भाग १५ - विशाखापट्टणम .. पुढे सुरू

 विशाखापट्टणमचं अक्षयपात्र बघून आम्ही GITAM University Campus मधे आलो. भलं मोठ्ठं आवार आणि विविध विद्याशाखांच्या इमारतींचा समुच्चय.

संध्याकाळची चहा, पकोड्याची वेळ काही आमचे केटरिंगचे ताऊजी चुकून देत नाहीत, आम्ही पोचेतो यांनी Tea, snacks मांडलेलेच होते.. आणि इथेच रात्रीचे जेवण आहे हे देखील समजले कारण एका कोपऱ्यात स्वयंपाक चालू झालेला.

आधी मला Geetam University नाव आहे असं वाटत होतं.. म्हणजे याच युनिव्हर्सिटीमधे start up and लाईफ कोच म्हणून काम करणाऱ्या वासुदेवन् ला भेटेतोवर ( हा यात्रेमधील एक Faccilitator होता. अत्यंत साधी राहणी, प्लास्टिक वापर जवळपास नाही, सुतीच कपडे वापरतो, जेवण पण बसूनच करतो, उभ्याने जेवत वा पाणी पित नाही हा... गरज पडलीच तर हा गटाला घेऊन खाली प्लॅटफॉर्मवर बसत असे पण उभं राहून कधीच जेवताना दिसला नाही.. अतिशय नम्र पण तितकाच त्याने ठरवलेल्या जीवनमूल्यांवर, मतांवर आग्रही असायचा. एकदम हटके माणूस होता, वेगळाच होता.. आमच्या व्हायच्या गप्पा येता जाता, कधी ठरवूनही. life time line activity याने फार छान घेतली त्याच्या ग्रुपमधे.. ) मला वाटतं होतं की संगीताशी संबंधित काही शैक्षणिक संकुल वगैरे असेल पण मी सपशेल चूकले होते..त्याचं स्पेलिंग Geetam नसून GITAM असं होतं. 

Gandhi Institute Of Technology And Management. ही Private Deemed University आहे.

Dr M. V. V. S. Murthi  1980 साली विशाखापट्टणम इथं सुरू केली. 

आता हैदराबाद, बेंगळुरू मधे देखील शाखा आहेत.  Gandhian Studies, Architecture, Law, Institute of Technology, Science, Management, Medical, Pharmacy, Nursing अशा विद्याशाखात इथं शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. खरंतर आम्ही अजिबात ही युनिव्हर्सिटी बघायला आलो नव्हतो किंवा अगदी बेंगळुरूला सुद्धा Oxford University बघायला असे गेलो नव्हतोच,  तर सगल ५५० यात्री बसू शकतील असं भलं मोठ्ठं सभागृह (Auditorium) इथं होतं. अर्थात गेल्या १४/१५ वर्षातले संपर्क,काम, जागृती यात्रेचं नाव यामुळे ही ठिकठिकाणी आम्हाला सगळे बसू शकतील अशी सभागृह मिळाली.

एक pannel discussion झालं, विषय होता Agriculture,  Agro processing, Marketing.. 

१) Prasad Udandarao* प्रसाद उदंडराव Founder and president of VIDYA Foundations

२) Prabhav Garudadhwajan प्रभाव गरुडध्वजन Director, Easy Krishi (Bangalore & Singapore)

३) Yelesh Sayala येलेश सायला,  Zonal Business Manager,   https://www.ourfood.co.in/aboutus

तिघंही जणं फार साध्या भाषेत बोलत होते. 

# शेतकऱ्यांकडून माल घेऊन प्रक्रिया करून किंवा धान्य स्वरूपात विकण्याचा उद्योग. त्यासाठी शेतकऱ्यांचे गट बांधणे, गरज पडल्यास त्यांना प्रशिक्षण, जिथे कच्चा माल आहे तिथेच प्रक्रिया उद्योग थाटणे. (५०किमी परिसरात) अन्यथा transport cost वाढते,  दळणवळण, हाताळणी नुकसान वाढते.

 # शेंगदाणेच विकायचेत तर भारतात विकले पण जरा मोठा विचार करून बघितला, दुबईत, दक्षिण आशियाई देशांमध्ये शेंगदाणे विकण्याचा विचार केला, कसं करत गेलो हे सांगितले.

थोडक्यात शेजारील देशांत भारताच्या कोणत्या शेतमालाला मागणी आहे याचा शोध घेणे. Geographical position of India and its neighboring countries who are importers of food products from India. 

# Increasing the shelf life of products through value addition. वस्तू टिकवण्यासाठी काय काय करता येईल याच्या शक्यता आजमाऊन पाहणे, प्रयोगशील असणे, technology ची आणि तज्ज्ञांची मदत घेणे.

  # आजही शेतीमध्ये सरकारच Biggest stakeholder आहे.

# Selecting of machinery: once crop is selected. Start from here and look at the end. How u can sustain till the end of 5 years. कमी वर्षांचा विचारच करायचा नाही..५-७ वर्षांचा विचार करून उद्योग सुरू करायचा. शेती आहे, हे software नाही कमांड दिली की रन व्हायला... ठरवू तसंच घडेल असं नाही..दरवर्षी पाऊस पाणी बदलू शकतं. Based on above, start is being done. Once all funds are put up in machinery, we will be short of working capital.

आपण कुठून सुरुवात केलीय , कुठे पोचायचं याचा आराखडा हवा.. मशिनरीला महत्त्व तर आहेच पण ती कुठे, कधी वापरायची यांचे ताळतंत्र उत्साहाच्या भरात सुटू देऊ नका.. काही गोष्टी We should be clear about from where we have to start and where we have to go.

कुठल्या भागात तुम्ही काम करताय त्या शेतीवर, तिथल्या शेतमालावर तुमचा विश्वास हवा.

शेतीत जुन्या काही समजूती असतात, ठोकताळे असतात त्यांचा आदर करायलाच हवा, दरवेळी "विज्ञान" लावून चालणार नाही. आधी शेतातल्या प्रत्यक्ष राबणाऱ्या हातांबरोबर राहून "सज्ञान" होणं पण गरजेचं असतं.. तर पुढे जाणं सोपं होतं.

 Learn from Established things. Sometimes they teach more than management schools.

You should have enough working capital to sustain even if some customer does not pay... Then only think about High volume, and  low margin business.

Value addition करताना कोणासाठी करतोय , ग्राहक कोण आहे याचा विचार करा.

There should be atleast one particular niche that needs to be cracked to get into market. eg, there is a huge demand of certain type of Indian chilli in Malaysia but issue is shelf life of chilli gets over during transportation due to which this was not a feasible business.

How to increase shelf life of chillies,

तर स्वतःच्या अनुभवातून पॅनलमधून सांगितले की , the pesticides from the surface of fruits/vegetables by putting them in certified organic shelf life extension solution and so many studies on this have been done by IIT's on this type of solution. The result is- extension of shelf life. आता हा बिझनेस कसा चालू आहे याबद्दल सांगताना ते म्हणाले की आता या मिरच्या कमीतकमी wastage मधे निर्यात करण्यात यश आलंय. हा बिझनेस चालू आहे. 

Look beyond shores. Sell from India. Don't go for high risk trade (low margins) 

 मग ग्राहक  organic agricultural products का घेत नाहीत  तर High Cost, No Trust, No Reliability यावर चर्चा झाली.

मग नेहमीचे मुद्दे होतेच packaging, value addition in marketing वगैरे.

On being asked about the pro's and cons of B2B and B2C, .. B2B business is sustainable. It might take time but it works. Eg. a doctor will stick to it's Pharma unlike a normal customer who changes Pharma instantly due to discounts or other reasons.

B2C is quite risk intensive.. हं, तसंही खरंच आहे प्रत्यक्षात ग्राहकांना विकणे हे challenging असतेच. 

तर, खूप खूप छान झालं हे सेशन... मला फारच आवडलं..एकतर तिघंही जणं शेती कशाशी खातात हे माहीत असलेले होते, हवेत गप्पा नव्हत्या.. तूरडाळ कशी काढतात किंवा आलं विकायचं तर ते कुठे पिकतं, तिथल्या समस्या समजून घेऊन पुढं जाणारे होते.. हे तिघेही फक्त computer वर बसून digital market मधे भाजी विकणारे नव्हते तर, त्यांनी ते धान्य, भाजी, शेतमाल हातात घेऊन बघितला होता.. हे फक्त programmer, site designer नव्हते तर माती हाताला लावून बघितलेले होते, आणि तो व्यवसाय म्हणून कसा पुढे नेता येईल यावर टक्के टोणपे खाऊन शहाणे झालेले होते.

शिक्षण घेऊन मातीत उतरले की technology and soil can go  hand in hand.. त्यांचे अनुभव ऐकताना हुरूप आला, हे होऊ शकतं असं परत वाटलं... आणि आपण बरेच जण शेती करताना भरपूर तंत्रज्ञान वापर करत नाही आणि केला तरी डोळसपणे करत नाहीत. ....थोडं पिकवणाऱ्या,राखणाऱ्या लोकांचं ऐकायचं आणि थोडं आपलं म्हणणं रेटत राहायचं यातूनच तंत्रज्ञान शेतीत आणि शेती करणाऱ्यांमधे पाझरत जाईल.

आंब्याच्या बागेत ज्या फवारणीला ५ दिवस लागायचे आणि भरपूर पाणी .. तीच फवारणी केवळ दोन दिवसांत कमी पाण्यात , उपलब्ध संसाधनांचा पूर्ण क्षमतेने विचार,वापर करून कशी करता येते हे मी अनुभवलं आहे.. आणि यासाठी कुशल तंत्रज्ञ मातीत उतरला तर घडणारी किमया मी घरी बघितलीय त्यामुळे यावरचा विश्वास दृढ झालाय.

शेती,फळशेती, फुलशेती करणे आणि त्याची विक्री करणे, शेतमालाला बाजारपेठ मिळवणे, व्यवसाय संधी शोधता येणे.. या दोन खरंतर स्वतंत्र गोष्टी आहेत,एकाच व्यक्तीला हे दोन्ही जमेल असं नाही, त्यामुळेच विविध क्षमतेच्या लोकांनी एकत्र येऊन व्यवसाय केला पाहिजे.

एक नक्कीच की हे पॅनल डिस्कशन खूप छान झालं, आणि जरा मला माझ्या रोजच्या जगण्याशी जवळचं वाटलं. केवळ पारंपरिक विचार करून उपयोग नाही, शेतीच्या कामात latest technology वापर वाढवायला हवा, त्यासाठी  खरंच गरज काय आहे हे तंत्रज्ञ लोकांनी प्रत्यक्ष जाऊन बघायला हवे. (ज्या कंपनीला यंत्र विकसित करायचंय त्यांच्या survey team ने असं म्हणूया हवंतर) बरेचदा उपयोगी यंत्र विकसित होतात ही, पण अनेकदा अनुभव असा आहे खूप मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करणारी किंवा मोठ्या जागेतील शेतीत वापरण्यायोग्य यंत्र तयार होतात... सध्या गरज वाटते, सोप्या, साध्या यंत्रांची...

ओलं काजू बी काढलं आणि त्यातून जर ओले काजू वेगळे करून विकायचे ठरवले (ओल्या काजूच्या उसळीसाठी) तर आजही ते दाभण  घेऊन हातानेच मोकळे करावे लागतात, हात जळतातही... अशी बरीच उदाहरणे आहेत.  तसंच शेतीतल्या माणसांच्या मुलभूत क्षमता पण टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.. नारळ काढायची यंत्रं आली तरी झाडावर चढण्याचे कौशल्य गमावून चालणार नाही..

शेतकऱ्याच्या मुलाला शेतात उभं राहून मधमाशा पाळताना किंवा झाडावर चढताना, विळ्याने रान तोडायला लाज वाटायला नको असेल तर प्रशिक्षण वर्ग आयोजित करायला हवेत.. कधी वाटतं याला ग्लॅमर प्राप्त करून द्यायला हवं... पुस्तकी शिक्षण गरजेचं आहेच पण पिढीजात कौशल्य विसरून चालणार नाही मग भले तो मुलगा प्रत्यक्ष शेती न करो पण वेळ पडली तर ही कौशल्ये त्याला त्याच्या शेतीत उपयोगी पडतील पण कदाचित तंत्रज्ञान विकसित करायला देखील उपयोगी पडतील..अशा मूलभूत कौशल्यांची यादी करून पुढच्या पिढीत ठरवून हस्तांतरित करता येतील का ही कौशल्ये?

