भाग १४ - विशाखापट्टणम - अक्षयपात्र
कालचा भाग तुम्ही वाचला असेलच , आमच्या ग्रुपचे sricityचे रोल मॉडेल प्रेझेंटेशन झाले तरी रेल्वे अजून विशाखापट्टणम उर्फ vaizag (आता हे नाव तसे फारसे वापरात नाही.) ला पोचली नव्हती..
रेल्वे लेट झाली असं याला म्हणायचं नाही, तर रेल्वे अजून आपल्या इच्छित स्थळी पोचली नाही, खूप अधिक रेल्वे रहदारी आहे, रेल्वे थांबायला प्लॅटफॉर्म मिळत नाहीये, काल खूप उशीर झाला वगैरे वाक्यं आम्हाला एव्हाना पाठ झाली होती.. जी बहुतांश खरीच असत.
तर आम्ही विशाखापट्टणम् ला उतरेपर्यंत जेवणाची वेळ झाली आणि आम्ही रेल्वेत न जेवता प्लॅटफॉर्मवर जेवण केले..
विशाखापट्टणम हे आंध्रप्रदेशातले आणि एकुणच बंगालच्या उपसागरातील भारताच्या पूर्व किनाऱ्यावरचे मोठे बंदर आहे.
इथले नेव्ही बेस कॅम्प, म्युझियम बघण्याची माझी खूप इच्छा होती.."जाना तो चाहिए पर, जाएगे नही" या माझ्या सूत्रानुसार ही इच्छा मी कुणाला बोलून दाखवली नाही.. आम्हाला ठरल्याप्रमाणे "अक्षयपात्र" ला यायचे होते.. अर्थात नंतर बोगी ९ वाल्यांना museum ला नेऊन आणल्याचं समजलं..
पण त्याचं कारण वेगळं होतं.. आणि मला म्युझियम गडबडीत बघायला नाही आवडत..
खरंतर , "भारतीय म्युझियम यात्रा" सुरू करायचा विचार मनात येऊन गेलाय. आणखीही काही वेगळ्या वेगळ्या विषयांना धरून यात्रा करता येतील अशी एक यादी बनवलीय मी यानिमित्ताने
वाटेत बसमधून बाहेर बघताना जाणवलं की.. विकास होतोय, सगळीकडे पक्की घरं होतायत, एकसारखे मॉल होतायत आणि हे अटळ आहे आता, पण त्यामुळे त्या त्या प्रांतातले वैशिष्ट्य, गावा-शहराचा मूळ चेहरा नाहीसा होतोय का? म्हणजे बाहेर बघितलं तर माणसांचे रंग, काही अंशी पेहराव पद्धती सोडली तर आपण तामिळनाडूत आहोत, आंध्रप्रदेश की महाराष्ट्र हे चटकन कळत नाही..
ते ते गाव आपापला बाह्य तोंडावळा,नीजखूण सोडतंय का? मग नीजखुणा धुसरं झाल्या तर अंतरखुणा पण धुसर होतायत का?
मी पण संपूर्ण प्रवासात हे निरीक्षण करत होतेच, तुम्ही पण करून बघा, स्वतःची निरीक्षणं आपण तपासून घेऊ, हा विकासाचा चेहरा नेमका समजून घ्यायला हवाय.सध्या हा मनातला विचार बाजूला ठेवते, पुढं जाते...
ज्या पात्रात अन्न कधीच संपत नाही असं अक्षयपात्र !!
द्रौपदीला श्रीकृष्णाने दिलेल्या त्या अक्षयपात्राचा धागा पकडून शालेय मुलांना दररोज, नियमितपणे, पोषणमूल्य असलेलं दुपारच्या जेवणाची सोय करणारी आणि योग्य, पोटभर जेवण मिळालं तर मुलं मधेच शाळा सोडणार नाहीत, उत्तम शिकतील या मुलभूत धारणेवर चालवलेली "अक्षयपात्र" ही .. अर्थात सरकारच्या Mid Day Meal योजनेचा खरंच सुयोग्य वापर करून शाळांमधे मध्यान्ह भोजन कसं देता येऊ शकतं याचा वस्तुपाठ.
भाषांतराचा कंटाळा म्हणा किंवा जसं नोंदवलं आहे तसंच पोहोचवावंसं वाटतंय म्हणा... Some facts and figures about this NGO...
Akshay Patra is a story of social innovation , founded in July 2000. They have expanded from feeding 1500 children per day in mid day meals to 2 million per day in 2022 in 20k schools through 65 kitches. Headquartered at Bengaluru, it is spread across 16 states and 51 locations.
They have planned another 20 kitchens in next 2 years. They work with state and central govt. Akshaypatra believes that Good meals enable children to have good education.
It is NGO , having public private partnership with MDM scheme of Government.
Akshaya Patra is a charitable institution and is dependent on donations received from the Government of India, corporates, online fundraising campaigns, and other well-wishers.
अक्षयपात्र संपूर्ण देणग्यांवर आधारित NGO आहे. त्यांचं वाक्यच आहे..."With your help, we can reach out to many more children suffering from malnutrition across the country every day." जेव्हा एकाच शाळेतल्या मुलांना एकच अन्न आणि एकसारख्या ताटांमधे, एकत्र बसून जेवायला मिळतं तेव्हा मुलांमधील वैचारिक असमानता कमी होण्यास मदत होते असा अनुभव अक्षयपात्रला येतोय. शाळेत देऊन जर अन्न उरलं आणि ते खराब झालेलं नसेल तर गरजूंना वाटलं जातं . त्यासाठी अनाथाश्रमात, वृद्धाश्रम अशासारख्या संस्थांशी संपर्क केला जातो, अशा अनेक संस्था जोडून ठेवल्या आहेत.
अक्षयपात्रचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे managerial highrarchy आहे. MD,CEO, Plant Incharge अशा post आहेत. त्यांना योग्य तो पगार दिला जातोच... पण यासाठी उत्पन्नाचं साधन एकमेव आहे ते म्हणजे देणग्या आणि आता CSR funds....
एक नियमित उत्पन्न हवं, यासाठी reserved fund ची तरतूद हवी अशी चर्चा अक्षयपात्र मधील अधिकारी करत असतात..पण याबद्दल वरिष्ठ ठाम आहेत की हे अन्नदानाचं काम आहे, शालेय मुलांना शिक्षणात गोडी लागावी, त्यांना एकवेळ तरी पोषक आहार मिळावा यासाठी हे काम सुरू झालं, सरकारच्या भागीदारीत आहे यासाठी जनसामान्य आणि मोठमोठ्या कंपन्या जरूर आर्थिक मदत करत राहतील...Shri Satya Gaura Chandra Dasa आणि आणखी एका प्रभुजींनी आमच्याशी संवाद साधला..
साधारणपणे एका ताटातील जेवणाची किंमत १५-१६ रुपयांमध्ये असते.. जेवण बनवण्यासाठी संपूर्ण मशिनरीचा वापर होतो. मोठमोठ्या कंटेनरमध्ये पदार्थ तयार होतात.. प्रत्यक्षात बघताना लक्षात येत होतं की हे किचन नसून जवळजवळ food manufacturing company चं making and packing unit आहे.. ज्यांना cooking and food industry and manufacturing मधे रुची आहे त्यांना हे सगळं फारच आवडेल असं होतं..
आता विशाखापट्टणम मधे हे युनिट कसं सुरू झालं ते सांगते.
डॉ आदिनारायण राव हे या भागातले मोठे ख्यातनाम orthopedic surgeon. ते पोलिओच्या पेशंटवर देखील उपचार करत.. अक्षयपात्रमधील प्रमुखांनी विचारलं की तुमच्याकडे बरीच जमीन आहे तर एक मोठा प्लॉट या कामासाठी द्याल का, आणि डॉ राव यांनी विचार केला की आयुष्यभर वैद्यकीय सेवा करून झाली, हे अन्नदानाचं काम आहे, शिक्षणाचं काम आहे..तर जागा दिली पाहिजे.. आणि डॉ आदिनारायण राव यांनी जागा दिली आणि विशाखापट्टणम मधील हे केंद्र उभं राहिलं.
नंतर आदिनारायण राव डॉक्टरांशी बोलताना ते म्हणाले, "की मागणारा कोण आहे हे मला फार महत्त्वाचं वाटलं, आणि म्हणून मी सेवानिवृत्ती काळात अन्नदानाच्या कामात माझी छोटी मदत देऊ केली."
तर अक्षयपात्रचे सत्यगौरा म्हणाले, "काम करत असताना जर ते योग्य कारणासाठी सुरू असेल तर पैसे, जागा मागायला संकोच करता कामा नये, फक्त कुणाकडे काय आणि का मागतोय हे आपल्याला पक्कं माहीत हवं,त्यावर ठाम विश्वास हवा..कार्ये सिद्धीस जातात"...
हं, देणग्या मागणं, कंपन्यांना मदतीचा हात मागणं, CSR, प्रायोजक उभे करणं सोपं नसतंच.. तसंच कुणासाठी मागतोय, का हे पण तितकंच महत्त्वाचं असतंच तरच समोरची व्यक्ती, कंपनी तयार होईल... फक्त देणगी मूल्यातून एखाद्या कार्पोरेट कंपनी सारखी रचना असलेलं (कर्मचारी, व्यवस्थापन आणि, salary system like any other HR department) office and kitchen, transport system... म्हणजे अक्षयपात्र ...
आणि सगळे ट्रस्टी, वरिष्ठ व्यवस्थापक, मेंटॉर अर्थात कार्यकर्ते पद्धतीने काम करतात हे सगळे तिथले उच्च विद्याविभूषित प्रभुजी!! म्हणजे देखील अक्षयपात्र...
