भाग २ - आणि तयारी सुरू झाली
जागृती यात्रेसाठी निवड तर झाली, पुरेशी स्कॉलरशीपही मिळाली.
आता प्रत्यक्षातल्या आणि माझ्या डोक्यातल्या अनंत उद्योगातून सवड काढायला हवी, हे नक्की झालं. 2022 चे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे महिने कमालीचे धावपळीचे असणार आहेत हे मला आधीच माहीत होतं.
यात्रा नुकतीच नक्की झाली.. ती असो वा नसो खूप गोष्टी एकावेळी चालू होत्या... रोजचं काम, व्यवसाय, मुली, अभ्यास, हाती घेतलेली छोटी छोटी कामं, मुद्रित शोधन, दिवाळी, नेवरे फेरी, ट्रेकिंग, स्पर्धा, पाहुणे, आधीच ठरलेले प्रवास खूप काय काय... पण ही काही केवळ माझी कहाणी नाही.. कुणाही घर आणि बाहेर असं दोन्ही काम करणाऱ्या बाईचीच कथा आहे. एकावेळी अनेक गोष्टीत रुची असणाऱ्या मुलीचीच ही कथा आहे..
यात्रेमध्ये सहभागी झालेल्या अनेक बायकांची हीच कथा आहे...
जायचं तर ठरलंय,पण आपल्या मागे सगळं कसं व्यवस्थित व्हायला हवं...(mam, this is a typical middle class house women mentality.. as many young girl Yatris use to say like this during Yatra)
तक्रार नव्हती माझी पण ..पण थोडं दडपण यायला सुरू झालेलं..
Production चं काय करायचं, होईल ना नीट अशी मला चिंता तर ,मुलगी १० वीत आहे, अभ्यासात चांगली आहे, पण मी तिच्या १०वीत असं १५-२० दिवस जाणार कळल्यावर काहींच्या भुवया उंचावल्या , गरज आहे का आत्ता जायची वगैरे पण सल्ले झाले , काहींनी तर.."तुमचं दोघांचं जरा वेगळंच असतं काहीतरी" असं पण म्हंटलं, तर काहींनी उत्सुकता, कुतूहल दाखवलं.."जा गं आम्ही आहोत असं म्हंटलं".
यात माझी आई सगळ्यात प्रोत्साहन देणारी ,एकदाही "कशाला??" असं म्हणाली नाही. जरी तिला घरची परिस्थिती माहीत होती तरी...
तर इकडे मुलीं , मी जाणार म्हणजे मजा येईल,कटकट जाणार, प्रश्न, सूचना कमी होणार या आनंदात..
आम्ही करू सगळं नीट आपापलं आणि बाबा येतीलच ना ..या रंजनात.
एकुणात आपण आई बाबा म्हणून जरा वेगळेच आहोत का असं पण वाटून जायचं.
मनात गिल्ट नव्हता, धाकधूक मात्र होती.
दिवाळीत भली मोठी बॅग खरेदी केली आणि मुलींना खात्री पटली की आई बहुतेक खरंच जाणार तर..
धाकट्या मुलीसाठीच जरा वाटत होते , बाकी सगळं सेट होतं.
मुलींना मला सोडून राहण्याची पुरेशी सवय आहे आणि खरंतर आता त्या पुरेशा मोठ्या आहेत. त्यामुळे इतरांना वाटत होती तेवढी काळजी मला नक्कीच वाटत नव्हती..अमर पूर्ण रजा काढून येऊन राहणार म्हंटल्यावर तर खरंच घरची काळजी नव्हती. त्याच्या क्षमता मी पूर्णपणे जाणून आहे.
माझं हिमोग्लोबिन, b12 हा एक मुद्दा होता, पण मैत्रीण वैद्य प्राजक्ता हीने सांगितल्याप्रमाणे औषधे आणि आईच्या सल्ल्याने योगासने.. सर्व करत केले आणि अधिक उत्तम तब्येत झाली. . हिमोग्लोबीन चक्क 11.3 झालेलं पाहिलं याच डोळ्यांनी. रोज नियमितपणे अंजू आणि मी चालायला जात होतो... योगासने रोजच आहेत पण चालणे होता होईतो जायचेच असं मी ठरवलेलं, वंदनाने दिलेला मोलाचा सल्ला...
