भाग १० - अरविंद आय केअर आणि पुढे

 कालच्या लेखाचा शेवट आठवतोय का? 

तर...

नुसतं खांबाला टेकून बसून माझ्या हातून काही मोठी निर्मिती होणार नव्हती.. फक्त मलाच झोप लागली असती.. तेव्हा," उठा प्राची ताई" 

तोपर्यंत प्रत्येकाला गटागटाने कुठे जायचंय, काय बघायचंय आणि कुणासोबत ते कळवलं गेलं. त्यांच्या त्यांच्या vertical subject नुसार. काही जणं प्रत्यक्ष पेशंट तपासतात तिथे गेले.काही गावात गेले, आम्ही Aaro Lab बघायला गेलो आणि organic farming बघायला गेलो.

खरंतर , माझं सासर अर्थात परांजपे. मागच्या पिढीपर्यंत तर खूपच आणि याही पिढीत बरेच डॉक्टर आहेत. सांगलीत जुन्या लोकांना डॉक्टरसाहेब परांजपे म्हणजे काय हस्ती होती, किती ग्रेट होते, सामाजिक भान,  वक्तशीरपणा,  आणि पेशंट बद्दलची तळमळ, नावीन्याचा शोध घेण्याची वृत्ती याबद्दल माहिती आहे. खरंतर ते माझ्या आजेसासऱ्यांचे वडील.. पण आमच्या सगळ्या घरात आजही रोज त्यांची आठवण निघतेच. तसेच माझ्या आजे सासऱ्यांचे सख्खे भाऊ डॉ.यशवंत तथा भय्यासाहेब परांजपे हे देशपातळीवरील निष्णात नेत्र शल्यविशारद होते. घरात वैद्यकीय सेवेची परंपरा असल्याने लग्न झाल्यापासून मी घरातील प्रत्येक डाॅक्टरला जवळून बघतीय.. मग ते आजेसासरे असोत, सासरे, सासूबाई, किंवा नणंद, दीर असोत..

आम्ही घरातले जमलो की वैद्यकीय सेवेदरम्यानचे  या सगळ्यांचे किस्से जसे ऐकत आलीय तशीच या सगळ्यांची तळमळ, याबद्दलची मतं, बदलता काळ याबद्दल आजही मी ऐकत असते, टिपत असते..

ज्या घराला  सामाजिक भान बाळगून वैद्यकीय सेवेची उज्ज्वल परंपरा आहे त्या घरात मी आहे याचा निश्चितच अभिमान वाटतोच.आणि ज्या माहेरच्या (दांडेकर ) घरातून आलीय तिथेही माझे आजोबा पी.के.दांडेकर  हे त्यांच्या व्यवसायातील सातत्याबद्दल, सचोटी बद्दल आणि मदतीच्या वृत्तीमुळे सांगलीत परिचित होतेच..

त्यामुळे खरंतर अरविंद आय केअर हॉस्पिटलमधील गोष्टी बघताना , ऐकताना मला खूप घरगुती किंवा परत ऐकल्यासारख्या वाटत होत्या. ती माहिती वैद्यकीय परिभाषेतच पण व्यवसाय वृद्धीसाठी केलेल्या प्रयत्नांबाबत होती..अर्थातच good team building हे इथले महत्त्वाचे सूत्र होते, एकांडे शिलेदार कोणी नव्हते. जबाबदारी पुढच्या डॉक्टरांच्या फळ्यांकडे उत्तम सोपवली जात होती, मूल्यांसकट..

डॉ भय्यासाहेब परांजपे यांच्या कडून तर मदुराईच्या या Dr.V आणि डॉ नाचर यांच्या बद्दल मी स्वतः ऐकले होते, तशाच धर्तीवर डॉ भय्यासाहेबांनी गावात मोफत शस्त्रक्रिया, डॉक्टरांना प्रशिक्षण कॅम्प,  लेन्स, मायक्रोस्कोपच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केल्याचे तिथले अनुभव पण मी ऐकले होते.

पण आज ते मदुराईचं अरविंद आय केअर सेंटर बघताना सगळं खूप आठवून जात होतं. खरंच हा प्रकल्प फार मोठा आहे हे जाणवत होतं.

कॅटरॅक किंवा तत्सम शस्त्रक्रिया झाल्यानंतर जाड काचांचा चष्मा, काळा गॉगल हे सोपस्कार पूर्वी करावे लागत.. शिवाय परदेशी लेन्सची किंमतही खूप असे.. भारतीय बनावटीची डोळ्यात बसण्याची लेन्स तयार करण्याच्या उद्देशाने ऑरोलॅब सुरू झाली. शेतकरी, किंवा खाली वाकून वजन उचलणे अशा लोकांना शस्त्रक्रियेनंतर  चष्मा हा अडसर ठरू शकतो.

 These lenses are viable option but quite costly as it had to be imported. Dr. V started manufacturing facility to bring down the costs and now, India exports such lenses and has 10% of market share in world market.

Aurolab - manufacturing of high quality lenses,  Cost - 100 dollar lens came to 2 dollar

Building the competition through world. 60% of aurolab product goes to NGOs 

या ऑरोलॅबचा एकुण परिसर १०० एकर आहे त्याच्या १/४ भागात लॅब आणि इतर गोष्टी आहेत. आणि ३/४ भागात नैसर्गिक शेती केली जाते. 1,00,000 लिटर  लॅबमधील पाणी परत संस्कार करून, वापरायोग्य करून झाडाला, शेतीला, गुरांना वापरले जाते. तिथे सोलार सिस्टीम द्वारे वीजनिर्मिती केली जाते. मला शेती बघण्यात अधिक रस असल्याने मी तिकडे गेले. तयार होणारा सगळा भाजीपाला, फळं अरविंद आय केअर च्या विविध शाखांमध्ये मेससाठी तर काही विक्री साठी उपलब्ध केला जातो.

या सगळ्यामधे डोळ्याच्या आकारात बांधलेली एक देखणी वास्तू होती..त्यात वस्तूसंग्रहालयासारखे विविध फोटो, विचार मांडलेले आहेत ज्या व्दारे आपल्याला Dr.V आणि त्यांचं Vission  त्यांचा जीवनपट समजायला सोपे जाते. शांत ध्यान खोली ही आणखी एक या वास्तूची जमेची बाजू.

Dr.V हे योगी अरविंदांच्या विचारसरणीचा अवलंब करताना जागोजागी दिसतात.. सर्वच ठिकाणी आपापल्या पॉंडेचरीच्या ऑरो व्हिलेजचा प्रभाव जाणवत राहतो....

परत रेल्वेत आलो आणि एकाचवेळी दोन AC chair car  seesion झाली.

एका ठिकाणी श्री. प्रल्हाथन हे  त्यांच्या " BHUMI" या  NGO बद्दल माहिती देत होते तर दुसरीकडे कंथारी या NGO बद्दल Paul यांनी माहिती दिली...Kanthari.org आणि  bhumi.ngo या साईटवर गेलात तर अधिक माहिती मिळू शकेल. एकुणात दोन्ही सेशन छान झाली.

मी BHUMI चं ऐकायला बसले होते, आणि Kanthari बद्दल नंतर यात्रींकडून ऐकले. BHUMI ही संस्था मला इतर संस्थांना  कामासाठी, चळवळीसाठी युवक युवती पुरवणारी NGO वाटली. ज्यांना केवळ एक वेगळा अनुभव या पातळीवर यायची इच्छा आहे किंवा काही तरी करून बघायचंय अशांसाठी सुरुवात म्हणून..

खरंतर इथं विस्ताराने लिहिता येईल, पण मला ती मांडणी किंवा ते एकुणात काय जरा पटत नव्हतं..मी काहीतरी वेगळ्याच पातळीवर विचार करत होते, आणि समोरची मांडणी वेगळी होती. 

मला एकुण ती प्रश्नोत्तरे ऐकून सध्या युवक युवती NGO कडे कसे बघतात, त्यात काम करताना काय विचार करतात किंवा मुळात एखादी NGO सुरू केली, करायचीय तर यामागे काय उद्देश असतो, विचार केलेला असतो का? असे आणि बरेच प्रश्न  पडले, खरंतर मी बरीच अस्वस्थ झाले होते, तिकडे कंथारी चं सेशन फारच छान झालं असं समजलं, हुकल्याचं जरासं वाईट वाटलं. 

मी का अस्वस्थ झाले ते इथे नेमकं शब्दात  पकडता किंवा मांडता येणार नाही,पण NGO हा शब्द आपण पुन्हा नव्याने समजून घ्यायला हवाय का? सामाजिक काम करणे म्हणजे नेमकं काय? याबद्दल यात्री काय विचार करतायत? असं खूप काही डोक्यात फिरायला लागलं होतं

रात्री रेल्वे एका स्टेशनवर थांबली होती, आणि मी विचारांमध्ये पूर्ण  फिरत होते... खाली उतरले तेव्हा जे काही मराठी बोलू ,समजू शकणारे यात्री होते  त्यापैकी समोर ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचा माजी विद्यार्थी चिन्मय दिसला..  मी मराठीत बोलले तर समजू शकेल,  त्याही पेक्षा तो ऐकून घेऊ शकेल असं वाटल्याने थोडी चर्चा केली... आणखी काही यात्रींशी बोलले.. सगळे इथे नेमके का आलेत?, काय वेचतायत? काय सुटतंय? असं काहीबाही बोललो आम्ही.. मला इथून पुढे नेमकं काय शोधायचंय यात्रेत की ठरवून काहीच न करता काय घडतंय ते टिपायचंय, असं मग मीच मनाशी थोडं ठरवलं. कुठे learning आणि कुठे unlearning करायला हवं हे ठरवलं.

पण अस्वस्थेतही जरा बरं वाटलं आणि मी वरवर शांत झाले. उद्या पहाटे बरंच लिहून काढावं लागणार असं जाणवलं...

एकुणात मदुराईहून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो होतो.. दिवसभरात चर्चेत अनेक start up सुरू होत होते आणि काही बंदही पडत होते.. यात्री वेगवेगळ्या पातळ्यांवर विचार करत होते.. नवनवीन उद्योगांचा, सेवांचा... या मंथनासाठीच तर हा रेल्वे प्रवास होता.

Let's move on Yatri's

यारो चलो ...


प्राची परांजपे

२४ जानेवारी २०२३

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग १ - इच्छा जागृतीची

भाग ३१ - यात्रा सफल संपूर्ण

भाग २५ - राजस्थान .. तिलोनीयाकडे