भाग ७ - मिशन किचन
सकाळी जाग आली ती थंडीने.. कंपार्टमेंटच्या बंद खिडकीतून गार वारं रात्रभर येत होतं..
काहीच तासात आम्ही कन्याकुमारीला अर्थात नागरकोएल स्टेशनवर उतरणार होतो, म्हणजे तसं आदल्या दिवशी सांगितलं होतं.
पटकन आवरून AC Chair Car मधे गेले..तारीख होती 26 डिसेंबर 2022
तिकडे कर्नल पाटील अर्धवट पाण्याच्या बाटल्या, उरलेल्या, तशाच ठेवलेल्या, विखुरलेल्या पाण्याच्या बाटल्या गोळा करून टेबलवर ठेवत होते... जे बंद बाटल्या मधलं पाणी आम्हाला कोकाकोलाने उपलब्ध , प्रायोजित करून दिलं होतं, ज्या पाण्यामुळे 'पाणी बदल' यामुळे होणाऱ्या कोणत्याही समस्या टाळता येणार होत्या.. भरपूर पाणी (पाण्याच्या बाटल्या) रेल्वेत आणि आम्ही जिथे जाऊ तिथे सोबतच बसमधे देखील बरेचदा उपलब्ध असतं.. बरोबर घेऊन जाऊ शकत असू..
तर असं पाणी... सुनियोजित न वापरल्याने वाया जात होतं. काही जणं अर्धवट पिऊन तिथेच सोडत होते तर काही पिऊन झाल्यावर कुस्करून कचरापेटीत न टाकता तिथेच सोडत होते, काही काय करायचंय न समजून तर काही थोड्या हलगर्जीपणामुळे.
एकुणात खूप बाटल्या तिथेच पडल्या होत्या, स्वच्छता कर्मचारी , कर्नल आणि आम्ही अशी थोडी चर्चा पण झाली काय करता येईल ठरले.. नंतर पुढच्या टप्प्यात यात्रींशी सेशन घेऊन आशुतोष (CEO) बोलले आणि आणि कर्नल तर याबद्दल बोलतच होते वेळोवेळी.
"ग्रीन यात्रा" याबद्दल काही दिवसांनी रेल्वेत चर्चा सत्र झालं त्यातही हा मुख्य मुद्दा होताच..
यात्रा असो वा आपापल्या ठिकाणी खरंच या पाण्याने सोय तर होतीय पण कचरा तयार होतोय का? पाणी वाचण्यापेक्षा वाया जातेय का? आपापल्या बाटलीत हवं तेवढं पाणी काढून घेऊन उरलेली उष्टी न झालेली बाटली दुसऱ्याला वापरायला देणे हा पर्याय विशाखापट्टणमच्या वासुदेवनने अवलंबलेला मी पाहिला ,९०% वेळा मी पण पाळला.
खरंतर यावर एकुणच काय पर्याय भविष्यकाळात काढता येईल? विचार करूया सगळेच..
बाहेर लाजवाब दृश्य होती.. डोंगर, शेती, भात शेती... हलकासा पाऊस देखील. कर्नाटक, तामिळनाडू अशी राज्ये सरकताना दिसत होती ती शेती, माती आणि हवेतून जाणवत गेले...
तर नंतर मी माझ्या cohort मधल्या काही युवतींसह स्वैपाकघरात जाऊन यायचे ठरवले..
निघालो...
पहिल्यांदाच संपूर्ण रेल्वे फिरायची या कल्पनेनेच आम्ही जबरदस्त उत्साहात होतो.
वाटेत समजलं की रेल्वेच्या वेळापत्रकात पुढचा clearance, platform जागा मिळणार नव्हती.. म्हणून मग रेल्वे थांबलीय..तर खाली उतरून स्टेशन मास्तरशी कर्नलनी बोलावं, आमची रेल्वे पुढे निघते का बघावं यासाठी प्रयत्न करावेत...
कर्नल म्हणाले तुम्ही पण या, कळेल तुम्हाला पण कसं बोलायचं असतं, मग काय उतरलो आम्ही तिघी जणी.... सगळी रेल्वे आमच्याकडे बघतीय आणि आम्ही तिघी रेल्वेतल्या कुतूहल भरल्या चेहऱ्यांकडे
एकुणात तिथे स्टेशन मास्तरांशी बोलल्यानंतर समजलं.. अवघड आहे.. पुढे खरंच traffic jam आहे.. थोडक्यात आम्हाला पोचायला उशीर होणार..
आम्ही चौघी परत रेल्वेत चढलो. Boys compartment मधून hello, good morning करत सरळ मोर्चा स्वैपाकघरात वळवला...
आहा... मी सुगरण नसले तरीही मोठ्या प्रमाणात स्वैपाक कसा बनतो हे बघायला नक्कीच आवडणार होते.
बादल्या मधे तयार पोहे, नष्टयानंतरचा चहा तयार होता.. ती लगबग चालू होती. डब्यात थोडं आत गेलो... साधारण जर तुम्ही रेल्वेची पॅन्ट्री बघितली असेल तर तसाच डबा होता. आमच्या या स्वैपाकघरात मोठाल्या पातेल्यात काही शिजत उकळत होते.
एकावेळी १५/२० किलो बटाटे, टोमॅटो कापले जात होते.. ५०किलो गव्हाच्या पीठाची कणीक मळली जात होती .. पोळ्या, पुऱ्या लाटणाऱ्या मावशी नाश्ता खात होत्या त्यांच्याशी गप्पा मारल्या, इथले काही जण गेली १३ वर्षे ताऊजींबरोबर दरवर्षी त्यांच्या या स्वैपाकघरात यात्रींसाठी जेवण बनवतायत. दरवेळी असाच डबा मिळतो असं नाही पण Pantry म्हणून मिळालेल्या डब्याचं स्वैपाकघरात रुपांतर केवळ वावर केल्याने होत नाही पण यात्रींपोटी असलेल्या प्रेमातून होतं.
अन्न जिथं शिजतंय तिथं आनंदी वातावरण हवं.. ते कधी राहील तर त्या सगळ्या यात्रीं कडून मिळालेल्या वाह. मधून ..."काय हलवा बनलाय", आजचा "चाय बढिया है" "खाकरा चंगा है", "कैसे कर लेते हो ये सब..सोते हो या नहीं ?" अशा तृप्तीने दिलेल्या प्रतिसादातूनच तर ही लोकं पोट भरतात ..जाणवलं .. अन् ठरवलं आज केलंच पण रोज कुणातरी स्वैपाकघरातल्या, सुरक्षेतल्या, स्वच्छता करणाऱ्या कर्मयात्रींशी दोन शब्द मुद्दाम बोलायचंच.
रोज सकाळचा ६.३० चा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा ,छोटं खाणं, रात्री बरेचदा सूप, आणि रात्रीचं जेवण हे सगळं संपूर्ण रेल्वेतून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नेणं चेष्टा नव्हतीच..
बरं, हा त्यांचा व्यवसाय होता, पैसे मिळणार होते हे जरी मान्य केलं तरीही... काम अवघड आहे. खाण्याचे नखरे, आवडीनिवडी, तिखट-मीठाचे प्रमाण, खानपान पद्धतीमधील फरक, आपणच बनवलेले जेवण जास्त झाले म्हणून तर कधी आवडले नाही म्हणून टाकलेले देखील बघणे..
प्रत्यक्षात पदार्थ बनवणारे आचारी, मावशा, वाढपींची रचना, कूणी काय वाचायचं, पदार्थ मधेच संपला तर तो पुरवण्यासाठी मागणी यंत्रणा, मधून मधून जाणारे आमच्या सारखे यात्री.. कधी या डब्यात तर कधी त्या डब्यात जेवणारे, संख्या बदलवणारे यात्री हे सारं फार वैविध्यपूर्ण होतं..बरं दरवेळी बदलतं समीकरण..
आता उशीर होतोय पण प्लॅटफॉर्मवर रेल्वे थांबू शकतील.. तर नाश्ता किंवा जेवण प्लॅटफॉर्मवर मांडला जाई. आगाऊ सूचना जरी मिळत असली तरीही हे वरखाली खूप अवघड आहे.. रोज मला तर प्रचंड कुतूहल वाटायचं. बर काही फार विचारले तर त्यांना ते मिडीयात जाईल असं वाटायचं मग जरा अघळपघळ जाऊन नीट बोललं जायचं.