Middle life crises ज्याला मी मध्यमवयीन बावचळणे ,अडखळणे म्हणते याबद्दल विद्युत वरखेडकरच्या पुस्तकातही वाचले होते, तयारी करताना थोडा अनुभव येत होताच. विद्युत् च्या Yatra on wheels या पुस्तकाने यात्रा काय चीज आहे याचा अंदाज आला होता, पण स्वतः अनुभव घ्यायचा होता.
प्राजक्ताची औषधं, घरी केलेले कणीक डिंग बदाम वगैरे लाडू, काळे खजूर तूप घालून... अशी बेगमी झाली. आजवर एकटीने खूप प्रवास केले पण हे काही तरी वेगळं आहे असं वाटायला लागलं.
अमर २२ डिसेंबर २०२२ ला सांगलीत डेरे दाखल झाला..
बॅग भरून झाली. पुढे रेल्वेत ही बॅग म्हणजे माझं कपाट झालेलं, एकदाच रात्री हे कपाट मी उघडत असे..बाकी कपाट आवरणे वगैरे असले घरगुती उद्योग करायला वेळ नव्हता (मला त्यात वेळ घालवायचा नव्हता)..सलग १९ रात्री मी घराबाहेर असणार होते.... काय म्हणता सामान कसं बसवलं...??
कौशल्य लागतं त्याला.. जे मी मिळवलंय.
फक्त रोज एकाच बर्थवर, स्लिपिंगबॅगमधे रेल्वेत झोपण्याचं कसब मात्र मिळवलं नव्हतं ते पुढे आत्मसात केलं असं आज म्हणू शकतीय. १ मोठ्ठीठ्ठीठ्ठी बॅग आणि २ पाठीवरच्या पिशव्या भरून तयार झाल्या..
स्लिपर पण हव्यात, बूट लागतीलच,
स्वेटर हवा, शाल लागेलच.
कानटोपी हवी पण स्कार्फ सवयीचा आहे तो ही घेतेच...
याला चोचले म्हणा किंवा काहीही..पण प्रत्येक गोष्ट उपयोगी पडली.. मला नाही तरी कुणाला तरी उपयोगी पडलीच(असूदे.. मला नाही तर कुणाला तरी ..ही सवय मेली जात नाही हेच खरं चांगली आहे की ही सवय )... जागृती कडून सतत मेल येत होत्या की खूप थंडी असणार आहे, त्यानुसार कपडे घ्या. कन्याकुमारीत पाऊस असेल तशीही तयारी ठेवा...
पाऊस,वारा,थंडी,उन सर्व आम्ही अनुभवले पुढच्या १५ दिवसात.
जागृती यात्रा हा एक रेल्वेतून केलेला सलग प्रवास आहे जो पुरेसा शारीरिक, मानसिक कस लावणारा आहे.
राहण्या, खाण्या, झोपण्याच्या अत्यंत माफक अपेक्षा ठेऊन मी मानसिकदृष्ट्या सज्ज होते. राज्यस्तरीय स्पर्धा संपवून आणि रेल्वे उशीराने धावत असल्याने "अंधाऱ्या" रात्री अस्वच्छ अमरावती स्टेशनवर पेपर अंथरून देखील प्लॅटफॉर्मवर आम्ही झोपलो आहे, त्यावेळी स्पर्धेची नशा होती आता यात्रेची उत्सुकता होती. आजवर मी केलेले खूप रेल्वे प्रवास आठवत होते मला..
ही यात्रा पर्यटन स्थळे या अंगाने नाही तर उद्यमीता जागरणाची यात्रा आहे हे पुरेपूर माहिती होते.., भरपूर व्हिडिओ, माहिती आहे नेटवर याबद्दल. www.jagritiyatra.com
ही साईट बघितलीत तरी अंदाज येईल.
सध्या गुगल, इंटरनेट फार प्रभावी माध्यम आहे सर्व आधीच समजून घेण्यासाठी आणि तितकंच टूकार माध्यम आहे नको ते समजून घेण्यासाठी.
पण मी केवळ व्यवसायाभिमुखता एवढाच हेतू ठेऊन जात नव्हते. मला उद्यमीता, उद्योग,रोजगार, तरुण तरुणी काय विचार करतात ,का उद्योग करू इच्छितात, काय शिक्षण घेतात, कुठं असमाधानी आहेत का, मानसिक अस्थिर आहेत की परिस्थिती अस्थिर करतेय त्यांना सामाजिक भान, सामाजिक संस्थांकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे लोकांचा..
खरंतर अशी खूप मोठी यादी मी केली होती.....
निरीक्षणं नक्की करणार होते मी आणि अर्थातच जोडीला माझी उत्पादने कुठे विकली जातील, व्यवसाय वाढीसाठी काय करता येईल हे समजून घेणार होतेच. विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या कुणाला यात्रेत भेटता आलं तर बरं हे पण मनात होतंच.
खूप नवे शब्द उलगडून माझ्यापुढे येणार होते पुढच्या काही दिवसांत.... मी घर सोडलं, सांगलीहून रात्री ११.३०ची बस निघाली ...
आणि मी २३ डिसेंबरला पहाटे चेंबूर ला उतरले.
प्राची परांजपे
१३जानेवारी २०२३

पहिले दोन्ही लेखांक आज वाचले. छान लिहीत आहेस! या जागृती यात्रेबद्दल पहिल्यांदाच माहिती मिळत आहे. पुढील लिखाण वाचायची उत्सुकता आहे....
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवादरवर्षी २५ डिसेंबरला आमची यात्रा सुरू होते, आमच्या जागृती यात्रेचे फोटो शेअर करत.. या वर्षी तुझ्या बरोबर ही यात्रा सुरू झाली.. मी इतक्या जणांना सांगितलं पण तू मनावर घेतलं आणि पूर्ण केलीस यात्रा... जिद्द लागते त्याला.. तू दाखवली. खूप खूप कौतुक...
उत्तर द्याहटवाकेवळ तुझ्यामुळे वंदना
हटवावाचता वाचता रेल्वे स्टेशनवर आल्यासारखे वाटले.
उत्तर द्याहटवा- अभिजित बेल्हेकर 👍🏼
धन्यवाद.. आपण वाचताय
हटवाप्राची ताई, शब्द हि कमी पडतात....... अप्रतिम.
उत्तर द्याहटवा👍👍
उत्तर द्याहटवाखूप मस्त! डोळ्यासमोर मोठ्ठी बॅग, स्टेशन सगळं सगळं दिसतंय.
उत्तर द्याहटवाWaiting for next link!
धन्यवाद
हटवापुढील लेखाची aaturtene वाट pahatoy
उत्तर द्याहटवाआम्ही पण भल्या आतुरतेने वाट पाहतो आहे
उत्तर द्याहटवानाना... नमस्कार.धन्यवाद
हटवाSahi Prachi ....kevadha taral drushtikon samor theun tu jaun aalis g....
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाआई बाबा म्हणून जरा वेगळेच आहात तुम्ही दोघेही...in a good way. Inspirational writing..
उत्तर द्याहटवा🙏
हटवाखूप छान लिहिलं आहेस की
उत्तर द्याहटवाप्रयत्न करतील.जमेल
हटवाग्रेट 👍
उत्तर द्याहटवाछान लिहिले आहेस...उत्सुकता होतीच तुझ्या या अनुभवाबद्दल ऐकण्याची !
उत्तर द्याहटवाधन्यवाद. रोज एक लेख पाठवेन. गेल्यावर्षी ताजे ताजे अनेकांनी वाचले आहेतच. पण अनेकांच्या मागणीवरून आता माझ्या स्टेटसला ठेवत आहे.
हटवा