भाग २५ - राजस्थान .. तिलोनीयाकडे
दिल्लीत मध्यरात्र उलटून गेल्यावर रेल्वे सुरू झाली, उद्या राजस्थानातलं तिलोनिया हे ठिकाण बघायचं.. पहाटे दिवस लवकर सुरू झाला, तारीख होती ६ जानेवारी २०२३.
'दर्पणकार' (मराठीतले पहिले वृत्तपत्र ,दर्पण) बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवस. महाराष्ट्रात हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो.. सध्या मी लौकिकार्थाने पत्रकारितेत नसले तरी माझ्यातल्या पत्रकार वृत्तीला मी जागं ठेवलंय आजही, आणि आकाशवाणीमुळे काही दिनविशेष डोक्यात फिट्ट बसलेत.. "आजच्या दिवशी" तिलोनिया बघायचं म्हंटल्यावर खरंतर मला एक "घुंघटामागची गोष्ट" अशी काही storyline लिहावी आणि त्यादृष्टीने बेअरफूट कॉलेज बघावं, किंवा आकाशवाणीसाठी मस्त कुणाची तरी छान मुलाखत किंवा बाईट घेऊन तो कार्यक्रमात गुंफावा असं काहीसं वाटायला लागलं होतं... या भावना आत्ता लिहितानाही इतक्या ताज्या वाटतायत की वाटतंय मुद्दाम यासाठी तरी परत जावं तिलोनियाला....
पर राजस्थान की मिट्टी पर उतरनेको टाईम था अभी....books and movies चं दुसरं सेशन होणार होतं तिकडे मी निघाले होते..
त्याआधी राहून गेलेल्या काही गोष्टी सांगते. मी facilitator असले तरी माझ्याबरोबर आमच्या ग्रुपसाठी आशिष, आणि वॅन असे आणखी दोन फॅसिलिटेटर होते.
आमच्या ग्रुपमधील माझ्या बरोबरचे facilitator आशिष कोलारकर सर.. हा माणूस कमालीचा शांत होता. अत्यंत शिस्तबद्ध होता, उत्तम निरीक्षक होता. तरुण, धडपड्या यात्री बद्दल फार कुतूहल आणि अपेक्षा वाटायच्या त्यांना. ते वयाने, अनुभवाने माझ्यापेक्षा १० एक वर्षाने तरी मोठे होते, पण आमच्या वेळी असं नव्हतं किंवा नकारार्थी ते कधी बोलत नसत.. उलट नवनव्या संधी यात्रींबरोबर ते मांडत, सुचवत. त्यामुळे या तरुणांच्या बद्दल खरंतर त्यांना असलेला जिव्हाळा आमच्या गप्पांमध्ये बोलताना सतत जाणवायचा. वरवर बघता या माणसाकडे सांगण्यासारखे काही असेल असं कुणाला पटणार पण नाही पण, ते slow but steady प्रकारचे होते.. चेहऱ्यावर शांत तरी कुतूहलजनक मिश्किल भाव असायचे त्यांच्या. आम्ही हवी तेवढी चर्चा, गप्पा नाही मारल्या यात्रेत. फारच गरजेपुरते आणि आवश्यक तेवढेच बोललो. पण मध्यप्रदेशातील एक आदब, बोलताना मोजून, माफक बोलणे. उत्तम हिंदी, इंग्रजी. आणि मूळचे मराठी असल्याने पण मध्यप्रदेशातील वास्तव्यामुळे मराठी मोजकं बोलायचे ते. हिंदी फारच पटकन यायचे तोंडात. किंबहुना कोणतीही गोष्ट सांगण्यापेक्षा सुचवणे अशी यांची पद्धत होती. खूप बेसिक लेव्हल पासून चढत जाऊन Datatrack CEO, भोपाळ आणि एकुणात विविध कंपन्यांतील उच्च पदस्थ म्हणून केलेले काम, त्याचा अनुभव मोठा आहे हे लक्षात येत होते. CEO, Datatrack. Tech Enthusiast, Web Developer, Blogger, Trekker. Yoga practice, heritage and culture lover अशी माहिती हळूहळू समजत गेली.. मला अजूनही त्यांनी त्यांची सांगितलेली lifetime line story आठवतीय.. अतिशय साधेपणाने .."हे असं असं झालं.. nothing great or special, but Yes there are achievements as well as failure, deep points also, but it's part of life.." असं ते म्हणाले होते. एका कागदावर अप आणि डाऊन फॉल त्यांनी छान दाखवले होते.. BGT मधे त्यांना रस होता. या आशिष सरांनी नंतर 'यात्रा सार' साठी खूप काम केलं. छोटे छोटे उत्तम लेख त्यांनी लिहिले, नोट्स लिहिल्या.
सांगायचा मुद्दा हा की काही माणसं यात्रेत आजूबाजूला असतात, स्वतः बद्दल भरभरून बोलली नाहीत तरी अनुभव संपन्न असतात, critical analysis, observation mode मधे असतात. एका छान माणसाशी दोस्ती झाली याचा आनंद आहे.
बाकी आमच्या गटात फार नीट lifetime line story exercise झाला नाही याची आजही खंत आहे. Formally गटात बसून हे सगळं सांगणं, ऐकणं जरा नकोच वाटलं होतं आमच्या पैकी अनेकांना.. तर हळूहळू एकमेकांना समजून घेऊ असंच मत पडलं म्हणून मग जुजबी ओळखच झाली timeline story च्यावेळी. यात्रेनंतर मला याचं महत्त्व जास्त समजलं किंवा समजतंय हे नक्की.
'यात्रा सार' चा विषय निघाला म्हणून सांगते, यात्रेबद्दल एक अधिकृत बुकलेट काढलं जातं.. ज्यात प्रत्येक रोल मॉडेल बद्दल, सेशन बद्दल, यात्रा beyond यात्रा, creative addition, poems, असं सगळं मागवून एकत्र केलं जातं.. यात्रेच्या साधारण दिल्ली नंतरच्या टप्प्यात यात्रा सारच्या बैठका (मिटिंग) सुरू होतात.. या ही यात्रेत त्या सुरू झाल्या... It's one type of expression of Yatra ..or integration of yatra. एका छोट्या पुस्तिकेद्वारे यात्रेचं सार काढण्याची, ते लिखित मांडणी करण्याची केलेली ही सुयोग्य धडपड.. आता हे सगळं काम paperless होतं. Drive share करून होतं, तसं ते याही वर्षी झालं. आम्ही ८ तारखेला यात्रा संपवली आणि यात्रा सार चं हे काम जवळपास २६ जानेवारीच्या आसपास संपलं.. यात्रेनंतर देखील यांत्रींमधील एका गटाने लेख, कविता, चित्र, फोटो जमवणे, तपासणे, इंग्रजीतून तोच भाग हिंदीत भाषांतर करणे, मुद्रित शोधन, संपादन करणे, डिझाईनचा भाग बघणे हे सगळं केलं... तर हे सगळं जिने समर्थपणे सांभाळलं, संकल्पना ते शेवट जी याचं नेतृत्व करत होती ती ERC प्रणोती शिंदे.. यात्रा सार साठी आवाहन करण्यापासून, गट जमवण्यापासून, त्यांच्या मिटिंग घेणे, कल्पना समजावून देणे, वेळोवेळी मार्गदर्शन करणे ही जबाबदारी तिच्यावर होती. प्रणोतीशी देखील खूप गप्पा झाल्या का तर नाही कामापुरत्या, मदत घेण्यापुरत्या, यात्रा सारच्या मिटिंगमध्ये किंवा कधी AC च्या डब्यातून जाता येता, कधीतरी शेवटच्या टप्प्यात स्टेशनवर रेल्वेची वाट बघताना... पण मला ही आवडली होती ती तिच्या शांत बोलण्याच्या पद्धतीमुळे.. यात्रा सारच्या मिटिंगमध्ये मुद्दा समजावून सांगताना, परत परत शंका विचारणारे यात्री असोत किंवा साध्या गप्पा मारताना देखील ती तितकीच शांतपणे, न वैतागता उत्तर द्यायची. यात्रा सारचं नेतृत्व करणं ही सोपी गोष्ट नव्हती पण ती फारच नीटपणे हाताळायची गोष्टी तिथे. Behind the Curtain असं तिचं व्यक्तिमत्त्व मला फार भावले.
तर या उलट ERC केशव ... सतत कुणा ना कुणाला पकडून गप्पा मारणे, नवनवीन कल्पना सांगणे, अत्यंत मिश्किल, हिंदी इंग्रजीवर कमालीचं प्रभुत्व असणारा आणि रोजच्या program चा ERC अर्चना बरोबर अतिशय मेहनतीने आराखडा बनवणारा कर्ता धर्ता केशव. केशव म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही असा प्रकार होता. उत्साह तर लहान मुलाएवढा, books and movies session तर फार छान घ्यायचा तो. नाच, गाणं, प्रवास, पुस्तकं, सिनेमे, कला, संस्कृती, यात्रा यावर भरभरून बोलायचा. मदतीला तत्पर. सुरुवातीला एक दोन दिवसांनी मी विचारले की, "सगळं ठीक आहे पण तू करतोस काय एरवी?"
तर याने इकडचं तिकडचं बरंच काही सांगितलं आणि म्हणाला, "इन सबके साथ, by the way I am CA also." धन्य माणूस होता हा. सगळ्यात धन्य झाले मी जेव्हा समजले की आमच्या पलीकडच्या बोगीतली मेघा अग्रवाल ही त्यांची बायको आहे. ती यात्री म्हणून सहभागी होती आणि यात्रीं सारखीच राहात होती, सगळ्यांबरोबर.. फार गोड मुलगी होती ही.. हे एक तरुण, उत्साही जोडपं विलक्षण होतं यात्रेतलं. Airbnb बरोबर देखील हे दोघं काम करतात. एक ERC म्हणून जबाबदारी घेतोय तर एक जण यात्रा अनुभवतीय यात्री बनून.
आज मुद्दाम या काही यांबद्दल सांगितले.. किती व्यक्ती, किती प्रकार, किती स्वभाव आणि किती क्षमतांनी भरलेली माणसं .... हे सारं केवळ जागृती यात्रेतून अनुभवता आलं. माणसं अधिक डोळसपणे टिपायला शिकवते यात्रा.
Books and moviesचं दुसरं सेशन AC chair car मधे झालं. आपल्याला माहीत असलेली चांगली पुस्तकं, सिनेमे याबद्दल सांगायचं, माहिती द्यायची असं याचं स्वरुप होतं. फारच मजा आली. शाहरुख खानच्या देवदास सिनेमाचा शेवट चार वेगवेगळ्या पद्धतीने कसा करता येईल असा विचार करून, तो मांडायचा exercise पण आम्ही केला. खूप छान छान नवीन, सिनेमे, पुस्तके समजली. माझं इंग्रजी अवांतर वाचन जवळपास शून्य आहे हे समजले.
बघता बघता किशनगड स्टेशनवर रेल्वे थांबली, आम्ही उतरलो आणि जेवणाच्या रांगेला लागलो. 'दाल बाटी' चा बेत होता जेवणात.. राजस्थानमधे आहोत असं वाटलं पाहिजे ना..
बसमध्ये बसून आम्ही निघालो तिलोनियाकडे. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात तिलोनिया हे गाव आहे. जिथे बंकर रॉय यांनी स्थापन केलेलं बेअरफूट कॉलेज आणि इतर विकास कामं बघायला आम्ही जात होतो. थोडक्यात यात्रेच्या भाषेत सोशल Entrepreneur model, रोल मॉडेल बघायला निघालो होतो.
वाटेत शेती असली तरी जमिनीची रुक्षता जाणवत होती, थंडी खूप नव्हती पण संध्याकाळी वाढणार असल्याचे गुगल भाऊंनी सांगितले होतेच.
प्राची परांजपे
२०/०३/२०२३



उत्सुकता ताणायची कला चांगली अवगत आहे या हाडाच्या पत्रकार यात्रीला.
उत्तर द्याहटवाहा हा... नाना you are great
हटवाKamal g
उत्तर द्याहटवा😊
हटवा