पण जेव्हा मी त्यांना सांगायचे की मला काही इंस्न्टावर किंवा कुठेही पाठवायचा नाही.. निवांत बोला, सांगा..हे content creation नाही..मग ती मंडळी खुलायची..रोज बटरब्रेड, जाम ब्रेड, उप्पीट,पोहे,खाकरा, इडली, मेदूवडा, भेळ, सुशिला, गाठीया, बरेच प्रकार नाश्त्याला असायचे तसंच जेवणात ही आमसूल चटणी पासून,दालबाटी, पास्ता पर्यंत पदार्थ खिलवले यांनी.
रोजची भाजी, पुरी, कढी/ वरण, भात वगैरे तर गोष्टी असायच्या.... ज्यांनी जेवणाकडून फार अपेक्षा ठेवल्या नाहीत, जे समोर येईल ते उत्तम आहे हे मानून खाल्ले आणि फक्त रेल्वेमध्ये दिले जाणारेच जेवण नाश्ता खायचा असे ज्यांनी ठरवले...ते सुखी झाले असे वाटते मला...
किती खायचं, आहे त्यात काय खायचं आणि काय नाही हे ठरवलं तर सगळं ओकेच होतं..
तृटी काढायच्या झाल्या तर निघतील.. (तेलकट पुऱ्या, आंबट कढी..) पण चांगल्या गोष्टी बऱ्याच होत्या... त्यामुळे I was happy regarding food always.. मी एक वाक्य ठरवलं होतं ते म्हणजे "खाना है, खाना चाहिए, खा लेंगे|" असं म्हंटलं की कसं माझं मलाच छान वाटायचं..
खाणं मला कधीच बाधलं नाही..कारण श्रद्धा...( खरंच सांगतीय करून बघा) .
जेवण खानपान याबद्दल बोलत राहीनच मी...मी एरवी खूप चोखंदळ असले तरी अशा प्रवासात मिळेल ते खायचं एवढं शहाणपण नक्कीच कमावलंय मी.
तर.....
आम्ही अजूनही पोचलो नव्हतो.
विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी , स्वामी विवेकानंद केंद्र , आमचे प्रायोजक ZoHo याबद्दल गटागटात चर्चा घडत होती. शशांक मणीने देखील याबद्दल सेशन घेतलं.
दिशा टीम अर्थात रेल्वेतून उतरल्यावर कुठे जायचं, कुठून, बसेस कुठे असतील यांना मार्गदर्शन करणारी समिती ..
ज्या यात्री़ंना यात DISHA Coordinator बरोबर काम करायचंय त्यांना एकत्र करून मनीषने त्याबद्दल सांगितले गेले, मी दिवशी टीमसोबत काम करायचे ठरवले.
तसेच जिथे जाऊ तिथे,तसेच बसेसवर जागृती यात्रा बॅनर वगैरे लावणे, स्टेज तयार करायला मदत वगैरे साठी ब्रॅंडिंगच्या प्रमुख लिनाबरोबर चर्चा झाली. तर असे आम्ही उतरायला सज्ज झालो होतो.. दुपारचे जेवण देखील झाले.
मग उतरलो... आणि बसने विवेकानंद स्मारकाकडे निघालो... पाऊस होताच.. पण दिशा टीमने उत्तम काम केले.. ब्रॅडिंगवाले देखील धावपळ करतच होते..सगळे बाकी ERC उत्साहात होतेच...
शेवटी कन्याकुमारी ते कन्याकुमारी.. आम्ही इतर कुठेही जाणार नव्हतो थेट बसमधून उतरून बरीच रहदारी बाजूला करत..... निळ्या समुद्रासमोर ५०० यात्रींच्या आणखी एका लाटेने धडक मारायला सज्ज झालो.
प्राची परांजपे
१९ जानेवारी २०२३




👌👍
उत्तर द्याहटवासत्रांची रचना ही उद्योजकता अशा अंगाने असायची की social entrepreneurship अशी असायची?
उत्तर द्याहटवासकाळी उद्योग/NGOबघणे,ऐकणे असं असायचं. संध्याकाळी उद्योजकता वाढवण्यासाठी माहीतीपर सेशन, आणि छोटे स्टार्ट अप केलेले exyatri experience सांगायचे.
हटवाप्रत्यक्षात विस्ताराने बोलूया.
हटवा