भाग ३ - It's time to become Facci
तर..
मी 23 डिसेंबरला चेंबूरला उतरले.
एकर्स क्लबमध्ये त्या दिवशी म्हणजे मूळ यात्रेच्या आधी एक दिवस सगळ्या फॅसिलिटेटर्स ची मिटिंग किंवा training workshop होतं. किंवा जास्त संयुक्तिक ठरेल की वयाने थोड्या मोठ्या अशा 72 वेड्या लोकांना यात्रेची कल्पना देण्यासाठी एकत्र बोलावलं होतं.
ज्याला ते फॅसिलिटेटर्स ट्रेनिंग म्हणत होते.
चेंबूरला आवरायला आणखी कुठे जाणार. बसमधून उतरून थेट तिथेच गेले मी..
ERC (Engine Room Club) थोडक्यात जागृती यात्रेच्या आयोजक कार्यकर्त्यांपैकी काहींनी.. एवढ्या लवकर ही का आलीय असा 'look' टाकला. जो आपणही टाकतो सहजपणे.. हे मला जाणवलं म्हणून ते सहजतेने घेतलं मी आणि मग लगेचच आम्ही छान बोलायला लागलो..
तिथल्याच खरंच 'स्वच्छ' असलेल्या स्वच्छतागृहात मी आवरून घेतलं..
छोटं एअरकंडिशन्ड सभागृह, टेबलांभोवती मांडलेल्या खुर्च्यां, पेन, कागद आणि LCD सगळं सज्ज होतं.
हळूहळू मंडळी जमायला लागली. दोन दिवस आधीच ऑनलाईन फॅसिलिटेटर्स मिटिंग झाली होती त्यामुळे काही चेहरे ओळखीचे वाटत होते.
इथून पुढे Facilitator एवढं म्हणायची गरज नव्हती... यात्रेच्या पायंड्याप्रमाणे नुसतं फॅसी (facci) म्हंटलं तरी चालणार होतं.My unlearning started here only..
मी पण अंदाज घेत बोलायला लागले. अन् लक्षात आलं बॉस अभी तो मराठी नहीं चले गी/गा
I have to switch to English or Hindi or even both together.
चेन्नई, दिल्ली,आसाम, बेंगळुरू, विशाखापट्टणम पासून ते पुणे, मुंबई,कोल्हापूर, इचलकरंजी, तासगाव आणि खुद्द सांगलीतलेच एक जण भेटले.... राहुल गस्ते त्यांचं नाव. आम्ही दोघंही उडालोच.
सांगलीत एकतर फार कुणाला याबद्दल माहिती नव्हती आणि हे राहूल तर थेट सांगली विजयनगर मधलेच.. मराठीच सुरू ओ एकदम.
असे बरेच धक्के बसणार होतेच ही फक्त सुरुवात होती. सर्व फॅसिलिटेटर्स मधे महिला अर्थातच कमी होत्या. संपूर्ण यात्रींमधे 35 % महिला/युवती होत्या असं समजलंच नंतर.
बघता बघता ओळखी व्हायला लागल्या, गप्पा सुरू झाल्या..कोण कुठलं, काय करतात .. एकीकडे नाश्ता उरकला आणि आम्ही शहाण्या सारखे बसून सेशन ऐकायला लागलो.
थोडक्यात काही गोष्टी सुरुवातीला सांगते.
पूर्वी ही यात्रा "टाटा जागृती यात्रा" या नावाने ओळखली जायची, जेव्हा प्रायोजकांमधे टाटांच्या विविध कंपन्यांचा सहभाग अधिक होता, आता इतर अनेक कंपन्या जोडल्या गेल्यावर टाटा नाव कमी करून ती सध्या "जागृती यात्रा" या नावाने सुरू आहे.
या जागृती यात्रेचं मूळ बीज समजायला थोडं मागं जाऊया.. 1997 साली
भारताला स्वातंत्र्य मिळून 50 वर्षे झाली तेव्हा रेल्वे मधून भारत यात्रा करण्याचं स्वप्न त्या वेळच्या काही उद्योजक युवकांनी बघितलं. सर्वच मोठ्या विद्वान,तत्वज्ञ, समाजसुधारक, योगींनी, चिंतकांनी त्या त्या टप्प्यावर भारत भ्रमण केलं, मग ते विवेकानंद असोत वा महात्मा गांधीजी.
शशांक मणी त्रिपाठी आणि त्यांचे काही मित्र यांना वाटलं आपणही 50 वर्षांचा स्वतंत्र भारत बघायला हवा जवळून... ते पण युवक युवतींबरोबर, त्यांच्या नजरेतून.. त्यावेळी परदेशात मोठ्या कंपनीत कार्यरत असलेल्या त्रिपाठींनी स्वतःचे पैसे आणि काही देणग्या मिळवून "आझाद भारत रेल यात्रा" आयोजित केली. देशभरातील 200 युवक युवती यात सहभागी झाले.
त्या यात्रेचा व्हिडिओ आम्हाला दाखवला. फारच मस्त व्हिडिओ.
नेमकं सांगायचं तर त्यावेळची रेल्वे, युवक युवतींचे पोषाख, रहाणीमान, भारतातील काही पुसट दिसत जाणारी ठिकाणं , तारुण्यात पण निरागसता जपलेले चेहरे असे सध्याच्या तुलनेत काही फरक पटकन माझ्या नजरेने पकडले. शिवाय अर्थातच लक्षात आले की अत्यंत तोकड्या साधनसामग्रीमधे पण भारलेल्या मनांनी, डोळ्यांनी तेव्हा ही यात्रा टिपली. उद्योग सुरू करणाऱ्या किंवा प्रत्यक्ष सामाजिक कार्यात भाग घेत असलेल्या युवक युवतींबरोबरचा तो प्रवास प्रेरणादायी ठरला असणार तेव्हा हे नक्की. व्हिडिओ क्लिप बघता बघता ...
मला ज्ञान प्रबोधिनीच्या 2005 मधील छात्र प्रबोधन मासिकाच्या तपपूर्ती निमित्ताने आखलेला ईशान्य अभ्यास दौरा, त्याचं नियोजन, कार्यकर्ते (यांच्या भाषेत फॅसिलिटेटर्स, आणि इंजिन रुम कंट्रोल चे सदस्य म्हणू) जमवणे.. तिथलं नियोजन जेव्हा स्मार्टफोन उपलब्ध नव्हते, पत्रव्यवहार, रेल्वे तिकीटांची पाकिटे...हे सारं आठवलं.
तुलना अजिबात नाही पण आपण खूप काही करत असतो योग्य ब्रॅंडिगमधे मागे रहातो. चांगलं ,सकस ते घट्ट पकडून ठेवून नावीन्यपूर्ण गोष्टींची भर घालत खुल्या मनानं पुढं जायला हवंय असं वाटलं तेव्हा.
असो.
तर या 1997च्या यात्रेचं बीज अंकुरून बाहेर आलं 2008 साली, आणि जागृती यात्रा सुरू झाली.
यात्रेचे नियोजन कार्यालय मुंबईत सुरू झाले एका दहा बाय दहाच्या जागेत..जागृती सेवा संस्थान, देवरिया, गोरखपूर,उत्तर प्रदेश येथे त्रिपाठींनी ही उद्योजकता जागरणासाठी सामाजिक संस्था NGO सुरू केली होती. त्या अंतर्गतच दरवर्षी जून ,जुलै पासून 18 ते 28 वयोगटातील युवक युवती या रेल्वेद्वारा प्रवास करून उद्यमशीलता अंगी बांधण्यासाठी संधी म्हणून या यात्रेत अर्ज भरू शकतात.
गेली 13 वर्षे ही यात्रा प्रत्यक्ष सुरू आहे. 2020 आणि 2021 ही वर्षे कोरोनामुळे ऑनलाईन घेण्यात आली.
कालच्या लेखात म्हटल्याप्रमाणे प्रथम अर्ज भरणे, मग छाननी, मग निवड मग स्कॉलरशिप वगैरे सोपस्कार होतात. साधारणपणे 500+ - यात्री आणि 70+ - फॅसिलिटेटर्स यांची निवड केली जाते.
याशिवाय रेल्वे मधे जागृतीची 30, जणांची टीम, खानपान व्यवस्थेतील मंडळी , सुरक्षा कर्मचारी असे 600जणं तरी रेल्वे मधे 15दिवस एकत्र असणार होतो हे नीट समजून सांगितलं गेलं.
