे ती त्या मुलांची इतरांशी तुलना टाळण्याची, आईवडील, नातेवाईक यांनी सहानुभूती नव्हे तर गरज पडेल तिथे सहकार्य करण्याची.. बेंगळुरू मधे असे प्रयोग चालू आहेत, नवीन खूप काही समजले का? तर त्याहीपेक्षा बऱ्याच आशादायक गोष्टी समजल्या.
संपूर्ण यात्रेत या पाऊण तासाएवढं हलकं,सुखद कधीच वाटलं नाही. प्रेरणा देणारे, बिझनेस बद्दल स्किम्सची माहिती नवीन माहिती देणारे,चटका लावणारे, सद्गदित व्हायला लावणारे अनेक क्षण आले पण इतकं आश्वासक, आणि पेशन्स ठेऊन फक्त करत रहा, लढत रहा असं म्हणणारा हा पाऊण तास माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा होता.
आजही आवरून आम्ही खाली उतरलो आणि बसेस मध्ये बसलो. श्री सिटी बद्दल खरंतर उत्सुकता होतीच कारण सेझ बद्दल आपण सगळेच ऐकून असतो आणि प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप मध्ये एवढ्या मोठ्या जागेवरती हे सगळं कसं चालतं हे बघायचे उत्सुकता मला नक्कीच होती . Sricity हे उत्कृष्ट मॉडेल आम्ही बघायला चाललो होतो. जायला तामिळनाडू आंध्रप्रदेश बॉर्डर क्रॉस करावी लागली अर्थातच त्यामुळे बराच वेळ थांबायलाही लागलं.
Sricity campus मधे शिरल्यावर लक्षात आलं की हे भलतंच मोठ्ठं प्रकरण आहे.
सगळे जणं एका warehouse किंवा मोठं रिकामं गोडाऊन असावं अशा ठिकाणी जमलो.
प्रचंड उकाडा,पण कुलर होते आणि त्याही पेक्षा ज्यांनी हा सगळा व्याप उभा केला ते सनारेड्डी समोर उभे होते. हे सगळं कसं उभं केलं, संकल्पना त्यांनी मांडली...
Sri City or Satyavedu
Reserve Infracity Pvt. Ltd. is an integrated business city and special economic zone spread over 7500 acres and located in the Tirupati district in the state of Andhra Pradesh, India. It was founded in 2008 by Dr. Ravindra Sannareddy (also the current Managing Director), a Civil Engineer by profession.
हा तिरुपती जिल्हा सगळ्यात मागास जिल्हा होता ,पण आज जागतिक कीर्तीची manufacturing City बनली आहे.
Sri City includes a multiproduct Special Economic Zone (SEZ), a Domestic Tariff Zone (DTZ), a Free Trade & Warehousing Zone (FTWZ) and an Electronics Manufacturing Cluster. आत्ता श्रसिटी हे भारतातील सगळ्यात मोठं, महत्त्वाचे business destinations बनले आहे. Total investment to 4 billion USD and total exports exceeding 500 million USD till date. Kellogg’s, Isuzu, Mondelez (Cadbury), Pepsi, Panasonic, Daikin, Kimberly Clark, Alstom, Kobelco, Foxconn, Danieli, Xiomi, Palmolive etc. and manufacturing units of companies from 11 countries. Modelez’s largest plant in Asia is located in Sri City. This area has been developed by a private organization (Sri City) under the Public-Private Partnership (PPP) model. Sri City buys land from the government and allocates it to companies on a lease basis for 99 years and provides water and power to all industrial plants.
थोडक्यात साध्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला भाडे तत्त्वावर वीज, पाणी, जागा उपलब्ध करून दिली जाते, तुम्ही या आणि उत्तम व्यवसाय उभा करा. सगळ्या formalities and paperwork हे २१-३०दिवसात इथे पूर्ण केल्या जातात, देशभरात यासाठी साधारण ६० पेक्षा जास्त दिवस लागतात, हे इथले वैशिष्ट्य.
रेड्डीच्याच शब्दात सांगायचे तर, "to solve big problems, the solution has to be even bigger" - this was the idea behind the development of Sri City. सनारेड्डींनी सांगितले की स्थानिक भाषा, लोकं ,त्यांचे प्रश्न माहिती होते त्यामुळे अमेरिकेतून परत आल्यानंतर देशात इतर कुठेही नाही तर इथेच काही वेगळं करण्याची इच्छा होती. चेन्नई पासून साधारण ५५किमी वर हे आहे. वैशिष्ट्य हे की रस्ता, जलवाहतूकीसाठी बंदर आणि विमानतळ सारंच नजिकच्या कक्षेत असल्याने उद्योगांना दळणवळणासाठी पोषक आहे. जवळपास ४२ MNC'S इथे कार्यरत आहेत.
अर्थात नावातच सिटी आहे, अंदाज आला असेलच ना की मग आत गाव वसवलंय का तर इथल्या काम करणाऱ्या सर्व कर्मचारी इत्यादींसाठी गृहसंकुले, शाळा, उद्याने, मंदिर अशा सोयी आहेतच. याशिवाय मोठमोठाले तलाव देखील आहेत.. या ओसाड माळरानावर पूर्वी जे लोक वस्ती करून रहात होते त्यांना देखील आहे तिथेच संरक्षण दिले आहे.
Sricity असं गुगल केलंत तर अधिक तपशीलवार माहिती मिळू शकेल.
आता सगळं ऐकल्यानंतर..राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी असेल , त्यांचं आडनाव "रेड्डी" आहे वगैरे चर्चा झडल्याच. पण काहीही असो हे सगळं उभं करणं सोपं नाही एवढं निश्चित. हा पसारा, विस्तार, कंपन्या बघून छाती दडपेल अशी परिस्थिती आहे..तर याबद्दल विचार करून तो प्रत्यक्षात आणणं खरंच खूप मेहतीचं, कष्टाचं, टीम वर्कचं काम असणार हे जाणवत होतंच, त्यासाठी.. कर माझे जुळती...
जेवणानंतर आम्ही गटागटाने विविध कंपन्या बघायला गेलो..
मी ज्या बसमध्ये होते, ती बस Thermax ला जातीय समजल्यावर वाटलं.., अरे... इथं येऊन Thermax च बघायचंय का, पुण्यात किंवा इतर ठिकाणी पण बघता आली असती की Thermax.. पण प्रत्यक्षात तिथे पोहोचलो आणि वाटलं, अनु आगा आणि सहकाऱ्यांनी सुरू केलेली आणि सामाजिक, पर्यावरण भान ठेवून, उत्तम HR department असलेली, संपूर्ण made to order या धर्तीवर चालवणारं हे श्रीसिटीतलं युनिट खूपच भारी आहे.
Heating and cooling system ,chillers उत्पादने बनवली जातात . स्टील शीटच्या एका रोल पासून वेगवेगळ्या टप्प्यांवर घडत जाणारा, काही भाग रोबो कडून जोडला जाणारा ..असा मोठा म्हणजे आपल्या उंचीच्या तिप्पट उंच चिलर तयार झालेला बघणे फारच खास होतं.
आता याचं वजन, कार्य,उंची , टेस्टिंग, किंमत, बनवण्यासाठी लागणारा वेळ हे त्या त्या order प्रमाणे बदलत जातं. pure manufacturing unit मधलं समजणारे आमच्या बरोबरचे इचलकरंजीचे यात्री विनय मगदूम यांना त्यावेळी मी चांगलं miss केलं.
अरविंद आय केअर ला जाताना त्यांनी ... कसं १६-१८तास काम करून शिकून घेतलं, गाड्यांसाठीच्या प्लेट बनवण्याचा कारखाना कसा सुरु केला.. झटपट काही होत नाही १०,१२ वर्षे अविरत मेहनत कशी करायला लागते.. core knowledge, कुणाकडून पण शिकण्याची वृत्ती कशी लागते आणि mechanical manufacturing unit उभं करणं किती अवघड काम आहे, पेशन्स खूप लागतो, पैसा विचार करून गुंतवायला लागतो, चूका झाल्या तर सोसून पुढे जायचं बळ मिळवायला लागतं... सगळं झटपट च्या जमान्यात असा उद्योग उभा नाही होत. वर्षे खपावं लागतं....असं खूप ऐकलं होतं, छान गप्पा झाल्या होत्या.सोबत होता एक पास्ता सॉस बनवणारा तरूण start upवाला यात्री.. आणि असं असूनही हा माणूस "या हल्लीच्या मुलांचं, त्यांच्या startup चं काय खरं नाय " अशी नकारात्मक भाषा करत नव्हता हे विशेष... वयाने, अनुभवाने हे खूप मोठे होते, पण तरुणांत तरुण होऊन कसं समजून घ्यायचं, या तरुणांच्या गोटात शिरून योग्य ते कसं पोचायचं याची कला त्यांना अवगत होती. अनेक तरुण यात्रींमधे ते आवडते होते...
