पोस्ट्स

भाग ५ - पहिला दिवस रेल्वेतला....

इमेज
स्लिपिंग बॅगमध्ये झोपले खरी पण तोपर्यंत 25 डिसेंबरचे जिंगलबेल सुरू झाले... मी पण मग उठले, थोडी गाणी ऐकली आणि बरोबर नेलेले क्रेप रोल मोकळे करून माझ्या कंपार्टमेंटमध्ये पताकांसारखे लावले. बर्थला, पंख्याला, ओढायच्या चेनला .....  चला.. "भारी वाटतंय" असं चार लोकांकडून ऐकून घेतलं आणि  ख्रिसमस साजरा करून परत स्लिपिंग बॅग जवळ केली. सकाळी जाग आली तेव्हा मी खालच्या अरुंद बर्थवर आणि स्लिपिंग बॅगमधेच आहे या जाणीवेने हायसे वाटले.  बर्थवर स्लिपिंगबॅगमधे झोपण्याची माझी पहिलीच वेळ, सतत वाटत होतं की  स्लिपिंग बॅगमधली मी खाली पडणार.. नाही नाही.. मी स्वतःवर जिंकले होते. जाग आली अन् लक्षात आलं सगळा डबा झोपलाय.  सहाजिकच आहे आज जरा निवांत उठणार सगळे, अख्खा दिवस आम्ही रेल्वेतच असणार होतो. चला सगळ्यात आधी रेल्वेची रचना समजावून सांगते तुम्हाला. शेवटापासून सुरुवात करू.. क्रू मेंबरचा डबा धरला नाही तर,  शेवटचा डबा लेडीज बाथरूम (महिला स्नानगृह) त्यानंतर 17,16,15 हे तिन्ही डबे  महिला यात्री निवास डबे, त्यानंतर दोन  AC Chair Car चे डबे, 12,11 हे Core team members, Dignitaries, ...

भाग ४ - आणि यात्री जमले

इमेज
नवीन दिवस उजाडला,  24 डिसेंबर 2022. चेंबूरच्या हॉटेलच्या छोट्याशा खोलीत योगासने केली, आवरले... पुढचे 15 दिवस केस धुवायचे सोडा, अंघोळ तरी मिळेल का या विचाराने निवांत आवरले. अहमदाबादहून आलेले फॅसिलिटेटर  श्री. हार्दीक हे माझ्याच हॉटेल मधे आहेत असे समजले होते, त्यांनी आणि मी टॅक्सीने यशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉइंटला एकत्र जायचे ठरवले, जिथे आज यात्रेचा  उद्घाटना सोहळा होणार होता. सायन रुग्णालयाजवळ मेघा म्हणून एक Facci थांबलेली तिला पण आमच्या टॅक्सीत घेतले. रिअल इस्टेट मधे काम करणारे हार्दिक  आणि सोलो ट्रॅव्हलर मेघा यांच्या बरोबर गप्पा सुरू झाल्या.  माझ्या व्यवसायाबद्दल बोलणे झाले, अहमदाबादमध्ये काय करता येईल, संपर्क नंबर देणे घेणे झाले. (काल फॅसिलिटेटर प्रशिक्षण झाले असले तरी 72 माणसं वाचून होत नाहीत, आणि गरज पण नसते , त्यामुळे मी यांच्या बरोबर फार बोललेच नव्हते, नंबर तर सोडाच.) सकाळच्या प्रहराचा हात पकडून  उठून धावायला लागलेली मुंबईनगरी टॅक्सीच्या खिडकीतून दिसत होती.मुंबईचं ऊन स्वच्छ,  छान वाटत होतं कारण आम्ही मनातून उद्घाटन सोहळा आणि यात्रींना भेटाय...