23 तारखेच्या प्रशिक्षण वर्गात, आम्ही फॅसिलिटेटर म्हणून काम करताना ERC आणि यात्री यामधला दुवा बनून रहायचं आहे. यात्रींचे प्रश्न, शंका, भावभावना, स्पर्धा, यात्रेदरम्यान आम्ही बघणाऱ्या संस्था ,रोल मॉडेल अभ्यास यासाठी फॅसिलिटेटर्सनी मदतनीस, मेंटॉर म्हणून मागे उभं राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रत्यक्षात सादरीकरणात भाग न घेता यात्रींना प्रोत्साहन द्यावे,सुचवावे असे सांगितले गेले.
हे सगळे उद्योग जागरण, औद्योगिक भान युवकांमध्ये कशाला हवे तर भारताचा विकास हा मध्य भारतात म्हणजे शहरी ,निम शहरी भागात (tire2, tire3 cities)आणि जे अती श्रीमंत नाहीत आणि दारिद्रय रेषेखालील नाहीत या पट्ट्यातील लोकसंख्येत घडून आला तर भारत पुढच्या 25 वर्षात खूप प्रगती करू शकेल अशी मांडणी शशांक मणी त्रिपाठींनी केली. India is not pyramid it's Diamand..
भारतातील विविध भागातील वेगवेगळ्या धाटणीची उद्योजकजता जोपासणारी, सेवा आणि रोजगार देणारी, नवनिर्माण करणारी ठिकाणं किंवा संस्था, व्यवसाय यात्रेत यात्रींनी बघावेत, त्यातून प्रेरणा घ्यावी, सहयात्रीं बरोबर विचार मंथन करावे, स्वतः च्या उद्योगाला हे ताडून बघावे, नवीन सुरुवात करण्यासाठी समविचारी गट शोधावा... ही मूळ जागृती यात्रेची कल्पना त्यांनी फॅसिलिटेटर्स ना समजावून सांगितली.
अर्थात यावर जवळपास तीन तास चर्चा झाली...मी तीनचार वाक्यात हे लिहून पोचवतीय त्यामुळे जरा वाक्य रचना आणि शब्द यांबाबत दमछाक झालेली तुम्हाला जाणवत असेलच.
Vision, Mission statement नेहमीच मोठंच असतं. त्यांचे तुकडे करून नेमकं काय म्हणायचंय, का, आणि ते लहान लहान उद्दीष्टांमधे कसं वाटून घ्यायचं आणि यात्रींपर्यंत कसं पोचवायचं हे महत्त्वाचं आहे, एवढं मला नक्की समजलं होतं. यापेक्षा फॅसिलिटेटर्सचं काम फार काही वेगळं नाही हे लक्षात आलं माझ्या... आम्ही काही यात्रींचे शिक्षक नसणार होतो तर वयाने,अनुभवाने थोडे मोठे असलेले सहयात्रीच असणार होतो..इतकंच.
एकुणात पूर्ण रेल्वे, डब्यांची रचना, cohort म्हणजे काय, किती जणं एका cohort मधे, मग किती cohort चा एक ग्रुप वगैरे तपशीलवार माहिती दिली गेली.
उद्याच्या लेखात यांची उकल करेनच मी.
कसं आहे की, ज्यांनी गटात काम केलंय किंवा व्यवस्थापन पद्धती शिकलीय त्यांना माहीत असेलच की गटबांधणीला फार महत्त्व आहे.. आम्ही 72 जणं एकत्र बांधले जाणं, ओळख होणं हे पण फार गरजेचे होते. साहजिकच काही गटकार्य घेतली गेली.
स्वतः च स्वतःला आजपासून 25वर्षांनंतर बघायचं आणि एक पत्र लिहायचं असा भविष्यवेधाचाच एक प्रकार घेतला गेला. फक्त हे गटासाठी नाही तर व्यक्तिगत उद्दिष्टे गाठण्यासाठी. स्वतः उन्नत तर गट म्हणून पुढे जाऊ हाच विचार होता इथे. स्वतःत आपण स्पष्टपणे डोकावू शकलो, पुढचे पाहू शकलो तर उद्योग, गट, समाज म्हणून भविष्यरंजन भान ठेऊन होईल हाच धागा यात होता...
बाकी मग शंका, प्रश्न चालू झाले.
