भाग ८ - कन्याकुमारी आणि ZoHo


 
बसमधून उतरून विवेकानंद शिला स्मारकाच्या दिशेने आम्ही निघालो..५०० च्या संख्येने.. पोचलो. ज्यांनी तो भाग पाहिला आहे त्यांना लक्षात येईल की, तिथं जत्रेसारखे स्टॉल आहेत, खूप गर्दी असते आणि त्यात आमच्या ५०० जणांची भर.

वादळाच्या इशाऱ्यामुळे आणि झालेल्या उशीरा मुळे कन्याकुमारीला जाऊन शिलास्मारक न बघणे हे पचवणं मला थोडं जडच गेलं.

गांधीस्मृतीधामच्या उजव्या बाजूला यात्री जमले, अमृतकाल संकल्प प्रतीज्ञा शशांक मणी त्रिपाठींनी सर्वांना दिली... वंदेमातरम् ने वातावरण भारून गेलं. मग यात्रींची पांगापांग झाली.

एक छानसा दगड शोधून मी पण डावीकडचे शिलास्मारक, तिरुवल्लूवर यांचा भव्य पुतळा डोळ्यात साठवत, समोरच्या अथांग समुद्रात स्वतःला विसरून गेले.


जागेवरून उठले तेव्हा मात्र मन शांत झाले होते, एखादी गोष्ट बघण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी आपण जी वाट बघतो ती नाही मिळाली तर आपण परिस्थितीकडे कसे  पाहणार, कसे सामोरे जाणार? या वस्तूपाठासाठीच आजची शिलास्मारक भेट हुकली...

मग मात्र झपझप पावले टाकत त्या मनाच्या कोषातून बाहेर पडून बसची वाट धरली.. वाटेत खोबरं खवण्याचे नवीन यंत्र, पराठा करण्याची केरळीयन पद्धत, वाटेतल्या काही भव्य कार्यालयीन वास्तू चालता चालताच टिपल्या..

एक उत्साह भरून घेतला की आता एका उद्योजकाला भेटायचंय. आमचे म्हणजे यावर्षीच्या जागृती यात्रेचे एक प्रमुख प्रायोजक ZoHo. बऱ्याच जणांनी हे नाव ऐकलं असेल किंवा नसेल पण पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्रीधर वेंबू यांचं नाव नक्की ऐकलं असेल. श्रीधर वेंबू यांचं नाव जगातील काही श्रीमंत लोकांच्या यादीत फोर्ज मासिकातही काहींना पाहिल्याचं आठवत असेल.

अत्यंत साध्या, स्थानिक पेहरावात हा माणूस वाकून नमस्कार करत व्यासपीठावर आला.. हेच का खरंच ZoHo चे वेंबू  अशा प्रश्न पडावा इतक्या सहज त्यांनी तरुणांशी संवाद साधायला सुरुवात केली.

श्रीधर वेंबू यांनी  भारतातील शहरी भागातून ग्रामीण खेड्यांमध्ये सॉफ्टवेअर आणि उत्पादन विकास कार्ये घेऊन जाण्यासाठी ZoHo कंपनीची सुरुवात केली. विशेषतः त्यांच्या कंपनीने, आपली कार्यालये ग्रामीण मथालमपराई, तेनकासी जिल्हा, तामिळनाडू आणि उपनगरी रेनिगुंटा, आंध्र प्रदेश येथे स्थापन केली. याचसाठी सिलिकॉन व्हॅलीत काम करणारे श्रीधर वेंबू मथलमपराई या आपल्या गावी राहायला आले, ठरवून भारतात परत आले.

अगदी सुरुवातीला म्हणजे २००४ घ्या सुमारास तामिळनाडूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक सॉफ्टवेअर शिक्षक, बेसिक कोडिंग शिकवण्यासाठी ZoHo ची शाळा सुरू केली. अमेरिकेत १९९६ घ्या सुमारास दोन भाऊ आणि काही मित्रांबरोबर त्यांनी  Advennet नावाने सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली होतीच.

तशी आधीच्या काही कामांवर आधारित २००९ मधे ग्राहक संबंध व्यवसायातील, ऑनलाईन Application मधे काम करण्यासाठी नाव बदलून ZoHo Corporation करण्यात आलं.

आपला हा सगळा पसारा भारतात असावा असं वेंबूंना वाटायला लागलं आणि हळूहळू त्यांनी ZoHo चं मुख्य कार्यालय तामिळनाडू येथील मथलमपराई या गावात आणलं... आणि स्वतः याच गावात स्थिरावले.

आज जवळपास ९००० कर्मचारी जगभारातून या कंपनीसाठी काम करतात. Cloud based software delivery model अर्थात Software as a service SaaS model मधे ZoHo कंपनी मुख्यतः काम करते.

थोडक्यात सांगायचं तर एखाद्या छोट्या उद्योजकांला  आपली साईट तयार करून हवी असेल किंवा e bill पद्धती बसवायची असेल किंवा अगदी आपल्या उत्पादनांची विक्री कुठे, कशी करता येईल असा सल्ला हवा असेल, सेल्स, मार्केटिंगसाठी online support किंवा ऑनलाईन payment ची सोपी पद्धत आपल्या उद्योगासाठी अवलंबायची असेल तर ZoHo कंपनीची विविध software मदतीसाठी तयार आहेत. 

वेंबू यांनी कोविडच्या काळात तामिळनाडूच्या गावांमध्ये जाऊन मुलांना मोफत शिक्षणासाठी काम केलं. भारतातील शालेय मुलांमध्ये हुशारी कमी नाही पण गरज आहे ती तंत्रज्ञान त्यांना सोप्या भाषेत सांगण्याची.

वेंबू ZoHo corp कंपनी चालवताना स्थानिक तरुणांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. इथे जर आपण R&D वर खर्च केला आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवला तर गुगल सारखे नेटवर्क उभे करू शकू असा त्यांचा विश्वास आहे, त्यासाठी भारतात असे निष्णात तंत्रज्ञ इथेच राहायचे तर त्यांना कामाच्या उत्तम संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. तेच ZoHo च्या माध्यमातून ते जगाला दाखवून इच्छितात..

भारतातील एका खेडेगावात सुद्धा मोठ्या कंपनीचं मुख्य कार्यालय असूच शकतं ,तीच गरज आहे हेच जगाला ZoHo च्या उदाहरणावरून श्रीधर वेंबूंना दाखवून द्यायचंय, हे बोलताना त्यांनी परत परत सांगितले.

The company's tagline is 'Made in India. Made for the world'

And  The name 'Zoho' was the result of the abbreviation “Small Office Home Office"

• Discovering India together – make new friends on this trip and these will become life-long friendships. A new-age startup can be formed with friends who laugh and cry together. 

• Anything you do is a journey, not a destination. It’s a loop. Know people from all walks of lives and from all the diverse part of the world.

• 3 insights

     to build a product Relevant to the customer

      Never ignore feedbacks

      Develop a frugal culture

त्यांच्या बोलण्यात आलेल्या काही गोष्टी मी वरती तशाच आपल्या पुढे इथे ठेवल्यात. तामिळनाडू येथील मथलमपराई मधे राहूनही श्रीधर वेंबू जगाला उपलब्ध होऊ शकतात.. 

श्रीधर वेंबू ना ऐकून आम्ही खरंतर थक्क झालो होतो, जागृती यात्रेच्या प्रथेप्रमाणे "यारो चलो बदलाने की रुत है " या यात्रा गीताने आम्ही त्यांना निरोप दिला...

भारतातील खेडेगावातील मुलांबद्दल त्यांनी जो विश्वास व्यक्त केला, त्याबद्दल बसमध्ये आणि नंतर चर्चा होत राहिली.. सामाजिक बांधिलकी जपून जागतिक पसारा वाढवणारे हे आजचे रोल मॉडेल खूपच आवडले, विशेषतः Technical field मधल्या, software Engineer यात्रींना .. अर्थातच ठरलेल्या यात्रींच्या Group ला रोल मॉडेल अभ्यास करून दुसऱ्या दिवशी  सर्वांसमोर परत AC chair car मधे मांडायचे होतेच.. 

पण श्रीधर वेंबू काय म्हणाले, नेमकं काय करतात हे सोप्या हिंदीत आणि साध्या शब्दात इतरांना सांगायला देखील यात्री विसरले नाहीत. हे या जागृती यात्रेचं वैशिष्ट्य. ज्यांना ही कंपनी नेमकं काय करते तेआणखी जाणून घेण्यासाठी ZoHo type करावे हे सांगणे नलगे.

रात्री उशिरा घरी..रेल्वेत परत आल्यावर जेवण वगैरे...

त्या दिवशी सॉफ्टवेअर युगातल्या यात्रींची रात्र लवकर सुरू झाली नाही कारण AC chair car मे आप देर रात तक discussions कर सकते हो.. और आज तो अगले कुछ घंटे Zoho and Vembu sir ही सबके उपर सवार थे. 


प्राची परांजपे 

22जानेवारी 2023

टिप्पण्या

  1. Tuzi connect vyayachi range khoop aahe g age group wise ani profession wise pn

    उत्तर द्याहटवा
  2. प्राची खूप छान लिहिल आहेस. खुप इंटरेस्टिंग आहे ही यात्रा. Innovative गोष्टींचं भांडार आहे. या सगळ्या गोष्टी आमच्या पर्यंत पोचविण्यासाठी धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग १ - इच्छा जागृतीची

भाग ३१ - यात्रा सफल संपूर्ण

भाग २५ - राजस्थान .. तिलोनीयाकडे