भाग ११ - आज बेंगळूरू
आज बेंगळुरू.. २८ डिसेंबर
आज काय बघायचं होतं तर पूर्व यात्रींनी सुरू केलेल्या उद्योगांचे स्टॉल्स.थोडक्यात आपल्या भाषेत खेळणी आणि खाद्य स्टॉल सोडून जर माहिती, विक्री प्रदर्शन बघायचे होते. मला खरंच मनापासून हे बघायचे होते. यात्रेला येऊन गेल्यानंतर ज्यांनी नव्याने व्यवसाय, उत्पादन चालू केलंय अशा पूर्व यात्रींना भेटणे हा आनंद ठेवा असणार.. आज काहीशा जास्तच लवकर आवरून मी माझ्या cohort मधल्या मुलींना उठवायला सुरुवात केली.
आज बेंगळुरू म्हणजे परत प्रत्येकाचं कुणी ना कुणी इथे होतंच.
कुणी पदवीचं शिक्षण इथं केलेलं तर कुणाचे नातेवाईक इथे होते, कुणी पूर्वी लहानपणी इथं राहिलंय त्या आठवणी आहेत तर कुणी सध्या इथेच IT company किंवा CA articleship इथं करतंय.कुणाला आपण कर्नाटकातलेच धारवाड,विजापूरचे आहोत म्हणून बेंगळुरूला आल्याचा आनंद होता...तर कुणाला "ये बेंगळुरू की हवा काफी कच्छी है" म्हणून चक्क फिरायला जायचंय , खरेदी करायचीय , कुणाला स्वतःच्या घरी तर कुणाला मित्राला तर कुणाला चक्क सध्या काम करत असलेल्या कंपनीत १०मि तरी जाऊन यायचं होतं.कुणाला ब्यूटी पार्लरमधे सुद्धा जायचं होतं..
तो working day होता, आणि ज्या यात्रींना बेंगळुरूचं traffic and distance याचं गणित माहिती होतं ते कसं भेटता येईल कुठं जाता येईल यासाठी फोनवर व्यग्र होते......चूक काहीच नाही.. ज्यांना इथं,जसं जायचंय आणि जितका वेळ ते त्यांचा call घेऊ शकत होते.. but for official everyone should be at Oxford University.जिथे आम्ही निघालो होतो.
१०% यात्री वरचं सगळं करणार हे आयोजकांना पण माहित असतंच. मला कुणी याबाबत विचारले तर माझं ठरलेलं होतं वाक्य
"जाना तो चाहिए पर जाएगे नहीं|" म्हणजे मी काही फार महान होते असं नाही.. दिल्लीत शेवटी मी पण गूंज संस्था पाहून झाल्यावर "आकाशवाणी केंद्रावर " जाण्यासाठी बाहेर पडलेच..
आता या सगळ्यात मेदूवडा सांबार नाश्त्याला आल्यानं "oh ,Sambar .. I missed it so much.. but this is not real teast of Sambar ..but it's SAMBAR much better than your पिली दाल " असं म्हणून दाळमिश्रित जे पातळ समोर होतं त्यात मेदू वडा बुडवून खात होते.
आपण महाराष्ट्रात राहतो याचा मला फार आनंद झाला... आपल्याला, ना " परफेक्ट आलू , लौकी" ची भाजी कळते ना " परफेक्ट सांबार" ना " खाकरे पे घी नहीं है क्या?" "उडीया राईस ऐसा नहीं होता" यातलं धड काही कळत नाही ते बराय ...
भारताच्या सर्वच खाद्य संस्कृती महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन पद्धतीने रुजल्यात असं मला त्या दिवशी वाटलं.. जसं Indian Chinese.
आपण महाराष्ट्रात संपूर्ण देशभरातले पदार्थ फारच आपलेसे करून खातो आपल्या पद्धतीने..पराठा, खाकरा, इडली डोसा, चटणी पुडी.. आपण आपली कुडी सोडत नाही.