खरंतर ईमेलवर जी 58 पानी पुस्तिका पाठवली होती ती ज्यांनी नीट, पूर्ण वाचली होती त्यांना व्यवस्थांबद्दलच्या, गटाबद्दलच्या शंका येणार नव्हत्याच. पण आपण माहिती पुस्तिका किंवा प्रश्न पत्रिका नीट वाचतच नाही तसला काहीसा प्रकार चालू होता, मी मजा बघत होते माणसं वाचत होते...सोबत सुग्रास जेवण , गप्पा ,चहा वगैरेची रेलचेल होती. एखाद्या कार्पोरेट ट्रेनिंग प्रमाणे सगळं चालू होतं. फक्त गप्पा खूपच अनौपचारिक होत होत्या.
एकेकाची ओळख ऐकून तर मी इथे का आले, किंवा का निवडले गेले असं वाटून जायचं. पण आपल्यामधे पण काही गोष्टी वेगळ्या, वैशिष्ट्यपूर्ण आहेत हे देखील समजत होते.
मुख्यतः इंजिनिअर, आर्थिक क्षेत्रात, वैद्यकीय,पर्यटन, स्वतः चा उद्योग, दोन तीन क्षेत्रांत एकावेळी जबाबदारी अशी अनेक अवलिया माणसं फॅसिलिटेटर म्हणून जमली आहेत एवढे मी टिपले.
फारच मजा येणार आहे हे लक्षात आले. ही 72 अशी तर 500 कशी असतील... वेड घेऊन वेडी माणसं रेल्वे मधे दाखल होणार आहेत तर... आणि कदाचित मी पण त्यातलीच होते..
खूप छान ओळखी, गप्पांमधे दिवस संपला.
आता चेंबूरमधेच बाजारपेठेतील एका हॉटेलमध्ये माझं रात्रीचं बुकिंग होतं... अनेक हॉटेल्सची नावं जागृती कडून सुचवण्यात आली होती, त्यातलंच मी एक निवडलं. असं राहण्याची वेळ फार वेळा आली नाही पण हा अनुभव मी घेऊन बघावा असा अमरचा सल्ला मी मान्य केला होता... सामान घेऊन कुणा मैत्रीण वा नातेवाईकांकडे मुंबईच्या गर्दीत न जाण्याचे मी पण ठरवले.
फॅसिलिटेटरच्या मेळ्यातून , चेंबूरच्या गर्दीतून मी एका रात्री पुरती detach attachment घेतली होती, जी मला संपूर्ण यात्रेत उपयोगी पडली...
प्राची परांजपे
14 जानेवारी 2023





मजा येते आहे वाचायला... यात्रा आणि प्राची दोन्ही समजत आहेत... मस्त....
उत्तर द्याहटवासर, धन्यवाद
हटवाIndia is not pyramid it's Diamand.आवडले. वाचनाने आमचीही यात्रा सुरु झाली आहे 💐
उत्तर द्याहटवाThank you.
हटवाHope I could write better in less words.tring my best.
Tuzyamule yevadh saakalyane kalat aahe yetre baddal.. nahitr he sagal maahiti navhat
उत्तर द्याहटवाThank you
हटवाInteresting ahe , yatra Kashi pudhe jate yachi utsukta vatte..
उत्तर द्याहटवाDatta
Humm. Will try to write surely
हटवासुंदर लिहिता.. आगदी सगल डोल्या समोर राहील..
उत्तर द्याहटवाThanks for tagging me in...
Thank you Rahul.
हटवाU know Yatra very well.. as u were also Facci..but this is my impression that's it. let's see how it comes out
नानी रोज आतूर्तेने वाट बघते नव्या भागाची.
उत्तर द्याहटवानाना, नानी खूप खूप धन्यवाद तुम्ही इतक्या आपुलकीने रोज वाचताय.
हटवाखूप छान .... भरपूर आशया सह सहज पणे व्यक्त होऊन ते आमच्या पर्यंत पोचणं!! मस्त!!
उत्तर द्याहटवाThank you Rutuja
हटवापुढील लेखाची uthsukta वाढतायत
उत्तर द्याहटवाThank you
हटवावाह सुंदर लिहिते आहेस, अगदी तुझ्या बरोबर प्रवास चालू आहे असं वाटतंय. स्पेशल ७२ एकत्र झाले आहेत, आता पुढे काय?
उत्तर द्याहटवालिहितेय पुढचा भाग..
हटवाInteresting...ek divas mage padle me..pan masta vatatay..kerp inspiring us .
उत्तर द्याहटवाTain makeup kar leti hai.. padhte raho
हटवानवीन कळतंय बरंच काही 👍
उत्तर द्याहटवा🙏
हटवाखूप छान वाटतं आहे वाचताना
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवा