भाग २४ - दिल्ली - पुढे सुरू ..
कालच्या भागात मी म्हटलं तसं ,अंशू गुप्ता ना ऐकून हळूहळू यात्री बाहेर पडत होते, गूंज बघून सगळे यात्री दिल्लीच्या कमानी ऑडिटोरियममधे जमायला लागले..
तिथे Opportunities and Challenges of women entrepreneurs हे पॅनल डिस्कशन होते. जागृती यात्रेचा CEO आशुतोष कुमारने महिला उद्योजिकांना बोलतं केलं.
Ms Ritika Mehbubani,(रितिका मेहबुबानी) Senior Manager, Customer Engagement and Marketing, ZOHO One,
Ms Niharika Rajeev(निहारिका राजीव), Partner, Incube Angel Network
Sushmita Kaneri (सुष्मीता कानेरी), Creator of Crowd Funding Platform Gullak.
यापैकी सुष्मीता आमच्या बरोबर ट्रेनमधेच होती, आमच्या सारखी यात्री म्हणूनच प्रवास करत होती.
महिलांनी स्वतंत्रपणे उद्योग उभा करणे खरंच खूप संघर्षाचं काम असतं हे तिघींना मान्य होतं, पण त्या बरोबरच बायका, आपलं म्हणणं मांडायला आणि फंड रेसिंगसाठी कंपनी पीच करताना थोडक्यात पैसे मागताना जरा उगाचच घाबरतात, मागे राहतात असा मुद्दा पुढे आला.
महिला उद्योजिका वास्तविक स्वतःच्या संकल्पनांबाबत खूप खऱ्या आणि स्पष्ट असतात. पण पुरूष सहकारी असल्याशिवाय कंपनी प्रेझेंटेशनला कारण नसताना दडपण घेतात. पण ज्याला start up idea म्हणतात त्यासाठी महिलांमध्ये चांगल्या क्षमता जाणवतात. फक्त आर्थिक गोष्टी आल्या की त्या बिचकतात, असं निरीक्षण नोंदवले गेले.. core partner कोण आहे हे पण फार महत्त्वाचे आहे, सुष्मीताने सांगितले की माझी आईच बिझनेस पार्टनर आहे त्यामुळे खूप मोकळेपणाने बिझनेस प्लॅन चर्चा करता येते.
रितिका ने सांगितले की ZOHO ने महिला उद्योजकांसाठी special schemes तयार केल्यात त्याचा लाभ जरूर घ्या.
निहारिकाने सांगितले की, महिला उद्योजक काही मांडत असतील तर सहाजिकणे माझ्याकडून soft corner ठेवला जातो, सवलत दिली जात नाही पण अधिक तपशीलवार समजून घेतले जाते.तिच्या कंपनीने अनेक महिला उद्योजिकांना फंडींग केल्याचा आनंद तिने व्यक्त केला..
कमानी सभागृहात उपस्थित यात्रींपैकी महिला यात्रींनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे त्यांनी दिली.. पण एकुणात long way to go ...असंच चित्र दिसलं. एक तर घरचा उद्योग सांभाळणाऱ्या महिला उद्योजक दिसतात किंवा नवऱ्याबरोबर सुरू केलेला.. पण पूर्ण स्वतः उभा केलेला, चालवलेला मोठा आणि मूलभूत उद्योग कमी दिसतो, पण प्रमाण वाढतंय आता.
यातही महिलांनी तंत्रज्ञान अंकिकारले पाहिजे, आत्मसात केले पाहिजे ही गरज बोलण्यातून पुढे आली. आर्थिक नियोजन महिला अर्थातच घरात पण तेच व्यवसायाची करताना देखील अधिक आत्मविश्वासाने पुढं झालं पाहिजे या नोटवर चर्चा थांबली. चांगली चर्चा झाली..एकुण ZOHO ची साईट काढून अभ्यास करायची गरज बऱ्याच महिला यात्रींनी बोलून दाखवली.. तुम्ही देखील भेट द्या ZOHO ..just explore the site.. जागृती यात्रेचा छोट्या महिला उद्योजिकांना करून घेतला तर खूप फायदा होतो ,एवढं नक्की नमूद करावं वाटतंय.. शेवटी तुम्हालाच ठरवावं लागतं ना कि नंतर कोणाशी संपर्क ठेवायचे, काय शिकत राहायचं, आणि कुणाकडून ... कुणाच्या मस्ती लक्षात राहिल, कुणाच्या रोल मॉडेल लक्षात येईल, कुणाला नवीन कल्पना सुचेल,व्यवसाय संधी आणि शक्यता दिसतील, उद्योगशील माणसं भेटतील, कुणाला उद्योगांपलीकडची माणसं भेटतील, कुणाला माणसांपलीकडचं काही दिसेल... रेल्वे तीच, यात्रा तीच कोण काय घेऊन जाईल, कुठे कसं वापरेल, आणि काय घडेल हे सांगणं तसं अवघड आहे.. निदान उद्योशील भारत घडवण्यासाठी एक ठिणगी या यात्रेत पडते एवढं नक्की. मग तो उद्योग सामाजिक असेल, किंवा डिजिटल. माणूस हाच केंद्रबिंदू आहे त्याला bypass करणे अवघड आहे हे नक्की समजते..
कमानीत (Kamani Auditorium) उशीर होत होता तरी पण एक उत्सुकता आणखी ताणणं बरोबर नाही म्हणून मग पटकन BGT competition results सांगितले गेले... विविध विषय गटांत स्पर्धा (presentation) झाले हे मी मागे सांगितले होते.. आमच्या ग्रुपच्या एका गटाचा चक्क नंबर आला.. 'उद्यम on wheels ' हे कंपनीचे नाव....वाह.... ग्रुपमधे आनंद झाला खूप आणि दिल्लीतला उशीर गोड झाला असं वाटलं... सगळ्या यात्रेत पार्टी मूड सुरू झाला.. इथे स्पर्धा असली तरी अत्यंत निकोप प्रकार होता, त्यामुळे कोणतेही रुसवे फुगवे ,पार्शालिटी वगैरे चर्चा पण झाली नाही यात्रीं मधे.. उलट नवनव्या start up idea exploration सुरू झाले.
परतीचा प्रवास आधी बस आणि मग आमच्या रेल्वेतून सुरू झाला... अर्थात विखुरलेले यात्री परत येऊन..हेडकाऊंटचं दिव्य पार पडून रेल्वे धावती व्हायला मध्यरात्र उलटून गेली. जेवणाचा एकत्रित आनंद आम्ही घेतच होतो, मग तो प्लॅटफॉर्मवर असो वा रेल्वेत, आता हे सगळं आमच्या घरचं आणि सरावाचा भाग झालं होतं पण आज दिल्ली ब्लॉग संपवताना एकदम आठवण झाली म्हणून हा एक असाच फोटो...
आता उद्या तिलोनिया..... वंदना कडून इतकं ऐकलं होतं की खूप आतूरता होती तिलोनियाची. यात्रेत मूळचे मारवाडी, राजस्थानी खूप यात्री होते, 'पधारो म्हारो देस' म्हणत उद्याच्या गप्पांमध्ये रात्र चढत गेली... पर दिल्ली की 'गूंज' तो अब तक मेरे कानोमे थी| त्या दिवशी रात्री माझ्या शालीला जास्तच उब असल्याचं मला जाणवलं...
प्राची परांजपे
१६/०३/२०२३



वा, उद्या तिलोनिया.. आता हे नाव किती जवळचं वाटतं.. २००९साली जागृती यात्रेतून पहिल्यांदा तिथे गेले... प्रबोधिनीतल्या माझ्या मैत्रिणींनी हे पहायला पाहिजे असं मनात होतं.. प्रत्यक्षात १०-१२ वर्षांनी हा योग २०२२ मध्ये आला.. आता तुझ्या लेखनातून पुन्हा तिलोनियाची सफर होईल.. पुढील लेखाच्या प्रतीक्षेत...
उत्तर द्याहटवावंदना तुझ्यामुळेच तर या यात्रेला जाण्याचा योग आला आणि तिलोनियाला पण. 🙏
हटवाDue to journey from Gandhidham-Kutch to Mumbai and onwards Gorakhpur- Nepal I missed reading in travelling due to connectivity and I now at Limbuni Nepal completed reading of last two episodes at 11.30 night to day on 17-03 and giving my joyous, Courageous and full of courtesy thanks to Prachi for creating same fervor and much more entrepreneurial insight to every readers and covering entire tallent , introduction of participants and information and what not....keep it up Mrs.Ptachi and Mr.Amar your valuable sharings through writing and onwards in publishing books too...
उत्तर द्याहटवाThank you..
हटवाCan I know your name pls
हटवाखरच महिला व्यवसाय करण हा किती अवघड टास्क असतो यांच्या विचारातून आणि आपल्या अनुभवावरून समजतं
उत्तर द्याहटवाहं
हटवा