भात लावणी यंत्र आले तरी चिखलात पाय रोवून चार चार तास कंबर मोडून पेरणीची क्षमता टिकवायला हवीच. आंबे, फणस काढायची उद्या यंत्रं विकसित होतील कदाचित, पण आंबा काढायला तयार झालाय का? देठाजवळचा रंग बदललाय का? किंवा  हा फणस कोयरीचा निघेल, गऱ्याच्या भाजीचा की पिकायला आलाय हे कळायला माणसाचीच नजर लागेल.. खूप छान ऐकून चर्चा करत आम्ही बाहेर पडलो.

ओरिसाच्या Facci नीना मॅडम auditorium मधे शेजारीच बसल्याने काही नवीन गोष्टी समजत होत्या, तिथलं वादळ, पूर यांमुळे शेतीच्या समस्या वगैरे पण त्या सांगत होत्या.. (आम्हाला सांगलीत एक मोठा पूर आला तर नको नको झालं, तिकडे काय काय घडतं ते ऐकूनच ,बास बास वाटलं. ) मोती कसा तयार करतात.. totally natural मोती असा आजकाल दुर्मीळ आहे.. मोत्यांची शेती करताना सगळं नैसर्गिकच फक्त शिंपल्यात एक injectable intervention करून सोल्यूशन सोडायचे आणि.. बाकी सगळी वाढ नैसर्गिक होते, वगैरे गप्पा झाल्या. सगळं सोडून ही बाई मोत्यांची शेती करत असेल यावर खरंतर Facci meet च्या  दिवशी माझा विश्वास बसला नव्हता..कारण असं काही असतं हेच मला नवीन होतं. मी जाणार आहे एकदा त्यांचे शेती प्रयोग बघायला ओरिसाला.. ओरिसा सरकार start up साठी किती प्रोत्साहन देते हे ही समजले. ही बाई पण फार वेगळी होती, विशेष होती. तिची आयुष्यात एकटीने उभं राहण्याची ताकद वाखाणण्याजोगी होती. कुटुंब व्यवस्थेबद्दलची तिची स्वतःची, अनुभवातून आलेली मतं होती... संपूर्ण यात्रेमधे ....जागृती यात्रेच्या फायनान्स, फंड रेझिंग बघणाऱ्या, मुळात बरीच वर्षे pharmacy क्षेत्रात वरच्या पदांवर काम केलेल्या ललिता मॅडम आणि या ओरिसाच्या नीना मॅडम. माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने मोठ्या ताईच वाटायच्या.. त्या होत्याच माझ्या ताई.

जाता येता दिसल्या आणि आम्ही काही बोललो नाही, विचारपूस केली नाही, हातात हात घेतले नाहीत असं झालं नाही.. 

तर असो.. 

आज आणखी एक विषय डोक्यात होता, ती व्यक्ती शोधायची होती...

अक्षयपात्रमधील चंद्रा गौरा दास यांचं बोलणं ऐकत असताना जवळच लगेच त्यांच्या इंग्रजी बोलण्याचं हिंदी भाषांतर करून कुणीतरी सांगतंय हे ऐकू आलं मला.. नजर फिरवून बघितलं तर एक सुरवार कुर्ता घातलेला, बुटका माणूस मोबाईलवरून हे भाषांतर सांगत होता... इंग्रजी समजत नाही अशांसाठी एक लिंक दिलेली असायची, ते भाषांतर हा माणूस करतो तर ..

ओह तर हाच तो सकाळी आम्ही रोज PA system वर रेल्वेत ऐकतो तो आवाज.. "सभी यात्री कृपया ध्यान दे" किंवा "आज हम मंदीरोंके शहर मदुराई मे पधार रहे है" वगैरे.. काय आवाज होता..वाह.. कदाचित आकाशवाणीत काम करत असल्याने मला सावकाश, शांत, शुद्ध हिंदीत आणि भाषेचा लहेजा सांभाळून बोलणारा हा आवाज पहिल्या दिवशीच आवडला होता.

GITAM च्या प्रांगणात जेवणाच्या रांगेत माझ्या मागेच हा आवाज असणारी व्यक्ती होती. मला बरेचदा  वाटायाचं हा सकाळचा आवाज ERC ब्रिजेश किंवा ERC केशवचा आहे , पण अक्षयपात्रमधील फोनवर भाषांतर करतानाचा आवाज ऐकला आणि समजले. ही व्यक्ती विनय निखरा होती. मग गप्पा सुरू झाल्या.. खरंतर data processing, software मधला हा माणूस. पण इंग्रजी -हिंदीवर छान प्रभुत्व. भाषांतराची फेलोशिप मिळाली आहे यांना.

इंग्रजी छान बोलतात खूप जणं, पण पटपट भाषांतर करून हिंदीत सांगणं, ते पण मिठासभरी हिंदी, शुद्ध हिंदी.. वाह.. सरळ नमस्कार करून टाकला माणसाला.

मग त्यांनी फेलोशिप बद्दल सांगितले. Voice over artist यात्री शामलला पण बोलवून घेतले आणि मग परत गप्पा झाल्या. हे दुभाषकाचं चांगलं क्षेत्र आहे, संधी भरपूर आहेत.. भाषांतर करणारे खूप असतात पण दोन पैकी एक भाषा उत्तम आहे त्यात उत्तम बोलता येतं आणि भाषांतर जमतं अशांना भरपूर संधी आहेत असं समजलं. चला मला एक नवीन क्षेत्र समजलंय बघूया..."त्यासाठी इंग्रजीवर भरपूर काम करायला हवंय ताई..." मला मागून एका मराठी यात्रेकरूनी टप्पू दिला.. आणि मी तो जेवणाचाच भाग समजून खुल्या दिलाने स्वीकारला, खाऊन टाकला.. आता पचवून रवंथ करणे चालू आहे..

नंतरच्या टप्प्यात विनय बरोबर छान गप्पा व्हायच्या. तिलोनियामधे विनय गायब असताना,  बेल्जियमच्या यात्रींनी इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नांचं भाषांतर करून  तिथल्या माहिती देणाऱ्या  दीदींना हिंदीत  ते सांगायचा उत्साही प्रयत्न पण मी केला. तोपर्यंत official translator person Vinay came and I stopped.. and we all laughed.


तर अशीही एक गंमत..

GITAM च्या आवारात जेवण झाल्यावर बराचवेळ सगळे तिथेच रेंगाळत होते. प्रत्येक जण आपल्याला हवे तिथे, हवे त्यांच्या बरोबर रेंगाळत होता. BGT गट पण समजले होते त्यामुळे गटागटाने चर्चा सुरू झाली होती पण अजून त्याला गती नव्हती म्हणाली तशी.

जेव्हा छान हवा असते, रात्र फार झालेली नसते, गाणी वाजायला, म्हणायला कधी सुरुवात होते कळत नाही, तेव्हा पण कळलं नाही आणि बघता बघता यात्रींनी फेर धरला गरबा, दांडीया, झिम्मा गोलात सुरू झाले.. राजवीने एक एक स्टेप शिकवायला सुरुवात केली.. आणि तरुण यात्रींनी मुक्तपणे ताल धरत शरीराला गाण्याच्या आणि टाळ्यांच्या स्वाधीन केले. 

ते बघायला फार मस्त वाटत होतं.. पण मला तेव्हा देखील त्या नाचात स्वतः सहभागी व्हावे असे वाटले नाही..पण दाद मात्र मी दिलखुलासपणे देऊ शकत होते..मी त्या स्वच्छ परिसरात खाली बसले, क्षणभर जमिनीला पाठ टेकवून आकाश बघत राहिले... वरच्या 'अक्षयपात्रातून' अखंडपणे काही पाझरत खालती येतंय असं वाटत असतानाच कुणी यात्रींनी 'ये जो देस है तेरा, स्वदेश है मेरा...' हे स्पिकरवर लावलेलं गाणं ऐकू आलं आणि वरच्या अक्षयपात्रातून पाझरलेले कण समोरच्या यात्रींमधे सळसळताना दिसले... 


विशाखा पट्टणम स्टेशन वरील भिंत 

प्राची परांजपे 

९ फेब्रवारी २०२३

टिप्पण्या

  1. अभ्यासपूर्ण सहजपणा
    पुस्तक होणार याचं. नक्की..

    उत्तर द्याहटवा
  2. अभ्यासपूर्ण सहजपणा.
    छान पुस्तक होणार याचं.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग १ - इच्छा जागृतीची

भाग ३१ - यात्रा सफल संपूर्ण

भाग २५ - राजस्थान .. तिलोनीयाकडे