(बहुतेक सगळे IIT, post doctoral , Management experts असेच होते.. आणि स्वतः ची नोकरी, व्यवसाय सोडून इथे पूर्ण वेळ काम करत होते.)
आम्ही प्रत्यक्ष जिथे जेवण बनतं त्या इमारतीत जाताना hair cap, foot plastic, masks सगळं एखाद्या food industry norms प्रमाणे होतं.
आणखी एक वैशिष्ट्य समजलं ते म्हणजे जर हे सेंटर भात हेच मुख्य अन्न खाणाऱ्या अर्थात आंध्र, तामिळ, ओरिसा अशा प्रांतात असेल तर तर मुलांना जेवणात स्थानिक तांदूळापासून बनवलेला भात, भाजी, सांबार, कढी रस्सम, पायसम् दिले जाते. तर हेच उत्तर हिंदुस्थानात सेंटर असेल तर रोटी मशीन द्वारे रोटी,सब्जी असं जेवण दिलं जातं. मुख्यालय बेंगळुरू मधे आहे म्हणून सरसकट भारतातील सर्व केंद्रांवर फक्त भातच शिजत नाही..
हा विचार फार महत्त्वाचा आहे.. आणि स्वच्छता, ते तयार अन्नपदार्थ शाळा शाळांत नेऊन वाटण्याची बसवलेली सुयोग्य पद्धत फारच भारी.. पहाटे ३ ला हे किचन सुरू होतं ते दुपारी २ पर्यंत आवराआवर करून पुन्हा सर्व स्वच्छता करून दुसऱ्या दिवशी साठी सज्ज...
Akshaypatra असं गुगल करा आणि मिळवा अधिक माहिती आणि accurate statistical data...पण between the lines समजून घ्यायला प्रत्यक्ष जाऊन कामच बघा अक्षयपात्रचे.. आणि अर्थातच आपल्या परीने देणगी द्या. (चांगल्या कामासाठी देणगी मागायला मला अजिबात लाज वगैरे काही वाटत नाही.)
"Anybody here who ate akshaypatra mid-day meal?"
आमची एक ओरिसातील तरुण सहयात्री, start up सुरू केलेली आणि "माऊस" म्हणून अनेकांना माहीत असलेली शाश्वती दास उठून उभी राहिली आणि म्हणाली,."I am AkshayPatra product...मेरे स्कुलमे मैने अक्षयपात्र मिड मे मिल खाया है, बहोत मजा आता था, और आज यहाँ आ के तो बहोत खुशी हो रही है|"
ही मुलगी वरवर पहाता एकदम चक्रम, सर्किट वाटायची पण वयाच्या केवळ २२ व्या वर्षी तिने मिळवलेलं यश वाखाणण्याजोगे होते, प्रचंड धडपडी, काही वेळा उद्धट वाटेल अशीच..पण फार मस्त मुलगी होती ही.. माझ्या तिच्या जातायेता म्हणजे दिसली की गप्पा व्हायच्या.. सतत वेगळाच विचार ही मुलगी करायची.. आणि सगळ्यात गंमतीचा भाग म्हणजे अर्थातच तो आम्हाला शेवटच्या दिवशी समजला की, संपूर्ण यात्रेत ही एकमेवाव्दितीय होती जिने १५ दिवसात एकदा पण अंघोळ केली नव्हती..
विचारल्यावर म्हणाली, "बहोत चिजे थी करने को नहाने मैं टाइम क्यो वेस्ट करू? वो तो रोज ही करते है घरमे, यहाँ और भी था करने,समझने को"
हं.. असे एकसे एक सह यात्री आणि यात्रिणी(!)...
तिथे सफाई, इतर कामं करणाऱ्या कर्मचारी बायका पण भेटल्या त्यांच्या बरोबर पण थोडं बोलता आलं..
तर.. शेवटी अक्षयपात्र कडून आम्हाला खिरीसारखा /शिऱ्या सारखा प्रसाद मिळाला आणि आमच्या बसेस गीतम् युनिव्हर्सिटीच्या दिशेने निघाल्या...
थांबा.. अजून दिवस संपला नाही ओ.. किती मोठा असतो दिवस.. विशाखापट्टणम मधला उरलेल्या दिवसाबद्दल उद्या.
प्राची परांजपे
३/०२/२०२३








' ऐकत बसावेसे वाटते. ' नानी
उत्तर द्याहटवा'(लेखिका महोदया, यातले थोडेसे श्रेय पाठकाला द्याल ना,?)
😊🙏
हटवाGlobalization sapateekaran ..all cities look alike and now all villages gave started looking same same..anatakhuna puslya jaane ..hmmmm
उत्तर द्याहटवाHumm
हटवा