भाग १८ - रेल्वे प्रवास आणि आजारपण

१ जानेवारीचा दिवस खरंतर नेहमीसारखाच उगवला.. आज दिवसभर रेल्वेत असणार होतो आम्ही. त्यामुळे मग पहाटे लवकर जाग आली तरी मी बोग्यांमधली उड्डाणे करत स्नानगृहाचा डबा गाठला नाही, गारठाही होताच पण तरी सुसह्य होतं डब्यातलं  वातावरण... आदल्या रात्री आम्ही मोठ्या शिताफीने सर्व खिडक्या शक्य तितक्या घट्ट लावून घेतल्या होत्या आणि फटींवरून सेलोटेप चिकटलेल्या होत्या.. होता होईतो थंडी आणि अती गार, बोचरं वारं थोपवण्याचा भाबडा प्रयत्न... पण पुष्कळ यशस्वी वाटत होता, निदान त्या पहाटे तरी.



नेहमीप्रमाणे AC chair car गाठली, सूर्योदय व्हायचा होता, छान वाटतं होतं तिथं.. गप्पा, ओरिगामी, झुंबा चालू होतंच.. आज काही रोज न येणारे यात्री पण आले होते.. काही तिथेच एक chair Car मधेच रात्रभर झोपलेले आहेत असंही समजलं, दिसलंच. चहाबाज एकत्र जमले होते... आम्ही काही फॅसिलिटेटर आपल्याला नेमकी BGT साठी किती आणि काय मदत करायचीय हे समजून घेत होतो.

 डब्यात परत जायची अजिबात इच्छा नव्हती कारण पाऊणहून अधिक डबा कालच्या जागरणामुळे, आणि आजच्या जरा निवांत वेळापत्रकामुळे जागा व्हायचा  होता... तरीही बघता बघता ७.३० वाजले म्हणून आणि मला पण जरासं झोपूया परत, असं वाटल्याने परत cohort मधे आले आणि नाश्ता आला की मला उठवा सांगून झोपले.. "जरा जास्तच थंडी आहे का गं?" असं विचारलं पण फारशी कुणाला थंडी वाजत नसावी असं दिसलं... आणि लक्षात आलं, की बहुतेक आपल्याला ताप चढतोय...

नाश्ता, जेवण आलं आणि गेलं.. बळजबरीने थोडं खाल्लं. पण एकुणात सकाळी ७.३० पासून sleeping bag पकडली होतीच. मधेच तडफडत जाऊन कुठे थर्मामीटर मिळतोय का बघितलं, चक्क मिळाला.. ताप मोजला ..102 होता. परत येऊन होते तशीच झोपून टाकलं.. जवळची औषधं चालू केली, डॉक्टरांकडे जाण्याची इच्छा आणि मुख्य म्हणजे ताकद नव्हती.. वाटेल बरं असं म्हणून पडून राहिले.

रेल्वेमध्ये मात्र BGT स्पर्धेसाठी जोरदार चर्चा, काही ठिकाणी वाद, नरम गरम खटके, Google search, team building, business Ideas असे सगळं गरम गरम वारं वाहायला लागलं होतं, आणि माझ्या शरीराच्या तापमानाचा पारा देखील गरम होत राहिला. आमच्या ग्रुपमध्ये BGT साठी ERC कडून पाडण्यात आलेले गट बरोबर नाहीत हे गेल्या दोन दिवसांपासून जाणवत होते, आशिष सरांना मी म्हंटले पण. त्यांनी पण प्रयत्न केले.. पण कुणाला न दुखवता यात सुधारणा कशी करता येईल यावर विचार करत होते..  दोन्ही गटामध्ये वेगवेगळ्या क्षमतेची मुलं-मुली हवीत, आणि सर्वांना संधी मिळायला हवी असं वाटतं होतं.. त्यासाठी झोपूनच फोनवरून बोलून, मेसेज आणि तिथे आलेल्या, असलेल्यांशी बोलून शेवटी अपेक्षित परिणाम साधता आला. गट तुल्यबळ होतायत ना हे बघितले आणि मग मात्र पूर्ण झोपून टाकले. कधी मुलांच्या बोगीत, कधी आमच्या कंपार्टमेंटमधे असं बसून एका गटाची BGT साठी manufacturing idea exploration , चर्चा सुरू झाली. थोडं ''ये Biz Gyan Tree Competition क्या है ,ये बता देती हू|"

The Biz Gyan Tree (BGT) toolkit  आम्हाला facilitator ना दिलं होतं (नंतर ते अर्थातच ग्रुपमध्ये द्यायचं होतंच) आणि नेमकी स्पर्धा काय आहे हे सांगितलं होतं.. आपापल्या गटांच्या विषयानुसार working business model presentation तयार करणे, कंपनी स्थापणे, नाव ठरवणे.. company presentation pitch करणे वगैरे.. toolkit is a Yatri reference guide for the business plan competition (also referred to as BGT program or BGT competition) organized during Jagriti Yatra. मदुराईमधे साधारण कल्पना दिली होती, विशाखापट्टणम मधे यासाठी गट समजले, and kick into high gear after Berhampur in the New Year. पण दिवसभरात सलग वेळ मिळत नसे.. १जानेवारीचा पूर्ण दिवस मिळाला. पुढचे दोन दिवस म्हणजे राजगिर (नालंदा), प्रत्यक्षात देवरियामधला संध्याकाळपर्यंतचा वेळ हातात होता.. आमच्या दोन्ही गटात exactly core manufacturing चा अनुभव असणारं तसं कुणी नव्हतं. Product design, CA, MBA, marketing असे बरेच होते...अगदी mechanical engineering केलेली मुलगी होती.. पण नुकतीच passout.

पण दोन्ही गट कामाला लागले...

BGT is designed to give an experiential learning to the Yatris. Apart from knowledge sessions and mentorship, the Yatris will get a near real-life perspective of setting up an enterprise in Middle India, including the challenges you will face in working within a diverse team.

यासाठी तयार केलेला बिझनेस प्लॅन किंवा आयडिया ही देवरिया, बरपार इथल्या खेड्यात जाऊन लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून ताडून बघणे, अंदाज घेणे असं पण अपेक्षित होतंच. तो बिझनेस तिथल्या लोकांसाठी किंवा लोकांबरोबर करायचा असं गृहीत धरून तिथली लोकसंख्या, शिक्षण, शेती , साक्षरता,गरज वगैरे ची माहिती काढणं, मिळवणं सुरू झालं.(प्रत्यक्षात शशांक मणींना किंवा आणखी बऱ्याच yatriprenure ना भेटणं वगैरे अपेक्षित होतंच. पण गुगलभाऊ सध्या फारच कामी येतात. खरंच उपयोग होतो.ज्ञान मिळाले नाही तरी माहिती भरपूर मिळते.., जी गरजेचीच असते.)

अनुभव नाही मिळत तो घ्यावाच लागतो. तसंही माहिती बाहेरून आत घ्यायची असते, पण ज्ञान हे आतून बाहेर पडतं प्रक्रिया होऊन.

encourage Yatris to use this opportunity to collaborate, challenge and allow them to be challenged in a constructive environment. It is important that you allow everyone in the team to participate in the exercise. It is a competition and there are winners in the end, but the real value is in learning through the process. And obviously tension and fun also!

सकाळ, संध्याकाळ आमचा एक गट आमच्या कंपार्टमेंटमधेच बसून चर्चा करत होता, त्यामुळे मला पडल्या पडल्या ऐकता येत होतं. सोबत होत होती... यात्रेत आजारी पडल्यावर भले तुम्हाला कुणाची मदत नको आहे पण तुमच्या आसपास कुणीतरी आहे, ही जाणीव फार सुखाची असते.

दुपारी जेवायला सगळे आले तेव्हा मला आठवतंय चिन्मय म्हणाला "या डब्यात सगळेच Self appointed Doctor आहेत का... कुणीच डॉक्टरकडे का जात नाहीये?" 

मरायला टेकल्याशिवाय (अती झाल्याशिवाय.. किंवा पीळ म्हणा माझा) मी डॉक्टरकडे जात नसते, हे त्याला थोडीच सांगणार होते... चार बोगी ओलांडून कोण जाणार तिकडे, शिवाय जाऊन ते अँटिायोटिक्स देणार... असो (कोणत्याही डॉक्टरांचा अवमान करण्याचा हेतू यामागे नाही.)

दुपारी आमच्या गटाने  chair car मधे बसून चर्चा केली आणि मी,  संदीप सरांबरोबर डॉक्टरांचा रस्ता पकडला. मला 'बरं नाही' हे सांगायला डॉक्टरांची गरज नव्हतीच पण मला पुढच्या यात्रेतील दिवसांसाठी 'बरं करायला' डॉक्टरांचीच गरज होती, हे ही तितकंच खरं.... हे पटलं. 

सीक बे मधील आमचे डॉक्टर सुरेंद्र आणि डॉ भानुप्रिया... मला वाटतं संपूर्ण रेल्वेत रात्रंदिवस, अखंड कुणी काम केलं असेल तर या दोघांनी.. (ओय.. इतर ERC काम करत होतेच, त्याशिवाय का सगळं सुरळीतपणे सुरू होतं.)

सतत कुणीतरी आजारी पडतच होतं आणि डॉ. सुरेंद्र त्यांच्या अत्यंत जिंदादिल अंदाजामधे त्या त्या पेशंटला औषधापेक्षा बोलून बरं करत होते.. आणि डॉ भानुप्रिया शांतपणे समजून सांगत असे.

डॉ सुरेंद्र इतका humor, energy ने  भरलेला डॉक्टर मी पहिल्यांदाच अनुभवत होते.. अगदी Facci meeting पासून ते बेहरामपूर पर्यंत कधीही भेटले की उत्साहाने सतत कार्यरत, कुणाला तरी शेरोशायरी ऐकव, डब्यात कुणी लावलेल्या गाण्यावर नाच कर, तर एकिकडे औषधपाणी, पेशंटची आस्थेने चौकशी, तपासणी कर.. खरंतर मला प्रत्यक्ष अनुभव येईपर्यंत मी जरा वैतागलेलेच होते की हा कसला असला डॉक्टर.. मला ओळखीतले , नातेवाईक डॉक्टर काका, मित्र बघून सवय ..ज्यांचे पोशाख परीटघडीचे शक्यतो पांढरा किंवा निळसर रंगाचा शर्ट, काळी /निळी पॅन्ट .. एरवी कितीही गप्पा, मजा केली तरी हे सगळे पेशंट बघताना सिरिअसली घेतात..  काकू/मैत्रिणी पण तशा टापटीप पोशाखात असतात, शांतपणे बोलतात, ऐकतात...निदान जरा लक्ष देतात.. इथे हे डॉ म्हणजे, "chill, सब ठीक होगा, नहीं होगा तो किसी नेक्स्ट स्टेशन पे उतरके admit कर लेंगे| सब ठीक होगा  करना है,आगे जाना है|"

पण संपूर्ण यात्रेत मला समजत गेलं की हेच डॉक्टर यात्रेसाठी एकदम फिट्ट आहेत.. अहमदाबादमध्ये अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा माझ्याच cohort मधल्या एकीला admit करायची, सलाईनची वेळ आली तेव्हा हे तिला पण बघत होते, आणि एकीकडे जणूकाही घडलंच नाही असे दाखवत "यारो चलो " या यात्रा गीतात सहभागी होत होते.. अहमदाबादमधे ज्या दोघींना गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये नेलं ,कोविड टेस्ट करायची की नाही यावर चर्चा करणारे, त्यांना ते सगळं मार्गी लावेपर्यंत संपूर्ण फोनाफोनी, सूचना देणारे हे डॉक्टर, क्षणात "आ जाओ, टेंशन मत लो, मोमो खा लो" म्हणत auditorium च्या बाहेर खास यात्रीं साठी केलेल्या promotional मोमोज् वर  ताव मारत होते.. Switch on - switch off हे डॉक्टरांनाच जमू शकतं हे माहीत आहे पण इतकं.. great.