आपले महाराष्ट्रीयन पदार्थ बाहेर गेले नाहीत का वगैरे ते राहू देत सध्या पण सर्व भारतीय खाद्यपदार्थ आपण मात्र नांदवतो आपल्या पानात. Food Integration ओ दुसरं काय..
यातला विनोद आणि उपरोध दोन्ही सोडून चला पुढे जरा.. move on Yatris..
Bengaluru- Whitefield station आ गया get down first.
तर आम्ही पोचलो.
जागृती यात्रेच्या सध्याचा CEO अर्थात आशुतोषच्या IIT Kharagpur सिनिअरने स्वप्नीलने साधलेला संवाद फारच आवडला मला.
अगदी सुरुवातीला १०×१० च्या जागेत जागृतीचं ऑफिस कसं सुरू झालं, १५ वर्षा़पूर्वी फंडिंग मिळवण्यासाठी टाटांसमोर जाताना कशी तयारी केली, how we pitch ourselves.
किंवा अगदी सुरुवातीच्या वर्षात यात्रेसाठी रेल्वेमधील बाथरूमचं डिझाईन कसं ठरवलं.
कशा सतराशेसाठ कल्पना काढल्या, brainstorm केल्याचे फायदे, product design च्या आधीची ही पायरी का आणि किती महत्त्वाची आहे.. असं वाटलं चांगलं बोलतोय हा माणूस बोलू देत आणखीन, मला प्रत्यक्ष बाथरूम बनवताना चे अनुभव ऐकायचे होते, ती प्रक्रिया समजून घ्यायला आवडणार होती. असं process to produce ऐकायचं होतं,पण स्वप्नीलला वेळेमुळं आवरतं घ्यायला लागलं.
खरंतर आणखी पण sessions झाली
पण मला स्वप्नीलचं. Memories of staring of yatra to product design ( या सेशनला हे मी दिलेलं नाव आहे. ) आवडलं.
आणखी एक सेशन:
Driving on Electric Vehicle: Dinkar Agarwal co founder of Oben EV
"तुम्ही तुमच्या मुलांमुलींसारखं किंवा खास मित्रमैत्रिणींसारखं जेव्हा तुमच्या कल्पनेवर प्रेम कराल आणि त्यासाठी पूर्ण शक्ती लावून झोकून काम कराल , तेव्हा यश नक्की आहे, तो व्यवसाय, उद्योग यशस्वी नक्की होणार.."
Any one who wants to start enterprise pls be sure that you should technically sound till the day..and keep updating yourself.
Team building is key to success.
जर तुमच्या टीममध्ये तुमच्या उद्योगासाठी योग्य माणसं नसतील तर तुम्ही गट म्हणून/as team
चूका करू शकता, ज्या महागात पडतील.
कल्पनेबरोबरच , right team is Key to success.
Oben EV is an electric vehicle company developing new electric 2-wheelers in-house with indigenously developed components to deliver high quality products for the Indian market & founded by IIT Kharagpur & IIM Bangalore Alumni
परत तेच जाणवलं, जे जे IIT,IIM pass out आहेत, ज्यांनी वेगळा विचार केला ,धाडस करतायत त्यांच्या कडून असे प्रयोग होतायत.
उच्च शिक्षण घेऊन असा वेगळा विचार करणारे तरूण, धाडस करणारे तरूण तरूणी तयार व्हायला हव्यात.
Oben EV यांच्या बद्दल अधिक माहिती साईटवर आहे, नुसतं Oben टाईप केलंत तरी ढीगभर माहिती येतीय.
पण दीनेशच्या बोलण्यानंतर सभागृह भारावून गेलं होतं , आणि परत नव्याने बऱ्याच इंजिनिअर, डिझायनर यात्रींच्या डोक्यात भुंगा सुरू झाला हे नक्की.
Digital India,how do you listen to a customer and innovatate to deliver Value.
असं छान pannel discussion झालं.
सध्याच्या ग्राहकांची नस ओळखतो आणि त्यांना हवे ते बदल करून उत्तर उत्पादन देण्यासाठी R &D करायला हवे, मोठ्या कंपन्या कसे करतात.
अगदी जिलेट रेझरने काय केले, किंवा तुम्ही कुठून डिग्री घेतलीय यापेक्षा काय कल्पना उचलताय market ला कसं समजून घेणार यावर सगळं ठरेल.
याशिवाय ZoHo बद्दल VP marketing of ZoHo @ Prawal यांचं एक सेशन झालं.
काही दुपारच्या जेवणाआधी तर काही नंतर.
बहुतेक translater ची गरज पडत होती काहींना ..कारण बरंच इंग्रजीत चालू होतं.
JEM अर्थात जागृती एतरप्रेन्यूअर मेला छान होता. मी हळूहळू तिकडे वळते..
आता हे काय होतं तर चक्क आपण प्रदर्शन बघायला जातो ना म्हणजे सांगलीत नेमिनाथच्या ग्राऊंडवर किंवा पुण्यात पूर्वी COEP Enggi घ्या ग्राऊंडवर प्रदर्शन भरायचे तेवढं काहीतरी असेल असं मला वाटलेले, पण जे जेमतेम २० स्टॉल्स होते.
पण छान होतं प्रदर्शन.
पूर्वी येऊन गेलेल्या यात्रींच्या उत्पादनांचे स्टॉल असल्याने विक्री हा मूळ उद्देश नव्हता तर देवघेव होती. यावर्षीच्या यात्रींना बोलून, ऐकून शिकण्यासारखं, संपर्क वाढवण्याच्या दृष्टीने किंवा कसं सुरू केलं हे समजण्यासाठी हे स्टॉल्स चालतं बोलतं उदाहरण होतं.
सध्या हे वर्ष भरड धान्य अर्थात " मिलेट इयर" म्हणून घोषित आहे त्या दृष्टीने पाण्यात पावडर(नाचणी आणि तत्सम भरड पिठे, इतर पौष्टिक पदार्थ ) टाकून 7 min मधे बनणारे एका बाईंचे उत्पादन छान वाटले. उत्तम pakaging होते.
कोविडच्या काळातच एकाने बनवलेली डायरी छान वाटली.. long term goals, day to day activities.. छान रकाने, जागा सोडलेल्या.. आपण अनेक जण हे करतोच पण तयार असं काही मिळालं तर नक्की आवडणार होतं, ओरिगामीचे चौरसाकृती कागद तयार मिळाले तर ओरिगामी करायला जो आनंद होतो तसा मला झाला ती डायरी बघून. ती एकमेव खरेदी मी अख्ख्या यात्रेत केली..
खरेदी करायचीच नाही हे ठरवून मी यात्रेत पाउल ठेवले होते..आणि चक्क ते मला जमले शेवटपर्यंत अगदी तिलोनियात देखील जमले..आणखी काय पाहिजे..खूप शिकले की मी यात्रेतून....
डिजिटल मार्केटिंग , fertilisers , fasion या विषयांतली बरीच उत्पादने होती.
दोन स्टॉलनी लक्ष वेधून घेतले दोन्ही मुलांच्या बौद्धिक विकासात अडथळे असतील तर काम करणाऱ्या संस्था होत्या. मतिमंद,गतिमंद, स्वमग्न या मुलांबरोबर टेस्टिंग, behaviour theory साठी वगैरे
Special need असणारी ही मुलं तेच तेच ठरवून दिलेलं काम उत्तम करू शकतात. एकदा हा ठोकळा इथे ठेवायचा, मग तो तिथे,मग मधे एक रिकामा किंवा अशा सारखी एकच एक बदल न होणारी प्रक्रिया ही मुलं करू शकतात,बदलच त्यांना आवडत नाही.. जे ठरलं तेच करत राहतात, मग रोजच्या वेळापत्रकात ऐत्यावेळी बदल केला तरी त्यांना चालत नाही..पण डोक्यात घुसले तर काम उत्तम करू शकतात.
हाच धागा पकडून १८ वर्षांनंतर गतीमंद, शैक्षणिक अक्षम, स्वमग्न मुलांना ब्लॉक प्रिंट , रंग भरणं, कताई , रोज त्याच पद्धतीने वाफे करून कोथिंबीर/पालक पेरणे अशा सारखी कामं त्यांना रोजगार,उद्यमी बनवण्यासाठी करतात. बेंगळुरूमधे महेंद्र,अविश्मा यासाठी प्रयत्नशील आहेत.नवप्रभुती याबरोबर ते संलग्न आहेत. त्यांच्या बरोबर छान गप्पा झाल्या, आणि परत बोगी नंबर १२ मधे भेटण्याचं ठरवून मी बाहेर पडले.. खरंतर डोळ्यात खूप पाणी दाटून आलेलं आणि ते कुणाला कळू पण द्यायचं नव्हतं म्हणून मग मागे गेले जिथे आमचे ताऊजी रात्री चं जेवण बनवण्यासाठी जोरदार तयारीत होते.
आहाहा..काय नजारा होता..
एकिकडे तांदूळ उकळत्या पाण्यात सोडले जातायत. तव्यावर छोटे पराठे भाजले जातायत.. तर संध्याकाळी चहा बरोबर चक्क बटाटे वडे तयार होतायत.. काही तळून तयार आहेत तर काही अगदीच कांदा बटाटा मिश्रणात सुप्तावस्थेत आहेत..
अशावेळी हे पदार्थ उघड्यावर युनिव्हर्सिटीच्या मागच्या भागात का बनतायत,त्यातली स्वच्छता असले फालतू प्रश्न मला शिवत नाहीत.. मला पडले ते ....आता हे बनवलेलं सगळं जेवण परत रेल्वेत कसं नेणार?, परत ते तिथे कसं वाढणार?..मग प्लॅटफॉर्मवर की चालत्या रेल्वेत वाढणार?... हे असले प्रश्न मला पडतात.. अगदी बाळबोध तरीही त्यातल्या व्यवस्थापनकौशल्याबद्दल मला कमालीची उत्सुकता असते...
सगळेच यात्री मग आवारातून अनेकांबरोबर थट्टा, मस्करी, session वर चर्चा करत चहापाशी आले. हळूहळू बटाटे वडे तोंडात गेले तशी बडबड कमी होत गेली.. तोंड मात्र चालूच राहिले.... आणि moves on Yatri 's च्या हाकाऱ्याने पाय बसकडे वळले.. आम्ही उतरलो होतो Bengaluru- Whitefield स्टेशनवर आणि आता
SMVT बेंगळुरू रेल्वे स्टेशनवर आम्ही रेल्वेत चढणार होतो.. रेल्वे ट्रॅफीक, प्लॅटफॉर्म मिळणे यासाठी असे बदल होत राहायचेच.
पण बरं झालं आलो. SMVT स्टेशन अप्रतिम आहे.. विमानतळावर आलोय असंच वाटतं होतं..
ग्रीन यात्रा अर्थात कमीतकमी प्लास्टिक कचरा, पुनर्वापर याबद्दल चं सेशन रेल्वेत झालं.
खरंतर आज खूप गप्पा पण झाल्या वेगवेगळ्या यात्रींशी. माझा cohort हा असा होता की जो रात्री एकत्र यायचा. कोझी कोहोर्ट असं मी त्याला नाव ठेवलं होतं... फक्त वैष्णवीच्या तब्येतीची काळजी वाटायला लागली होती.. तशी ती ठीक होती ,पण ठीक वाटत नव्हती.. बाकी
घरी आल्यावर जे निवांतपण वाटतं तेच रोज इथे वाटायचं.
काय काय आणि किती लिहू..
हेड काऊंट बद्दल सांगायचं राहिलंय..
आजच्या पुरतं इतकंच
उद्या भेटूच
प्राची परांजपे
२७ जानेवारी २०२३






Khoopch chan ....
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा