पोस्ट्स

भाग 29 - समारोप

इमेज
साबरमती आश्रमातून बाहेर पडलो, बसेस पकडून आम्ही निघालो होतो. बसेस मधून यात्रींची शेवटची यात्रा समारोप स्थळ EDII Entrepreneurship Development Institute of India. तिथे आम्ही निघालो. विनयजींना दुसरीकडे जायचे असल्याने ते बसमध्ये नव्हते आणि त्या बसचा कॉर्डिनेटर म्हणून त्यांनी मला जायला सांगितले. बसमध्ये डोकावले तर तिथे चक्क दोन फॅसिलिटेटर अगोदरच आपापल्या ग्रुप बरोबर होते. ERC चा मेंबर नाही एवढेच.  खरं म्हणजे माझी तशी तिथे गरज नव्हती. पण सवय जडली आहे विविध शिबिरांमुळे की, दिली आहे ना आणि घेतली ना जबाबदारी मग पार पाडा. बस ड्रायव्हरला गुगल मॅप प्रमाणे चल असं मी सांगितले तर तो अहमदाबादच्या ट्रॅफिक मध्ये आणि शॉर्टकटच्या नादात चक्क चुकला, वेगळ्याच वळणावर वळला. मग जरा मी वैतागले "मै मॅपसे बता रही हू वैसे चलो ,विनयजीने मुझे मॅप लगानेको बोला है " .. तो फारसा ऐकत नाही असं बघून सागरने सांगितले "मॅडम बोल रही है वैसा चलो" मग गाडी रुळावर आली अर्थात बस नीट सुरू झाली .  सागर तपाडिया या आमच्या facilitator बद्दल ओळख करून देण्यासारखं व्यक्तिमत्व आहे.  आवाजापासून देहबोली पर्यंत...

भाग २८ - साबरमती आश्रम

इमेज
Cafe बघून पलीकडेच असलेल्या साबरमती आश्रमात आम्ही निघालो.  This was supposed to be last part of  absorbing leg. (Jagriti Yatra last leg's last part). Some calls it as integration part, some says recollection. शशांक मणी त्रिपाठी गांधींच्या विचारधारेला एका हाताने घट्ट धरून दुसऱ्या हातात नवनिर्माण ध्येय घेऊन चालताना दिसतात. उद्योजकता विकासाबद्दल तळमळीने बोलताना,काम करताना दिसतात तसंच गांधी विचारांचा भक्कम पाया आपल्याला लाभला असंही सांगताना दिसतात. दांडी यात्रा साबरमती पासून सुरू झाली. मीठाचा सत्याग्रह हे एक निमित्त होतं, त्यानिमित्ताने गांधीजींना लोकसंघटन, लोकसहभाग, जनजागृती साधायची होती. १९३० मधे दांडी यात्रेला सुरुवात करून गांधीजींनी साबरमती आश्रम सोडला ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच ते परत आश्रमात परत आले.  जागृती यात्रेचा शेवट साबरमती आश्रमात होतो की बाह्य यात्रेतून प्रेरणा घेऊन आतला प्रवास, आतली चळवळ इथून सुरू होते? आणि काही वेगळं घडवल्या शिवाय परतायचं नाही हा संदेश मिळतो? हा विचार घोळवतच मी आश्रम बघत होते. विनोबा कुटीर, गांधीजीं-कस्तुरबा यांचं निवासस्थान 'हृदयकुंज', प्रार...

भाग २७ - टॉयलेट कॅफे

इमेज
आम्ही तिलोनियाहून परत आलो आणि अजमेर स्टेशनवर रेल्वेत चढलो. उद्या अहमदाबाद... Last stop of Yatra.  Last role model. पहाट 'नेहमीप्रमाणेच' झाली, आम्हाला ती आज शेवटची होती.. उद्यापासून PA Systemबंद.."यात्रीओ सुप्रभात, अब कुछ ही देर मे हम..." वगैरे उद्यापासून नाही. रेल्वेतली आजची पहाट ही तशा अर्थाने सगळे एकत्र असण्याची शेवटची पहाट.. दिवस होता ७ जानेवारी २०२३. आजचा समारोपाचा कार्यक्रम झाला की खूप यात्री इथूनच आपापल्या घरी जायला निघणार होते. त्यामुळे जरा ती सकाळ पण थोडी हळूहळू पुढे सरकल्यासारखी वाटतं होती.कलोल स्टेशनवर उतरलो आणि साबरमती आश्रमाशेजारी असलेल्या Toilet Cafe बघायला, समजून घ्यायला परत बसमधून प्रवास सुरू केला. अहमदाबादमुळे सकाळी सकाळी नाश्त्याला खाकरा, तूप आणि गाठीया.. आज शेवटचा दिवस. छान कपडे,नीट आवरून यात्री बसमधे बसले आणि आज काय नवीन अशा मानसिकतेत खाली उतरले. जयेशभाई पटेल चालवत असलेल्या अनोख्या कॅफे वर आम्ही पोहोचलो.. स्वच्छ परिसर, छान नीटनेटकी झाडं, स्वच्छता यांनी खरंतर मन उत्साही झालं. हे प्रकरण नेमकं काय आहे याबाबत मी खरंच अनभिज्ञ होते, काही गोष्टी मला गुगल क...

भाग २६ - तिलोनिया

इमेज
 तिलोनियाच्या दारात मी तुम्हाला सोडलं आणि वर्तमानातल्या नानाविध व्यापात परत अडकले,गुरफटले, मग थोडा कंटाळा केला लिखाण करायचा, पण नवनवीन गोष्टी समोर येत राहिल्या आणि हवा तसा लिखाणाला सूरच सापडेना..... But..now back to Yatra ,back to Tilonia... चला,परत माझ्याबरोबर यात्रेतील काही शेवटचे पडाव दाखवते, रोल मॉडेलची ओळख करून देते... खूप लिंक तुटली असेल तर या आधीचे काही भाग परत वाचा म्हणजे आपण कुठे होते ते आठवेल....तर....  रंगिबेरंगी भव्य कठपुतळीबरोबर आम्ही आत गेलो, दुतर्फा बेअर फूट कॉलेजमधे काय चालतं एकुणच Work And Reasearch Centre यांचे चालू काम याबद्दल चित्रांसकट फलक लावले होते, आणि गरज पडेल तिथे तिथले कार्यकर्ते माहिती देण्यास तत्पर होते. गूंजप्रमाणे इथे देखील आधी काम पहा किंवा माहिती घ्या. मग ते कुणी उभे केले त्यांना भेटा.. आम्ही तिथे पोचेपर्यंत प्रत्यक्ष बेअर फूट कॉलेजची ..Barefoot college-- म्हणजे खेड्यापाड्यातील महिलांसाठी चालणारे छोटेमोठे कोर्सेस.. त्या दिवशीची वेळ संपलेली , म्हणजे सौर दिवे, हातपंप दुरुस्ती, fabrication, वगैरे प्रशिक्षण जिथे चालतं ते बघणं किंवा त्यात शिकणाऱ्या ...

भाग २५ - राजस्थान .. तिलोनीयाकडे

इमेज
दिल्लीत मध्यरात्र उलटून गेल्यावर रेल्वे सुरू झाली, उद्या राजस्थानातलं तिलोनिया हे ठिकाण बघायचं.. पहाटे दिवस लवकर सुरू झाला, तारीख होती ६ जानेवारी २०२३. 'दर्पणकार' (मराठीतले पहिले वृत्तपत्र ,दर्पण) बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवस. महाराष्ट्रात हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो.. सध्या मी लौकिकार्थाने पत्रकारितेत नसले तरी माझ्यातल्या पत्रकार वृत्तीला मी जागं ठेवलंय आजही, आणि आकाशवाणीमुळे काही दिनविशेष डोक्यात फिट्ट बसलेत.. "आजच्या दिवशी" तिलोनिया बघायचं म्हंटल्यावर खरंतर मला एक "घुंघटामागची गोष्ट" अशी काही storyline लिहावी आणि त्यादृष्टीने बेअरफूट कॉलेज बघावं, किंवा आकाशवाणीसाठी मस्त कुणाची तरी छान मुलाखत किंवा बाईट घेऊन तो कार्यक्रमात गुंफावा असं काहीसं वाटायला लागलं होतं... या भावना आत्ता लिहितानाही इतक्या ताज्या वाटतायत की वाटतंय मुद्दाम यासाठी तरी परत जावं तिलोनियाला.... पर राजस्थान की मिट्टी पर उतरनेको टाईम था अभी....books and movies चं दुसरं सेशन होणार होतं तिकडे मी निघाले होते.. त्याआधी राहून गेलेल्या काही गोष्टी सांगते. मी facilitator अस...

भाग २४ - दिल्ली - पुढे सुरू ..

इमेज
 कालच्या भागात मी म्हटलं तसं ,अंशू गुप्ता ना ऐकून हळूहळू यात्री बाहेर पडत होते,  गूंज बघून सगळे यात्री दिल्लीच्या कमानी ऑडिटोरियममधे जमायला लागले..  तिथे  Opportunities and Challenges of women entrepreneurs हे पॅनल डिस्कशन होते. जागृती यात्रेचा CEO आशुतोष कुमारने महिला उद्योजिकांना बोलतं केलं. Ms Ritika Mehbubani,(रितिका मेहबुबानी) Senior Manager, Customer Engagement and Marketing, ZOHO One,  Ms Niharika Rajeev(निहारिका राजीव), Partner, Incube Angel Network  Sushmita Kaneri (सुष्मीता कानेरी), Creator of Crowd Funding Platform Gullak. यापैकी सुष्मीता आमच्या बरोबर ट्रेनमधेच होती, आमच्या सारखी यात्री म्हणूनच प्रवास करत होती.  महिलांनी स्वतंत्रपणे उद्योग उभा करणे खरंच खूप संघर्षाचं काम असतं हे तिघींना मान्य होतं, पण त्या बरोबरच बायका, आपलं म्हणणं मांडायला आणि फंड रेसिंगसाठी कंपनी पीच करताना थोडक्यात पैसे मागताना जरा उगाचच घाबरतात, मागे राहतात असा मुद्दा पुढे आला. महिला उद्योजिका वास्तविक स्वतःच्या संकल्पनांबाबत खूप खऱ्या आणि स्पष्ट असतात. पण पुरूष सहकारी अ...

भाग २३ - गूंज - अर्थात प्रतिध्वनि (Echo)

इमेज
 तारीख होती ५ जानेवारी २०२३. पहाटे नेहमीप्रमाणे लवकर उठले ..थंडी खूप होती. रेल्वेच्या खालच्या बर्थवर झोपलं की काय वाट्टेल ते केलं तरी खिडकीतून गार वारं काही थांबत नाही..भले तुम्ही industrial tape लावा किंवा तिथे एखादा पलंगपोस बांधा, आणि  स्वतःला स्लिपिंग बॅगमधे कोंबा.. ते वारं  येतच राहतं, तुम्हाला रोजच्या नवीन हवेचा गंध, स्पर्श, करतच राहतं.. आणि तुम्ही अधिकाधिक थंडाळलेपणाचा  अनुभव घेत बर्थवर झोपण्याचा प्रयत्न करत राहता, आणि शेवटी माझ्यासारखे असाल तर थंडी पेक्षा उठलेलं बरं वाटून भल्या पहाटे उठून डबा सोडून AC chair car गाठता...अंघोळ वगैरे असल्या गोष्टी मी नालंदा नंतर सोडूनच दिल्या होत्या. त्यामुळे  पटकन आवरून AC chair car मधे गेले.. रोजचे साथी जमले होतेच.. थोडं ओरिगामी केलं, चहा, गप्पा... आज आम्ही दिल्लीत उतरणार होतो. पण एकुण रेल्वेला होत असलेला उशीर आणि प्लॅटफॉर्म मिळणे वगैरे गोष्टी असतातच..या अशा मधल्या अवधींमधे books and movies वरती informal session व्हायची. ERC केशव ती घ्यायचा. त्याबद्दल उद्याच्या भागात सांगते. दिल्ली ते अहमदाबाद असा यात्रेतील शेवटचा टप्...