त्या दुपारी (१ जानेवारीला) मी त्यांच्याकडे गेले तर त्यांनी मला काय होतंय विचारलं असेल जेमतेम आणि तोंड उघडून पटापट २/३ गोळ्या तोंडात टाकल्या त्यांनीच आणि पाण्याआधी एक कफ सिरपच पाजलं... आणखी चार गोळ्या हातात थमवल्या आणि सांगितले की भरपूर ताप आहे, घसा सुजलाय, "आराम करो |वो BGT का आप टेंशन मत लो, और कल नालंदा आना है ये दिमाग में  फिट कर  दो|"

थोडक्यात अँटिायोटिक्स चालू केलीयत. अर्थात रेल्वेत डॉ सरसकट सगळ्यांना तीच औषधे देत होते कारण लक्षणं बहुतेक तीच असायची... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात्रींनी पटकन बरं होणं सगळ्यांच्या दृष्टीने गरजेचं असायचं.

मला अजिबात antibiotics घ्यायची सवय नाही, शेवटचं कधी घेतलंय हे  आठवायला लागतं आणि ती घेऊन प्रचंड अशक्तपणा येतो, हेच मला माहीत. पण मी मुकाट्याने औषधे घ्यायचे ठरवले.

बोगीत पलीकडे बऱ्याच जणी खोकत होत्याच, सर्दी किंवा काही झोपून पण आहेत हे लक्षात आले.. अचानक उन्हाळ्यातून थंडीत आल्यामुळे जरा बहुतेकांना त्रास झाला.. 

तर थोडक्यात मी गपगार झाले होते.. एक BGT exploring, discussion yatra चालू होती, आणि माझी आजारपण यात्रा.. काय ते inner healing yatra की काय चालू होती..

रात्री अशक्य थंडी वाजली, काय होतंय कळेना, पण पडून राहण्याखेरीज चालत्या रेल्वेत दुसरं काही करणं शक्य नव्हतं. सकाळी म्हणजे २ जानेवारीला आम्हाला राजगिर स्टेशनवर उतरायचे होते, नालंदाला जाण्यासाठी... मी पहाटे उठले तर अंगात त्राण नाही, अंग तापलेलेच. शेवटी तशीच जाऊन 'सीक बे ' मधे झोपले.. "मी रेल्वेतच राहते.. येत नाही नालंदाला" असं मी ठरवून डॉक्टरना सांगून टाकले..

तर या माणसाने काय करावे? मला अर्धा तास झोपायला सांगून, गोळ्या देऊन, जाड रग घालून झोपवून ठेवले..पण झोप येईना.. रेल्वे पण राजगिरला पोचली, प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी वाट बघत रेल्वे थोडी थांबली तशी मी पक्कं सांगितले की माझ्या अंगात ताकद नाही मी एकटी रेल्वेत झोपते...

पण ऐकतील तर ते आमचे यात्रेतले डॉक्टर कसले.. "आपको आना है, नालंदा नहीं देखा तो क्या देखना है यात्रा मे, बिहार की ठंड तो देखो जरा, बिमार किसी और दिन पडना,  कुछ होगा तो हम सब है, और नहीं तो admit कर सकते हैं, मन बना लो, होगा सब बोलो, और फटाफट तय्यार हो के उतर जाओ" एवढं बोलून थांबले नाहीत तर मला आणि माझ्या सारखीच स्थिती असलेल्या कल्याणीला त्यांनी तयार केलं, पिटाळले..

आम्ही दोघी कशाबशा रेल्वेतून खाली उतरलो.. चालायची अजिबात ताकद नव्हती वाटेत बसत बसत, धरत एकदाच्या नालंदाकडे जाणाऱ्या एका बसमध्ये बसलो.

प्राची परांजपे

१७/०२/२०२३

टिप्पण्या

  1. he admit kar lenge he kay prKaran aahe? गाडी/यात्रा जिथे थांबते त्या गावच्या हॉस्पिटल मधे admit karyache ka ? मग तो पेशंट पुन्हा यात्रेत कसा सामील होणार? की तिथून त्याने घरी जायचे?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. 😃 नाना, ती बोलायची,धीर द्यायची पद्धत होती.. कुणाला करावंच लागलं अॅडमिट तरी व्यवस्था केली जाणार होती ,गरजच असेल तर.
      भेटलो की तपशील सांगेन.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग १ - इच्छा जागृतीची

भाग ३१ - यात्रा सफल संपूर्ण

भाग २५ - राजस्थान .. तिलोनीयाकडे