भाग ३ - It's time to become Facci

इमेज
तर.. मी 23 डिसेंबरला चेंबूरला उतरले. एकर्स क्लबमध्ये त्या दिवशी म्हणजे मूळ यात्रेच्या आधी एक दिवस सगळ्या फॅसिलिटेटर्स ची मिटिंग किंवा training workshop होतं. किंवा जास्त संयुक्तिक ठरेल की वयाने थोड्या मोठ्या अशा  72 वेड्या लोकांना यात्रेची कल्पना देण्यासाठी एकत्र बोलावलं होतं. ज्याला ते फॅसिलिटेटर्स ट्रेनिंग म्हणत होते. चेंबूरला आवरायला आणखी कुठे जाणार. बसमधून उतरून थेट तिथेच गेले मी.. ERC (Engine Room Club) थोडक्यात जागृती यात्रेच्या आयोजक कार्यकर्त्यांपैकी काहींनी.. एवढ्या लवकर ही का आलीय असा 'look' टाकला. जो आपणही टाकतो सहजपणे.. हे मला जाणवलं म्हणून ते सहजतेने घेतलं मी  आणि मग लगेचच आम्ही छान बोलायला लागलो..  तिथल्याच खरंच 'स्वच्छ' असलेल्या स्वच्छतागृहात मी आवरून घेतलं.. छोटं एअरकंडिशन्ड सभागृह, टेबलांभोवती मांडलेल्या खुर्च्यां, पेन, कागद  आणि LCD सगळं सज्ज होतं. हळूहळू मंडळी जमायला लागली. दोन दिवस आधीच ऑनलाईन फॅसिलिटेटर्स मिटिंग झाली होती त्यामुळे काही चेहरे ओळखीचे वाटत होते. इथून पुढे Facilitator एवढं म्हणायची गरज नव्हती... यात्रेच्या पायंड्याप्रमाणे नुसतं ...

भाग २ - आणि तयारी सुरू झाली

इमेज
 जागृती यात्रेसाठी निवड तर झाली, पुरेशी स्कॉलरशीपही मिळाली.  आता  प्रत्यक्षातल्या आणि माझ्या डोक्यातल्या अनंत उद्योगातून सवड काढायला हवी, हे नक्की झालं. 2022 चे  ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे महिने कमालीचे धावपळीचे असणार आहेत हे मला आधीच माहीत होतं. यात्रा नुकतीच नक्की झाली.. ती असो वा नसो खूप गोष्टी एकावेळी चालू होत्या... रोजचं काम, व्यवसाय, मुली, अभ्यास, हाती घेतलेली छोटी छोटी कामं, मुद्रित शोधन,  दिवाळी, नेवरे फेरी, ट्रेकिंग,  स्पर्धा, पाहुणे,  आधीच ठरलेले प्रवास खूप काय काय... पण ही काही केवळ माझी कहाणी नाही.. कुणाही घर आणि बाहेर असं दोन्ही काम करणाऱ्या बाईचीच कथा आहे. एकावेळी अनेक गोष्टीत रुची असणाऱ्या मुलीचीच ही कथा आहे.. यात्रेमध्ये सहभागी झालेल्या अनेक बायकांची हीच कथा आहे... जायचं तर ठरलंय,पण आपल्या मागे सगळं कसं व्यवस्थित व्हायला हवं...(mam, this is a  typical middle class house women mentality.. as many  young girl Yatris use to say like this during Yatra) तक्रार नव्हती माझी पण ..पण थोडं दडपण यायला सुरू झालेलं.. Production चं काय ...

भाग १ - इच्छा जागृतीची

इमेज
 " मेरी आवाज ही पहचान है.." असं लता मंगेशकरांसाठी जेवढं खरं आहे तेवढंच ज्यांना ज्यांना अनुभवकथन लिहिण्यापेक्षा बोलून सांगायला,पोहोचवायला आवडतं त्यांच्यासाठी पण हे खरं आहे.  सुरुवातीला जरा जास्तच मोठं वाक्य झालंय, समजून घ्याल अशी अपेक्षा. तर, मला देखील गोष्ट सांगितल्याप्रमाणे बोलून अनुभव सांगायला किंवा अनुभव बोलके करून सांगायला आवडतात. जागृती यात्रेवरून परत आल्यावर असंच काही भागात करावं असं मनात होतं.पण , पण काय अहो, माझा आवाज तर ठिकाण्यावर असायला हवा ना. आम्ही अहमदाबाद सोडलं आणि माझ्या आवाजाने मला. ९ जानेवारीला पहाटे सांगलीत पोहोचले, घशातून एकही शब्द फुटेना.. मुली जरा वैतागल्या, आईला इतकं शांत,न बोलता बघायची सवय नाही ना.. पण नवऱ्याला आनंद झाला... चला,  निदान चार दिवस तरी बायको बोलणार नाही, ऐकवणार नाही, सूचना करणार नाही. विनोदाचा भाग सोडला तरी खरंच घसा पूर्ण सुजलाय, दर मिनिटाला चारवेळा खोकला येतोय.. खूप झोप येतीय, पण " परत आलीस का? कशी झाली यात्रा? कधी भेटूया? इतकं काय केलंस तरी काय १८दिवस?" अशा आशयाचे मेसेज आणि फोन यायला लागले. फोन नवराच उचलत होता, मेसेजला मी उत्तर ...