तर Thermax बघताना माझ्या सोबतचे यात्री जे CA होते ते त्यांचे आर्थिक गणिताचे प्रश्न विचारत होते.. Marketing वाले made to order product ने कसं होतं तुमचं वगैरे विचारत होता.. तर खरंच mechanical engineering वाले होते ते production process, steel, welding, assembly , how to check product testing for upto mark वगैरे समजून घेत होते.. आणि त्यांना ते अधिक समजण्याची शक्यता अधिक होती.
मी समजेल तेवढं टिपत होते.. माझा इंजिनिअर नवरा जर इथे असता तर त्याने किती आणि काय काय विचारले असते असाही विचार मनात येऊन गेला.. आणि हसायला आले.
"काला अक्षर भैस बराबर" इतकं नसलं तरी बऱ्याच गोष्टी मला समजत नव्हत्या हे नक्की.. मग मी जरा HR department, security बद्दल समजून घेतलं, जे मला समजलं.
संपूर्ण श्रीसिटी बद्दल आमच्या गटाला दोन दिवसांनी role model presentation करायचं असल्याने जमेल तेवढी technical, non technical information मी ऐकून, टिपून, रेकॉर्ड करून ठेवत होते. नंतर नेटवरून पण अधिक वाचून ठेवणार होतेच. सगळ्यांना समजलेला आणि नक्कीच आवडलेला भाग होता दुपारचं authentic Andrha lunch..
रोजचं आमचं जेवण छान असलं तरी हे जेवण विशेष होतं... रस्सम्,सांबार तर होतंच पण विविध भाज्या, चटण्या, आणि प्रकारांनी ताट भरून गेलं..सांबर, आणि रस्सम एकाच ताटात असल्याने मी त्यांच्या वेगवेगळ्या चवींची नोंद मेंदूत साठवून ठेवलीय.एकाच्या ताटाचा मी काढलेला फोटो जोडते सोबत म्हणजे तुम्हाला अंदाज येईल.. The climax was pure ghee मैसुरपाक.. आहाहा...
मुख्य इमारतीत एक छोटा display होता ज्यात श्रीसिटीचा नकाशा आणि असलेल्या सर्व कंपन्यांची उत्पादने मिनीएचर फॉर्म मधे मांडली होती...
अर्थातच शेवटी
यारो चलो बदलाने की रुत है
यारो चलो सवरने की रुत है
हे यात्रा गीत झालं आणि आम्ही श्रीसिटीला निरोप दिला..
एरवी कोणत्याही शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इथे भेट देण्यासाठी सहसा परवानगी दिली जात नाही पण केवळ जागृती यात्रेतून आम्हाला ही संधी मिळाली हे आमच्यासाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट होती...
परत रेल्वेकडे बसमधून प्रवास परत चर्चा,परत गप्पा, परत वादविवाद,परत गाणी,नाच हे तर चालूच होते...
यात्रा आता भिनत चालली होती.. चेन्नईत Exploring Leg that is First Part of Yatra Ends.. असं म्हंटलं जातं की चेन्नई डीप येते अनेकदा... म्हणजे पहिला उत्साह संपतो आणि इथवर येईतो अनेकदा यात्री कंटाळतात, काही दमतात, काही त्रस्त होतात तर काहींना जरा मरगळ येते... पण एकुणात आमच्या यावेळच्या यात्रेत overall Chennai deep fall नाही जाणवला.... कदाचित कन्याकुमारीतच पोचेते त्या दिवशी आलेल्या कंटाळ्याने चेन्नई डीप आलाच नाही...
एक भाग संपला, ओय, यात्रा सुरूच आहे.. रोज chair car session होतंच आहेत.. आम्ही जातोच आहोत..
रोज राहतात काही गोष्टी ते म्हणजे माझ्या cohort ची ओळख, हेडकाऊंट, उद्याच्या भागात नक्कीच त्याबद्दल सांगते...पण अर्थात तुम्ही वाचत राहिलात तर तुम्हाला समजेल ना...
जरा हल्लीच्या पद्धतीने सांगायचं तर ,
स्वस्थ रहा, ..हो पण वाचत रहा, भेटू परत उद्या.
प्राची परांजपे
३१/१/२०२३







सुंदर आहे. लिखाण आणि अंनुभव.
उत्तर द्याहटवाऐकत रहावेसे वाटते.
धन्यवाद
हटवा