भाग १९ - नालंदा
राजगिर रेल्वे स्टेशन वरून नालंदाला पोचलो,
एकुणात "बिहार की ठंड" थंडी होतीच.. मला आधीच जास्त थंडी वाजते नेहमीच, त्यात ताप, अशक्तपणा त्यामुळे प्रचंड थंडी वाजत होती.. बरोबर होते तेवढे सगळे गरम कपडे अंगावर चढवूनच मी बसमधे बसले होते, बरोबरच्या कल्याणीची हालतही फार वेगळी नव्हती..ती पुण्यात MIT ला शिकणारी मुलगी..
बसमधून उतरलो खऱ्या पण नकोच वाटायला लागलं.. एकदा डॉक्टर येऊन मला सांगून गेले की, "की चलो, आप रुक गयी तो आपके साथवाली बच्ची भी रुक जायेगी|" झालं, माझा ताईमोड ऑन... लिनाने बसवून आम्हाला टपरीवर चहा पाजला, आणि शेवटी रिक्षा करून आम्ही नालंदा खंडहर पाशी पोचलो.. जेमतेम एक किलोमीटर अंतर पण चालत नको वाटलं तेव्हा.
आत गेलो, वाटलं जमेल आपल्याला.. विस्तीर्ण परिसर.. प्रत्यक्षात जे उत्खननात सापडलेले अवशेष किंवा इमारती आहेत त्या बऱ्याच आत आहेत. पुरातत्त्व विभागाच्या तिकीट ऑफीसपासून देखील बरंच चालायला लागणार आहे हे लक्षात आलं आणि बाकी सगळ्यांना तुम्ही जा, आमचं आम्ही दोघी बघतो असं म्हणून मोकळं केलं.. चालायला सुरुवात केली अन् लक्षात आलं खूप चालावं लागणार..
Dr.Kurush Dalal, Director of archeology INSTUCEN trust and historian culinary anthropologist आणि शशांक मणी त्रिपाठी सर्व यात्रींशी संवाद साधत होते.. बुद्ध,महावीर, पाली साहित्य,सहावे शतक, नालंदा म्हणजे काय..Nalanda means "giving nothing worthless to anyone"
आपला शैक्षणिक वारसा निर्माण केलेले हे वास्तू समुच्चय आतून फिरण्याआगोदर डॉ.दलाल याबद्दल ऐतिहासिक आणि पुरातत्व दृष्टीने माईक वरून माहिती सांगत होते ,सारे यात्री त्या कडाक्याच्या थंडीत उभं राहून, गवतावर बसून ऐकत होते.
मी आणि कल्याणी एकमेकिंना धरून पुढे चालत गेलो.. खूप वीटा वीटांच्या अर्ध्या रचना.. एके ठिकाणी चवथरा बघून बसलो आम्ही.. तिने काय विचार केला मला माहित नाही पण मी त्या वास्तूला हात लावून बघत होते, जुन्या वास्तू स्पर्शातून, त्यातून येणाऱ्या गंधाने, त्यावरून येणाऱ्या वाऱ्याने बोलतात.. "वक्त को सुंग लेना है " अनेकांना हा डायलॉग आठवत असेल..हं..
खूप खूप बघायची , समजून घ्यायची इच्छा होती.. पण नालंदाला ते पसंत नसावे.. त्या सगळ्या वास्तू मला म्हणत होत्या "हे असं उभ्या उभ्या बघणार का मला?, कुठं गेला तुझा ठेहराव, सगळ्या जुन्या वास्तूंना स्पर्श करण्याची उर्मी... आधी तो उत्साह परत घेऊन ये.. मग थांब इथे,"
मनाचे खेळ म्हणा हवंतर.. पण मला देखील पुरातन वास्तू, शिल्पं... वेळ काढून, रसिकतेने बघायला आवडतात.. ते काय गणित किंवा कूट प्रश्न थोडीच आहे.. पटकन उत्तर काढून चटकन योग्य पर्यायावर गोळा रंगवायला..ते उत्तर इथे निघणार पण नाही आणि गणित सोडवावा तसा हा काही प्रश्न नाही... नालंदा सारख्या वास्तू ही काळाची उत्तरंच तर आहेत... प्रश्न आपल्याला पडतात.
सध्याच्या धावपळीच्या जगाची गती अशा ठिकाणी नाही चालत ...
मनात कितीही विचार पळत असले तरी वास्तवात मला चालायचे त्राण नव्हते.. बस गाठली.. आणि झोपून गेले..
जेवण आणि त्यानंतर RICC auditorium मधे बसल्यावर जरा हुशारी आली.
तिथे परत डॉ दलाल यांनी संवाद साधला
You are what your past teaches you. Respect these places to save it for next generations. If you keep reading/learning, you will keep growing. In this modern world if there's one thing that can save us is to care for each other and co-operate. Take care of the Heritage.
आणि सगळ्यात शेवटी ते म्हणाले We have to mobalise Govt, We have to mobalise People and We have to mobalise ourselves..
भविष्यासाठी इतिहासात डोकावून बघा.. आणि इतिहासाचा हात धरून भविष्य घडवा.
त्यानंतर Baniyaan revolution बद्दल शशांकजी बोलले.. उद्यमशीलता गरजेची आहे, ती येत्या २५ वर्षात भारत घडवण्यासाठी गरजेची आहे...
छान मांडणी केली त्यांनी..
स्पर्धा स्पिरीट गटागटात वाढायला लागलं.. रात्री रेल्वेत परतल्यावर AC chair Car मधे देवरिया समजून घेण्यासाठी सेशन झालं. manufacturing म्हणजे कोअर mechanical industry चा विचार करायची गरज नाही.. त्या त्या गावातील गरज पण लक्षात घ्यायला हवी, हे ग्रुपमध्ये समजले..
मला आता बरं वाटायला लागलं होतं, थंडी वाजत होतीच पण..ताप नव्हता.
नालंदा हुकल्याचा सल मनात होता, आहेच.. मनासारखं फिरून नालंदा बघण्यासाठी मी परत जाणार आहे..येताय का तुम्ही कुणी?
हे दोन दिवस माझ्यासाठी ZIP mode किंवा खरोखरीच inner journey चे गेले.. शारीरिक थकव्या बरोबरच गेलेच पण मानसिक थकव्याचे देखील गेले..
उद्या प्रत्यक्ष उत्तर प्रदेशातील थंडीचा सामना करायचा होता आणि स्पर्धा तयारी पण..
कुणाला खूप थंडी वाजत असेल तर कंबल/जाड पांघरूण मिळू शकते अशी माहिती समजली.. काही यात्रींनी पांघरूण पुरवण्याची व्यवस्था केली होती, यातही व्यवसाय, उद्योग, मदत..
माझ्याकडे दोन पांघरुण आणि एक sleeping bag होती.. त्यापैकी आता माझ्या जवळ फक्त sleeping bag उरली.. पांघरूणं माझ्या पेक्षा जास्त थंडी वाजणाऱ्या नव्या गरजूंकडे कधीच गेली होती.. (आजारू, थंडीरू)
मी अजूनही पूर्ण बरी नसले तरी नवे भिडू तयार झाले होते.. आता त्यांना "सब ठीक होगा, खाना खा लो, कल देवरिया आना है ये दिमाग में फीट कर लो..कुछ हुआ तो हम सब है" असं मी म्हणण्याची वेळ आली होती.
प्राची परांजपे
१८/०२/२०२३





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा